मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जानेवारी, २०१३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

करार

२०१३ हे अजून एक नवे वर्ष सुरु झाले. कित्येकांनी अनेक संकल्प केले असतील. (त्याला काहीजण 'संकल्प सोडला' असेही म्हणतात! संकल्प सोडला म्हटल्यावर पुढे त्याचा पाठपुरावा करण्याची गरजच काय, असा प्रश्न मला नेहमी पडतो. असो. ) कॉलेजात असताना अनेक वेळेस सकाळीच उठून व्यायाम करण्याचा संकल्प कित्येक वर्ष नित्यनियमाने केला होता, आणि नित्यनियमाने त्यात विसरही पडत आला आहे. आताही काही त्रास जाणवला की, व्यायाम करण्याचा संकल्प केला जातो आणि जेवढ्या तत्परतेने संकल्प केला जातो तेवढ्याच तत्परतेने तो विसरला देखील जातो. असे नव वर्षाच्या संकल्पांचे आणि माझे आतापर्यंतचे नाते राहीलेले आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून संकल्प न करण्याचाच संकल्प केला आहे. मात्र, वरील सवयीप्रमाणे हा संकल्पही मोडीत निघतोच. असो. हे संकल्पाचे प्रवचन कितीही लांबवले तरी लांबतच राहील. मी स्वतःला बौद्ध धम्माचा अनुयायी समजतो. तसा जन्मानेच बौद्ध असल्यामुळे त्यात मी काही समजण्याचा प्रश्न उरतच नाही. पण, मी बौद्ध आहे म्हणजे नेमका कोण आहे? भगवान बुद्धांचा जयघोष आणि बाबासाहेबांचा विजय असो किंवा उठता-बसता जयभीम. सालाबादाप्रमाणे येणा...