मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

डिसेंबर, २०१२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आई असल्यावर जाणवत नाही

आई असल्यावर जाणवत नाही एकटाच असलो की, मनावर अनाहूत काजळी पसरते. मग चार भिंतीचं सुरक्षा कवच असलेल्या घरात, जर्नालिझमच्या हॉलमध्ये, बुद्धलेणीच्या पायथ्याशी, पिंपळाच्या जाळीदार सावलीत मी कुठेही असलो तरी, माझ्या एकटेपणाला सोबत करायला 'आई' हळुवार पावलाने येते. कधी-कधी माणसांच्या मेळ्यात, नात्यांच्या गोतावळ्यात, माझ्या एकाकी मनाची आई सोबती होते. एकटेपणाच्या गर्तेतून आई माझा उजवा हात हाती धरून, डावा हात पाठीवर फिरवून येणा-या प्रत्येक संकटाशी धैर्याने सामोरे जाणाचे बळ देते. त्यावेळी ती खूप काही सांगते. तिला लाभलेल्या छोट्याशा आयुष्यातील ब-या-वाईट अनुभवाचं संचित आई माझ्या पुढयात ठेवेत... कोजागिरीच्या पिठूर चांदण्यात आईची गोरी कांती अधिकच उजळून निघायची. सर्वांसाठी द्रवणारं तिचं ह्रदय, आजही कळत नाही तिच्या ह्रदयाचा थांग. कुठून साठवलं होतं तिनं एवढं प्रेम, एवढा जिव्हाळा. तिच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाचं तिच्याशी आपलेपणाचं नातं. 'उपाशीपोटी पाण्याच्या घोटी सपान पडतं आभाळ झडतं ग आभाळ झडतं' अशी मनाची अवस्था झाली की, मनाच्याही नकळत मनभर व्यापून राहाते आई; आणि म्हणूनच प्रत्येक ...

इंदू मिल : वृत्तवाहिन्यांचे राजकराण

गेल्या काही वर्षांपासून धगधगत असलेला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा देण्याचा मुद्दा आज निकाली निघाला. संसदेच्या दोन्ही सभागृहात जागा देण्याच्या निर्णयाची घोषणा करण्यात आली. बाके वाजवून सर्व खासदारांनी त्याचे स्वागत केले. तर, मुबंई आणि राज्यातील इतर शहरांमध्ये आंबेडकरी जनतेने पेढे वाटून, फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. हा आनंदोत्सव दाखवत असतानाच, मराठी वृत्तवाहिन्या या आंदोलनाचे प्रणेते आनंदराज आंबेडकर, रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले, भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर, राष्टावादी काँग्रेसचे विजय कांबळे यांची प्रत्यक्ष किंवा फोनद्वारे प्रतिक्रीया घेत होते. तेव्हा सहाजिकच आता तुम्हाला काय वाटते हा प्रश्न होता, आणि त्याचे स्वाभाविक उत्तर होते, हा आनंदाचा क्षण आहे. आंबेडकरी जनतेचा हा विजय आहे. आंबेडकरी जनतेच्या ह्या जल्लोषात बेकीचे बीज पेरण्याचे काम काही वृत्तवाहिन्या करताना दिसत होत्या. या विजयाचे श्रेय कोणाला देणार?  हा प्रश्न वारंवार विचारला जात होता. मंगळवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या नेतृत्वातील शिष्टमं...

स्मारकाचे राजकारण आणि आपण

महाराष्ट्र आणि देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने राजकरण करणा-यांची कमी नाही. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात हजारो कार्यकर्ते हे आंबेडकरी विचारधारेने वेगवेगळ्या पक्षात, संघटनांमध्ये, संस्थामध्ये काम करतात. त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि त्यांच्या पोटाखाली गेलेले रामदास आठवले यांचा गट. यांच्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बहुजन समाज पक्ष व रिपब्लिकन पक्षाचेही शेकडो गट राज्यात कार्यरत आहेत. त्यांची यादी इथे देणेही शक्य होणार नाही एवढी त्यांची संख्या आहे.  एवढ्या विविध पक्ष आणि रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटांमध्ये कार्यरत असलेल्या नेते आणि कार्यकर्त्यांचे राजकारण हे एकाच नावाभवती फिरत आले आहे. ते म्हणजे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर. १९५६ च्या डिसेंबरमध्ये बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले. तेव्हापासून आता २०१२ म्हणजे तब्बल ५६ वर्षात बाबासाहेबांच्या नावाने सर्वच पक्षांनी राजकारण केले आहे. बहुजन समाज पक्षाला सोडल्यास इतर कोणत्याही दलित पक्षाला सत्ता संपादन करता आलेली नाही. मात्र, बाबासाहेबांच्या नावाने काँग्रेसपासून आता आताच्या मनसेनेही म...