मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑक्टोबर, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मनसेची खंडणी, मुख्यमंत्र्यांची 'मुश्किल'

'ऐ दिल है मुश्किल' चित्रपटाच्या प्रदर्शनाचा वाद अखेर मिटला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी विरोध मागे घेतला आहे. मात्र यामुळे मनसे या खळ्ळखट्याकची भाषा करणाऱ्या पक्षाने माघार घेतली की खरोखर हे त्यांच्या आंदोलनाचे यश आहे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच लष्कराच्या माजी अधिकाऱ्यांनी अशा प्रकारे एखाद्याला बळजबरी करुन आर्मी वेलफेअर फंडसाठी निधी घेणे, शहीदांचा अपमान आहे. लष्कराचा हा स्वाभिमान योग्य असल्याचे या वादावर शांत असलेल्या शिवसेनेने म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांनी याला 'खंडणी' हा शब्दप्रयोग करुन मनसे आणि भाजपने एकमेकांना मोठे करण्याचा चालवलेला प्रयत्न एका दगडात हाणून पाडला.  मनसे 'खळ्ळखट्याक' करणार म्हटल्यावर चांगल्या-चांगल्यांचे धाबे दणाणत होते. राज्य सरकारसह मुंबईतील मोठमोठ्ठे मॉल, चित्रपट निर्माते, कलाकार यांनाही अनेकदा मनसेपुढे झुकावे लागले असल्याची अनेक उदाहरणे आहेत. मग मराठी पाट्या असो किंवा मराठी मुलांना रेल्वेतील नोकरीचा मुद्द्दा किंवा नुकताच प्रदर्शित झालेला 'एम.एस धोनी' हा हिंदी चित्र...