मुख्य सामग्रीवर वगळा

डॉ. नरेंद्र जाधव यांच्या मराठवाडा विकास कार्याला हार्दिक शुभेच्छा

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय नियोजन आयोग, यीपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेतील राष्ट्रीय सल्लागार परिषद यांसारख्या भारत सरकारच्या महत्त्वाच्या समित्यांवर  आणि रिझर्व्ह बँकेसह देश-विदेशातील अविकसीत भागांच्या विकासासाठीच्या कामाचा अनुभव असलेले डॉ. नरेंद्र जाधव यांना लोकसभेचे वेध लागले आहेत. अर्थशास्त्र आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रांमध्ये डॉ. मनमोहन सिंह यांना गुरु मानणा-या डॉ. जाधवांनी राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. आज औरंगाबाद भेटीत त्यांनी नियोजन आयोगाचे सदस्यत्व संपल्यानंतर मराठवाड्याच्या विकासासाठी काम करण्याचा मनोदय व्यक्त केला. मराठवाडा हा पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाच्या तुलनेतही मागे आहे. येथील समतोल विकासासाठी नियोजनबद्ध कार्यक्रमाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. त्याच बरोबर येथील मातीमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन क्षमता आणि माणसांमध्ये गुणवत्ता आहे. मात्र, येथील सर्वांगिण विकासासाठी पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून काम करण्याची गरज आहे. मी काँग्रेस पक्षाकडून लोकसभेची निवडणूक लढविण्यास इच्छूक असलो तरी विकासासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

रिझर्व्ह बँकेतील कामाचा अनुभव, अविकसीत इथिओपिया आणि अफगाणिस्तानातील युद्धानंतर तेथील अर्थव्यवस्थेची घडी बसवण्यासाठी डॉ. जाधवांच्या अध्यक्षतेखालील समितीने काम केले. याशिवाय नियोजन आयोगातील चार वर्षांचा केंद्रीय पातळीवरील काम करण्याचा आणि योजना कशा पद्धतीने राबवाव्या याचा कृतिशिल अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. याचा फायदा मराठवाड्याला नक्की होईल. निवडणूक लढलो किंवा नाही तरीही मराठवाड्यासाठी पुढील काही वर्ष काम करण्याची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी औरंगाबादमध्ये संशोधन संस्था स्थापन करून कामाला सुरुवात केली जाणार आहे. 

मराठवाड्याचा विकास कसा होईल यासाठी 1984 मध्ये वि.म.दांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने केलेल्या शिफारसी अद्यापही लागू झालेल्या नाहीत काळाच्या ओघात आता त्या गैरलागू होण्याचीही शक्यता आहे. याचीच जाणीव सरकारला झाली असावी म्हणून डॉ. विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील अविकसीत जिल्ह्यांच्या समतोल विकासासाठी कार्यक्रम निश्चित करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली. डॉ. केळकर समितीने अहवाल सरकार दरबारी दिला आहे. अजून तो सर्वसामान्यांसाठी खुला झालेला नाही. मात्र दांडेकर समितीने मराठवाड्याचा अनुशेष भरण्याची जी शिफारस केली होती. ती अद्यापही तशीच आहे. त्यासाठी येथील राजकीय नेतृत्वही मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे. मराठवाड्याचा सर्वांगिण विकास होईल असा कार्यक्रम घेऊन लढणारा एकही नेता मिळालेला नाही. गटागटाने आणि आपापल्या पक्ष-संघटनांच्या पातळीवर लढणारे अनेक आहेत मात्र त्यांची संघटीत शक्ती उभी राहिलेली नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना या मागास भागाची किती चिंता होती याची प्रचिती त्यांनी येथे मिलिंद महाविद्यालयाच्या रुपाने उभी केलेल्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून येते. निजामाच्या राजवटीतील मराठवाडा महाराष्ट्रात आला मात्र या भागाच्या विकासासाठी कोणत्याही नेत्याने काम केलेले दिसत नाही.

विलासराव देशमुखांच्या रुपाने राजकीय नेतृत्व मराठावाड्याला मिळाले होते. मात्र त्यांनी लातूरपलिकडे फारसे कधी लक्ष दिले नाही. अशाच पद्धतीने प्रत्येक जिल्ह्याचा सीमित आणि संकूचित विकास झालेला आहे. डॉ. नरेंद्र जाधव मराठवाड्याच्या समतोल विकासासाठी यापुढे काम करणार असल्याचे म्हणत आहेत. मात्र आगामी लोकसभेत जर त्यांना तिकीट नाकारले गेले किंवा तिकीट मिळूनही ते पराभूत झाले तरीही ते येथे एक संशोधक आणि कार्यकर्ता म्हणून काम करतील का ? आणि ते जर असे करणार असतील तर त्यांच्या अनुभवाचा येथील मातीला नक्कीच फायदा होणार आहे. 

