चाळीशी. हा शब्द वयोमानाच्या स्वरूपात पाहिल्यास वृद्धत्वाकडे झुकणारा आहे. काहीजण मात्र, चाळीशीतही विशीच्या जोशात असतात. त्यांचे कौतूक करावे तेवढे थोडे. असो. चाळीशीबद्दल बोलण्यासाठी आजचा ब्लॉग नाही, याचे कारण वेगळेच आहे. माझा आजचा ब्लॉग हा चाळीसावा आहे, (शतकापासून केवळ साठी दूर आहे.)हे प्रकाशित करण्याच्या काही क्षण आधी कळाले आणि त्यासोबतच आजच बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाला चाळीस वर्ष पूर्ण होत आहेत, त्यामुळे थोडासा 'योगायोग' हा शब्द आपल्या ब्लॉगवर असावा यासाठी हा खटाटोप. तर, आजचा विषय आहे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व त्यांच्या थीम पार्कची कल्पना आणि त्यांच्या नव्या मित्रपक्षाच्या मागणीकडे त्यांनी केलेला कानाडोळा. (याला योगायोग म्हणायचे की नाही हे तुम्हीच ठरवा.) नवा मित्र पक्ष म्हटल्यावर सुज्ञ वाचकांना कळाले असेलच, कोण आहे ते. त्यात तुमचा वेळ आणि माझे शब्द खर्च न करता त्यांची मागणी काय तेच सोंगतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे काम १५ ऑगस्ट पर्यंत सुरू करावे. मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथे शिवसेनेला थीम प...