महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक संपली. काँग्रेस - राष्ट्रवादीला अनपेक्षित बहूमत मिळले. आणि पुन्हा एकदा शंकरराव चव्हाण पुत्र अशोक चव्हाणांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. अशोक चव्हाण विक्रमी मताधिक्याने निवडून आले. हे सगळं यश मुख्यमंत्र्यांना लोकशाहीतील मतदारराजा आणि काँग्रेसश्रेष्ठींच्या कृपादृष्टीमुळे मिळालेले आहे, हे महाराष्ट्र विधानसभेसाठी मतदान न केलेला एखादा पोरही सांगू शकेल. मात्र चव्हाणांचा विश्वास लोकशाहीतील 'देवा' पेक्षा देव-देव करणा-या बाबावरच जास्त असल्याचे रविवारी महाराष्ट्रदेशाने पाहिले. राजकारणी कुडमुड्या जोतिषा पासून 'जागृत' देवस्थानाचे निस्सीम भक्त असतात. हे ही सर्वश्रुत आहे. डाव्या चळवळीतील - पुरोगामी म्हणविणारेही बरेच जण चोरुन लपून देवदर्शन घेऊन येतात. मुलाबाळांच्या लग्न पत्रिकांवर याच्या त्याच्या कृपेनं छापतात. वेगवेगळ्या नावाने भंडारा, कंदूरी, न्याज च्या पंगती उठवतात. मात्र काल मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी शासकीय निवासस्थानी , शासकीय खर्चाने , सुटीच्या दिवशी शासनाचे कर्मचारी राबवले ते सत्यसाईबाबाची पाद्यपूजा करण्यासाठी. उठता बसता पुरोगामीत्वाची ट...