मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

एप्रिल, २०१२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

रिपब्लिकन पक्षाची दुर्दशा कधी थांबेल ?

१९५७ ते १९६७ पर्यंत एक प्रबळ शक्ती असलेला आणि सत्ताधारी काँग्रेस पक्षाला प्रखर विरोध करुन सतत दबावात ठेवणारा रिपब्लिकन पक्ष आज पडझड झालेल्या एखाद्या मजबूत किल्ल्याची जी अवस्था होते तसा झाला आहे. एके काळी दिमाखदार वैभव लाभलेला किल्ला जसे खिंडारात त्याचे रुपातंर होऊन भकास आणि अवकळा आलेली वास्तू दिसावी तसे रिपब्लिकन पक्षाचे झाले आहे. एके काळी महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, पंजाब, कर्नाटक, तामीळनाडू, आंध्रप्रदेश आदी राज्यातून लोकसभेत खासदार पाठविणारा व विधानसभेत आमदार पाठविणारा तसेच मुंबई आणि नागपूर सारख्या महापालिकेचे महापौर पद भोगलेला हाच रिपब्लिकन पक्ष आहे का असा प्रश्न पडतो. १९५७ मध्ये काँग्रेस पक्षाच्या उरात धडकी भरविणारा रिपब्लिकन पक्ष त्याच काँग्रेससमोर सत्तेसाठी भिकेचे कटोरे घेऊन उभा असलेला पाहिल्यानंतर आंबेडकरी अनुयायांच्या तळपायाची आग मस्तका पर्यंत जाऊन भिडेत. या लाचार पुढा-यांना काळ्या पाण्यावर न नेता जिथे पाणीसुद्धा मिळणार नाही अशा ठिकाणी नेऊन फाशी द्यावी आणि समाजाची कायमच्या लाचारीपासून सुटका करावी, अशी सर्वसामान्य माणसाची उस्फूर्त संतापी प्रतिक्रीया उमटते. परंतू बाबासाहेबांनी दिलेल...