१ ज्या डायरीत माझ्या लेखांची आणि कवितांची जंत्री असायची ती आता दर एक तारखेलाच हातात घेतो एक तारखेच्या पहिल्या पानावर ठरलेली मुक्तछंदातील कविता असते घराचा - कर्जाचा - एलआयसीचा हप्ता त्याखाली किराना - लाईट - मोबाईल - पाणी बीलाचं दुसरं कडवं प्रत्येक महिन्याचा ठरलेला हिशेब तरीही दर महिन्याला कविता नवीन असते कधी सुनित, कधी पानभर, तर कधी दिर्घ होऊन जाते लाख ठरवतो यंदा चारोळीतच हिशेब मांडावा पण, अनाहूत डॉक्टर भेटीने इसीजीच्या चिठ्ठीप्रमाणे वाढतच जातो कवितेचा पदर २ शेअर बाजारासमोरील उधळलेला सांड माझ्याच घरावर कसा चाल करुन येतो