मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

नोव्हेंबर, २०१२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सुनीसुनी मुंबई, गहिवरलेले मराठीजन आणि आतून पुरता हललेलो मी!

मुंबई... अविरत धावणारे शहर... जिथे कुणालाच कुणासाठी वेळ नाही... कायम धावपळ... लोकलमधील गर्दी... माझ्या तीन साडेतीन वर्षांच्या मुंबईतील वास्तव्यात, विविध रंगाने- गंधाने भरलेली मुंबई कित्येकवेळेस पाहिली.  मात्र, शिवसेनाप्रमुख  बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतरची मुंबई ही सुनीसुनी आणि दुःखाचे सावट पसरलेली होती. गेल्या रविवारी एकाही दुकानाचे शटर उघडे नव्हते. मोठ मोठ्या मॉलपासून चहाच्या आणि पानाच्या टप-यांनीही आपली दारं बंद करुन घेतलेली होती. अशी सन्नाट्याने भरलेली मुबंई या आधी कधीच पाहिली नाही आणि या पुढेही कधी पाहाता येईल, असे वाटत नाही. गेल्या शनिवारी मी माझ्या एका परीक्षेनिमित्त मुंबईला गेलो होतो. शिवसेनाप्रमुखांची प्रकृती ठीक नसल्याच्या बातम्या तशा सोमवार पासून येत होत्या, त्यामुळे मातोश्रीवर असलेली गर्दी आणि तिथून सुरू असलेले मीडियाचे कव्हरेज याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा म्हणून मी शनिवारी दुपारी कलानगरमधील म्हाडाच्या इमारतीत उभ्या असलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींमध्ये जाऊन थांबलो. काही क्षणांतच खासदार संजय राऊत बाहेर आले आणि त्यांच्यासोबत इतरही काही लोक होते. गेल्या काही दि...