मुख्य सामग्रीवर वगळा

कळेनासे झाले आहे

आसपास एवढ्या सगळ्या गोष्टी घडत असतात की, त्यातून काय सत्य काय असत्य, खरेच कोणाचा दोष की, त्याच्यावर उगाच आरोप केले जात आहेत. घडलेल्या घटनेतील नेमकेपणा माध्यमातून जो समोर येत आहे तो आहे की, ती व्यक्ती सांगते ते खरं आहे. हे ओळखण्याची रेषा एकदम अंधूक झाली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेले अण्णांचे आंदोलन हे खरच देशातील भ्रष्टाचार मिटविण्यासाठी सुरु आहे की, केंद्रातून काँग्रेस? की त्यांचा आणखी काही वेगळाच हेतू आहे.
हे लिहित असतानाच राजद्रोहाच्या आरोपात बंदिस्त असलेला व्यंगचित्रकार असीम त्रिवेदी याची जामीनावर सुटका झाली. त्याआधी एका वृत्तवाहिनीवरील चर्चेत असीमने केवळ घटनात्मक प्रतिकांचा अपमान केला नसून त्याने अशोकस्तंभाचाही अपमान केला आहे त्यामुळे बौद्ध अनुयायी देखील दुखावल्याचे बोलले गेले. मात्र, जामीनावर सुटलेल्या असीमने प्रथम काही केले असेल तर तो बौद्धविहारात गेला आणि त्याने तिथे भगवान बुद्ध आणि बाबासाहेबांच्या प्रतिमांचे पुजन केले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्याने म्हटले की, मी त्यांच्या (बाबासाहेबांच्या) सामाजीक चळवळीला सॅल्यूट करतो. त्यांनी समानतेसाठी काम केले आणि आमचाही आग्रह तोच आहे. तर माझ्या सारख्याला प्रश्न पडतो की, त्याच्यावर आरोप करणारे हे वरपांगी विचार करणारे आहेत की, असीम सारखे हे ढोंग करतात. नेमके काय सत्य आहे. आपण जी विचारधारा घेऊन जगत असतो त्याच्या सोबत जायचे की, अशांना योग्य म्हणायेच जे, कलेच्या आणि अभिव्यक्तिच्या नावाखाली, सामाजीक समानतेच्या नावाखाली विरोधच चुकीचा आहे असे म्हणतात.
या देशाची काही राष्ट्रीयता आहे. त्याची काही मापदंड आहेत. मानचिन्ह आहेत. प्रतिकं आहेत. त्यांच्यी कोणी टिंगल-टवाळी करत असेल, त्यांचा अपमान होत असताना राष्ट्राने पर्यायाने या राष्ट्रचे प्रतिनिधीत्व करत असलेल्या सरकारने काहीच बोलायचे नाही का? पण, असे म्हणावे तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्याच घटनेने दिले आहे. त्याचे काय? असाही प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे नेमके काय बरोबर आणि काय चूक हेच कळेनासे झाले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

योगीसाठी शहीदाच्या घरी लावला एसी, दानवेंच्या दारी आलेली शेतकऱ्यांची पोरं 'उपाशी'

