आज महाराष्ट्र दिन. (हो दिनच ''दीन'' नाही. ) आज नुसताच महाराष्ट्र दिन नाही तर कामगार दिन देखील आहे. (हे तुम्हाला माहित नाही असं गृहित धरून मी मुळीच लिहीत नाही. तर तुम्हाला हे माहित आहे म्हणूनच लिहित आहे. ) तसच आज महाराष्ट्राचा सुवर्ण महोत्सव. म्हणजेच 1 मे 2010 हा दिवस असा सुवर्ण त्रिकोणाने सजला आहे. या महाराष्ट्राचा इतिहास वगैरे मी सांगत बसणार नाही. काय पुन्हा पुन्हा तेच तेच सांगायचे, मुंबईसह महाराष्ट्र होण्यासाठी 105 हुतात्म्यांचे बलिदान, संयुक्त महाराष्ट्राचा लढा, स्वखुशीने सामिल झालेला मराठवाडा, काहि अटींनीशी महाराष्ट्रात आलेला विदर्भ. हे सगळं तुम्हाला रोजच्या पेपरातून, टिव्ही वरुन वाचायला पहायला मिळत आहेच. काहींना या इतिहासाबद्दल जास्तच जाणून घ्यायचे असेल तर बरीच पुस्तकंही छापली गेली आहेत. त्यामुळे त्यात मी आणखी काय वेगळं सांगणार. असो. हा महाराष्ट्राचा सुवर्ण महोत्सव महाराष्ट्र शासन धुमधडाक्यात साजरा करत आहे. (शासनाने तसं त्यांच्या फाईलींवर, डाय-यांवर , जाहिरातीत 50चा आकडा आणि तुतारीचे चित्र दाखवायला कधीपस्नचं सुरुवात केलीय. ) महाराष्ट्र शासन साजरा करत आहे म्हणजे...