शहरातील बंद दारा आड टीव्ही समोर बसून नळाला पाणी कधी येईल याची चिंता करणारे 'नागरिक' आणि एसी ऑफिसमध्ये बसून बिस्लरी कॅनचे पाणीही फिल्टर करून पिणारे 'कर्मचारी', दोन दिवस झाले नळाला पाणी आले नाही म्हणून पालिकेला शिव्या घालतात... मात्र, आभाळातून पाणी पडलं नाही म्हणून म्हातार्या-कोतार्यांच्या हवाली कच्ची-बच्ची टाकून त्यांच्या व स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी शहराचा रस्ता धरणार्यांची कथा फार वेगळी आहे.
मात्र, कोट्यवधींचा कोळसा घोटाळा... त्यात कोणाचे हात काळे झाले होते आणि इकडे पावसाचा टिपूस नसताना राज्याच्या उपमुख्यंमत्र्याचे नाव सिंचन घोटाळ्यात येते... नैतिकतेच्या मुद्यावर ते राजीनामा देतात आणि त्यानंतरच्या राजकीय नाट्यावर वृत्तपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे रकानेच्या रकाने भरतात आणि तासंतास चर्चा करतात... या चर्चेच्या गुर्हाळात दुष्काळाचे कुणाला घेणे देणे ? पण, दुर्लक्ष्य केले म्हणून दुष्काळाची दाहकता कमी होत नाही.
या दुष्काळाने बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील भोजेवाडीच्या दोन जणांचा बळी घेतला. भोजेवाडीत गेल्या दोन वर्षात पावसाचा थेंब पडला नाही. कोरडवाहू जमीनीतून शेतकरी पोटापूरते ज्वारी, बाजरी पिकवतो मात्र, निसर्गाच्या दोन वर्षांच्या अवकृपेने यंदा तेही शक्य झाले नाही. येथील शेतकरी मग पोटाची खळगी भरण्यासाठी साखर कारखान्यांवर ऊसतोडीला जातात. मात्र, कारखान्याचा बॉयलर पेटायलाही अजून बराच काळ बाकी आहे. म्हणून शहराकडे जाऊन मोल-मजूरीचा पर्याय अनेकांनी स्विकारला. अण्णासाहेब देवकातेंनीही इतरांप्रमाणे शहराचा रस्ता धराला.. पण, त्यांना काय माहिती त्यांच्या पुढ्यात काय वाढून ठेवले होते...
अण्णासाहेब देवकाते यांची भोजेवाडीत दहा एकर शेती. पण पावसाचा थेंब नाही म्हणून ओसाड पडलेली. म्हणून अण्णासाहेब कामाच्या शोधात पुण्यनगरीत गेले. पुण्यातील तळजाई टेकडीवरील इमारतीत ते, त्यांची पत्नी दिपाली आणि वहिनी मिता काम करीत होते. अचानक इमारत कोसळली आणि सगळे होत्याचे नव्हते झाले. अण्णासाहेब आणि त्यांची वहिनी मिताचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. त्यांची पत्नी दिपाली गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरु आहेत. ही घटना भोजेवाडीत कळाली आणि तिथे स्मशान शांतता पसरली. म्हातारी आई डोक्याला हात लावून बसली, तर आपलं आभाळ फाटलयं - डोक्यावरचं छत्र हरपलं याची पूसटशीही कल्पना नसलेले निरागस चिमुरडे आजी समोर बसले होते...

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा