आसपास एवढ्या सगळ्या गोष्टी घडत असतात की, त्यातून काय सत्य काय असत्य, खरेच कोणाचा दोष की, त्याच्यावर उगाच आरोप केले जात आहेत. घडलेल्या घटनेतील नेमकेपणा माध्यमातून जो समोर येत आहे तो आहे की, ती व्यक्ती सांगते ते खरं आहे. हे ओळखण्याची रेषा एकदम अंधूक झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेले अण्णांचे आंदोलन हे खरच देशातील भ्रष्टाचार मिटविण्यासाठी सुरु आहे की, केंद्रातून काँग्रेस? की त्यांचा आणखी काही वेगळाच हेतू आहे. हे लिहित असतानाच राजद्रोहाच्या आरोपात बंदिस्त असलेला व्यंगचित्रकार असीम त्रिवेदी याची जामीनावर सुटका झाली. त्याआधी एका वृत्तवाहिनीवरील चर्चेत असीमने केवळ घटनात्मक प्रतिकांचा अपमान केला नसून त्याने अशोकस्तंभाचाही अपमान केला आहे त्यामुळे बौद्ध अनुयायी देखील दुखावल्याचे बोलले गेले. मात्र, जामीनावर सुटलेल्या असीमने प्रथम काही केले असेल तर तो बौद्धविहारात गेला आणि त्याने तिथे भगवान बुद्ध आणि बाबासाहेबांच्या प्रतिमांचे पुजन केले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्याने म्हटले की, मी त्यांच्या (बाबासाहेबांच्या) सामाजीक चळवळीला सॅल्यूट करतो. त्यांनी समानतेसाठी काम केले आणि आमच...