चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित तुकाराम हा मराठी चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. या चित्रपटासाठी दासू वैद्य यांनी गाणी लिहिली आहेत. नुकतीच दिव्य मराठी या माझ्या वेबसाईट साठी (दिव्य मराठी मध्ये मी उपसंपादक म्हणून आहे, म्हणून माझी वेबसाईट) त्यांची मुलाखत घेतली. सुमारे तासभर चाललेल्या या गप्पांमध्ये त्यांनी चित्रपट आणि संत तुकाराम यांच्यासंबधी बरेच विवेचन केले. यातून दासू सरांचा व्यासंग आणि तुकारामाकडे पाहण्याची दृष्टी ही कळली. ही मुलाखत म्हणजे माझ्यासाठी एक सुंदर अनुभव होता. माझ्या अल्पबुद्धीला जेवढे पचले तेवढे या मुलाखतीत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. शनिवार, १२ मे २०१२ रोजी आमच्या दिव्य मराठीच्या वेबसाईटवर ही मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. तुकारामसाठी गीत लेखन हा माझ्यातील कवीचा गौरव - दासू वैद्य ज्ञानबा-तुकाराम ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. तुकाराम या चित्रपटाच्या गीत लेखनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा तुकाराम कळण्यास मदत झाली. तुकाराम हे प्रकरण समजून घेणं तसं फार अवघड आहे. ते कवींचेही कवी किंबहूना कवींचे बाप आहेत. त्यामुळे त्यांच्या चित्रपटासाठी काम करण्य...