#सखे... तुला नाही का गं वाटतं आपणही गणपती पाहायला जावं. ते रंगीत-संगीत मंडप... वेगवेगळे देखावे... सजीव-निर्जीव... दहा दिवस पाणी बचतीचा संदेश. प्लॅस्टिक मुक्तीचा उपदेश देणारे फलक पाहून, आजची पिढीही किती जागरूक आहे नाही.. आपण उगाच त्यांना नाव ठेवतो, असे तेलकट-तुपकट चेहऱ्याच्या लोकांचे संवाद ऐकावे! पैठणगेटपासून सुरु करुया का प्रवास, की आधी टीव्ही सेंटर - एन नाईन - एन आक्राकडून निघायचे... ए.. तुला जिकडून निघायचे तिकडून निघ.. आमच्या भीमनगरमध्ये ना आम्ही कधी गणपती बसवला ना कधी औरंगपूऱ्यात गणपती पाहायला गेलो.. पाहायचचं असेल तर संध्याकाळी विद्यापीठ गेटवर ये, तिथेच गाडी लावून मस्तपैकी चालत लेणी पर्यंत जाऊ छान हरवगार झालयं सारं.. त्या तुझ्या धोनीचा पिक्चर येतोना.. तोही आपल्या लेणीच्याच साक्षीला फिरायला येत असल्याचं दाखवलय त्यात... येतोस ना मग..