मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

डिसेंबर, २००९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली !

6 डिसेंबर हा दिवस महाराष्ट्रातील आणि देशातील तमाम दलित जनता कधीच विसरू शकणारी नाही. याच दिवशी सर्व दलित, पिडित, तळागळातील समाजाचे उध्दारकर्ते भारतरत्न बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले. या घटनेला उद्या 53 वर्ष होतील. या 53 वर्षात प्रामुख्याने महाराष्ट्रातील दलित चळवळ ही आंबेडकरी चळवळ म्हणून नावारुपास आली. बाबासाहेबांनतर कर्मवीर दादासाहेब गायकवाडांनी चळवळीला एका विशिष्ट टप्प्यावर नेऊन ठेवले. मात्र त्यांच्यानंतरच्या पिढीने रिपब्लिकन पक्ष आणि दलित चळवळ बौध्दांपूरती मर्यादीत करुन टाकली. आजच्या रिपब्लिकन नेत्यांनीतर आपापल्या वाट्याहिश्याला येईल तेवढे काखोटीला मारण्याचा एकमेव कार्यक्रम केलेला आहे. त्यात कोणी खासदारकी तर कोणी राज्यपालपदाची येस्करकी मिळवण्यातच धन्यता मानलेली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत प्रमुख रिपाई नेते रामदास आठवले, प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर, जोगेंद्र कवाडे, टी.एम. कांबळे, यांचे संसदीय राजकारण संपुष्टात आल्यातच जमा आहे. यातील एकही जण खासदार होऊन देशाच्या संसदेत तर गेलेच नाही मात्र बाळासाहेब आंबेडकर वगळता महाराष्ट्रातही एक आमद...