शहरातील बंद दारा आड टीव्ही समोर बसून नळाला पाणी कधी येईल याची चिंता करणारे 'नागरिक' आणि एसी ऑफिसमध्ये बसून बिस्लरी कॅनचे पाणीही फिल्टर करून पिणारे 'कर्मचारी', दोन दिवस झाले नळाला पाणी आले नाही म्हणून पालिकेला शिव्या घालतात... मात्र, आभाळातून पाणी पडलं नाही म्हणून म्हाता र्या -कोता र्यां च्या हवाली कच्ची-बच्ची टाकून त्यांच्या व स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी शहराचा रस्ता धरणा र्यां ची कथा फार वेगळी आहे. मात्र, कोट्यवधींचा कोळसा घोटाळा... त्यात कोणाचे हात काळे झाले होते आणि इकडे पावसाचा टिपूस नसताना राज्याच्या उपमुख्यंमत्र्याचे नाव सिंचन घोटाळ्यात येते... नैतिकतेच्या मुद्यावर ते राजीनामा देतात आणि त्यानंतरच्या राजकीय नाट्यावर वृत्तपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे रकानेच्या रकाने भरतात आणि तासंतास चर्चा करतात... या चर्चेच्या गुर्हाळात दुष्काळाचे कुणाला घेणे देणे ? पण, दुर्लक्ष्य केले म्हणून दुष्काळाची दाहकता कमी होत नाही. या दुष्काळाने बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील भोजेवाडीच्या दोन जणांचा बळी घेतला. भोजेवाडीत गेल्या दोन वर्षात पावसाचा थेंब पडला नाही. कोरडवाहू जमीनीतू...