मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जानेवारी, २०११ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भोवताली हिंडती ही माणसे प्रेतांपरी

भोवताली हिंडती ही माणसे प्रेतांपरी ; काय ह्या गावातसुध्दा एकदा होती घरे ? असा प्रश्न तुम्हाला नेहमी पडेत असेल ना. पण हा प्रश्न आपल्याला वारंवार का पडतो, आपल्या संवेदना इतक्या बोथट का झाल्या आहेत. आपल्या आसपास काही तरी वाईट घडतं आहे. काही माणूसकीला काळीमा फासणारं घडत आहे. काही अनैसर्गिक घडत आहे. या सर्व अघटीतांचे आपण केवळ मुक साक्षीदार का होत आहोत. गांधींची तीन माकडं आपण बनलो आहोत का ? .... एक प्रसंग एका शहरातील एक गजबजलेला चौक. सायंकाळची वेळ. एक वेडी बाई रस्त्यावर मरणप्राय वेदनेने ओरडते आहे. ती गर्भवती आहे. तिच्या प्रसुतीची वेळ जवळ आली आहे. तिच्या बाळांतकळा आणि तिच्या मरणकळा यात कोणतीच भेदरेषा उरलेली नाही. तिचा आक्रोश क्षणा क्षणाला वाढतच जात आहे. तिच्या आसपास बघ्यांची गर्दी जमते. विरते. पुन्हा नवे लोक येऊन बघतात. निघून जातात. सुर्याचीही जाण्याची वेळ झालीय. तोही कधी कुणासाठी थांबत नाही. त्या वेडीचा टाहो आता अधिकच व्याकूळ झालेला. भर रस्तावर ती एका बाळाला जन्म देते. रस्त्यावर पैदा झालेलं ते पोर सर्वांची सहानुभूती मिळवतं. मदत मात्र नाही. पुढचे दोन तीन तास ते नवजात बालक आणि वेडी बाळांतीण...