पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय नियोजन आयोग, यीपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेतील राष्ट्रीय सल्लागार परिषद यांसारख्या भारत सरकारच्या महत्त्वाच्या समित्यांवर आणि रिझर्व्ह बँकेसह देश-विदेशातील अविकसीत भागांच्या विकासासाठीच्या कामाचा अनुभव असलेले डॉ. नरेंद्र जाधव यांना लोकसभेचे वेध लागले आहेत. अर्थशास्त्र आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रांमध्ये डॉ. मनमोहन सिंह यांना गुरु मानणा-या डॉ. जाधवांनी राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. आज औरंगाबाद भेटीत त्यांनी नियोजन आयोगाचे सदस्यत्व संपल्यानंतर मराठवाड्याच्या विकासासाठी काम करण्याचा मनोदय व्यक्त केला. मराठवाडा हा पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाच्या तुलनेतही मागे आहे. येथील समतोल विकासासाठी नियोजनबद्ध कार्यक्रमाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. त्याच बरोबर येथील मातीमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन क्षमता आणि माणसांमध्ये गुणवत्ता आहे. मात्र, येथील सर्वांगिण विकासासाठी पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून काम करण्याची गरज आहे. मी काँग्रेस पक्षाकडून लोकसभेची निवडणूक लढविण्यास इच्छूक असलो तरी विकासासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन का...