शहीदाच्या कुटुंबाचीही देशभक्तीचे उमाळे येणारं सरकार थट्टा करु शकते, याचे ताजे उदाहरण उत्तर प्रदेशात पाहायला मिळाले आहे. भारत 'माते'साठी जीवाची बाजी लावून लढणाऱ्या शहीद प्रेम सागर यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी योगी आदित्यनाथांना 11 दिवस लागले. (की माहित नाही योगी मयताच्या दहाव्यानंतरच त्या घरात जातात असा काही नियम आहे.) हरकत नाही. ते शहीदाच्या घरी गेले. त्याच्या आदल्या रात्री उत्तर प्रदेशातील देवरिया या शहीद प्रेम सागर यांच्या घरी एसी, सोफा सेट, गालिचा आणि काही भगवी वस्त्रे पाठवण्यात आली होती. एवढेच नाही तर घरातील टॉवेल ही बदलण्यात आले होते. एका रात्रीतून एसी लाकडी बल्ल्यांवर फीट करण्यात आला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आले, त्यांनी शहीदाचे घर पाहिले, कुटुंबियांची भेट घेतली आणि कोरडी आश्वासने देऊन ते आल्या पावली परत गेले. शहीद प्रेम सागर यांच्या कुटुंबियांना वाटले होते की आदल्या रात्री आलेल्या वस्तू आता आपल्याच घरात राहातील. मुलगा गेला तरी सरकारने आपल्याला वाऱ्यावर सोडले नाही, मात्र त्यांचा हा भ्रम होता. शहीद प्रेम सागर यांचे वडील इश्वर चंद्र यांनी एका दैनिकाला दिलेल्य...

गरज थोड्या लवचिकतेची

वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातील एक मोठ्या व्होट बँकचा पूर्ण ताकदीने पाठिंबा आहे. हा मतदार स्वाभिमानी, विचारकरणारा आणि आंबेडकरी घराण्यावर निष्ठा असलेला निष्ठावान आहे. मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (भारिप), भारिप बहुजन महासंघ, २०१४ मध्ये डाव्यांसोबत केलेली आघाडी, २०१९ लोकसभा निवडणुकीत  एमआयएमला सोबत घेऊन लढवलेली निवडणूक, आणि विधानसभेत एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन केलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग. बाळासाहेबांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या या सर्व प्रयोगांमध्ये 'आंबेडकर'नावावर जीव ओवाळून टाकणारा मतदार तन-मन-धनाने त्यांच्यासोबत राहिला आहे. मात्र या निष्ठावान जनतेला अद्याप सत्तेची चव चाखायला मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत 'वंचित' उमेदवारांना मिळालेली मते पाहिल्यास स्पष्ट होते की, बौद्ध समाजाने बाळासाहेबांच्या नावावर भरभरुन मतदान केले आहे. मात्र बाळासाहेब ज्या ओबीसी, ओबीसींमधील छोट्या जाती, धनगर, अलुतेदार, बलुतेदार, आदिवासी, लिंगायत यांना सोबत घेऊन सत्ता संपादनाची इच्छा व्यक्त करत आहेत तो समाज पूर्ण ताकदीने बाळासाहेबांसोबत आल...

हा कसला फकीर... हा तर बेफिकीर पंतप्रधान - राज ठाकरे

हा कसला फकीर... हा तर बेफिकीर पंतप्रधान - राज ठाकरे १७व्या लोकसभेत महाराष्ट्रासह देशभर सध्या कोणाचे भाषण गाजत असेल तर ते आहे राज ठाकरे यांचे. महाराष्ट्राला राजकीय वक्त्यांची मोठी पंरपरा लाभलेली आहे. बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय सभा मारून नेईल असा सध्या एकमेव नेता आहे, ते म्हणजे राज ठाकरे. त्यासोबतच नाव घ्यावे लागेल 'हैदराबादी शेरवानी' अर्थात बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांचे. ओवेसी महाराष्ट्रीयन नसले तरी, यंदाच्या निवडणुकीत त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांसोबत महाराष्ट्रात अनेक दौरे करुन महाराष्ट्रीयन जनतेची नस अचूक ओळखल्याचे प्रत्येक सभेतून पाहायला मिळाले. राज ठाकरे यांचे 'लाव रे तो व्हिडिओ' हे आता वाक्य राहिले नाही तर ती एक फ्रेज झाली आहे. राज यांची भाषणे महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही चर्चेत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या उरात धडकी भरवणारे त्यांचे 'लाव रे तो व्हिडिओ' सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. एकही उमेदवार उभा केलेला नसताना राज्यात सर्वाधिक चर्चा आहे ती राज ठाकरे यांची. उद्याच्या सभेत राज ठाकरे...