बाबासाहेबांचे विचार घराघरांत पोहचावे आणि प्रत्येकाला समजावे या उद्देशाने त्यांनी ''बोल महामानवाचे''  या बाबासाहेबांच्या 537 भाषणांचा तीन खंडात संग्रह केला आहे. त्यानंतर ''प्रज्ञा महामानवाची'' हे बाबासाहेबांचे समग्र लेखन दोन खंडात समोर आणले आहे. यातील पहिल्या खंडात डॉ. बाबासाहेबांचे राजकीय लेखन आहे तर दुस-या खंडात अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, कायदा, संविधान आणि धर्मशास्त्र यावर केलेले लेखन आहे. पुणे विद्यापिठाचे कुलगुरू राहिलेले डॉ. जाधव यांच्याकडे आजही केंद्रीय पातळीवरील अनेक जबाबद-या आहेत. त्या सांभाळून त्यांनी केलेले हे कार्य नक्कीच कौतुकास्पद आहे.

डॉ. बाबासाहेबांच्या विचाराने भारलेला आणि नियोजनाला कृतिची जोड असलेला अर्थतज्ज्ञ जर मराठवाड्यासाठी झटणार असेल तर (त्यांनी काम सुरू केले आणि लागलीच मागास मराठवाड्याचा कायापालट झाला असे होणार नाही.) मराठवाड्याची समतोल विकासाकडे वाटचाल होणार हे नक्की आहे.  त्यांच्या या कार्यास शुभेच्छा..

टिप्पण्या

  1. Bhai aapan lihilya pramane Jadhav sirancha anubhav , kamachi paddhat nakkich marathwadyachya vikisat ek mahtwacha MILESTONE tharu shakte.
    Aani congress ne Jadhav siranchi upyogita lakshat gheun tyanchya hushrich tyanchya pakshachya tasech deshacha vikasati upyog karun ghyava.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. जाधव सर, आपल्या बहुमोल प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद. आपल्या सारख्या वाचकांच्या सुचना आणि प्रतिक्रीयाच माझ्या लेखनाचे बळ आहे. पुनश्च एकदा धन्यवाद..

      हटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

योगीसाठी शहीदाच्या घरी लावला एसी, दानवेंच्या दारी आलेली शेतकऱ्यांची पोरं 'उपाशी'

शहीदाच्या कुटुंबाचीही देशभक्तीचे उमाळे येणारं सरकार थट्टा करु शकते, याचे ताजे उदाहरण उत्तर प्रदेशात पाहायला मिळाले आहे. भारत 'माते'साठी जीवाची बाजी लावून लढणाऱ्या शहीद प्रेम सागर यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी योगी आदित्यनाथांना 11 दिवस लागले. (की माहित नाही योगी मयताच्या दहाव्यानंतरच त्या घरात जातात असा काही नियम आहे.) हरकत नाही. ते शहीदाच्या घरी गेले. त्याच्या आदल्या रात्री उत्तर प्रदेशातील देवरिया या शहीद प्रेम सागर यांच्या घरी एसी, सोफा सेट, गालिचा आणि काही भगवी वस्त्रे पाठवण्यात आली होती. एवढेच नाही तर घरातील टॉवेल ही बदलण्यात आले होते. एका रात्रीतून एसी लाकडी बल्ल्यांवर फीट करण्यात आला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आले, त्यांनी शहीदाचे घर पाहिले, कुटुंबियांची भेट घेतली आणि कोरडी आश्वासने देऊन ते आल्या पावली परत गेले. शहीद प्रेम सागर यांच्या कुटुंबियांना वाटले होते की आदल्या रात्री आलेल्या वस्तू आता आपल्याच घरात राहातील. मुलगा गेला तरी सरकारने आपल्याला वाऱ्यावर सोडले नाही, मात्र त्यांचा हा भ्रम होता. शहीद प्रेम सागर यांचे वडील इश्वर चंद्र यांनी एका दैनिकाला दिलेल्य...

गरज थोड्या लवचिकतेची

वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातील एक मोठ्या व्होट बँकचा पूर्ण ताकदीने पाठिंबा आहे. हा मतदार स्वाभिमानी, विचारकरणारा आणि आंबेडकरी घराण्यावर निष्ठा असलेला निष्ठावान आहे. मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (भारिप), भारिप बहुजन महासंघ, २०१४ मध्ये डाव्यांसोबत केलेली आघाडी, २०१९ लोकसभा निवडणुकीत  एमआयएमला सोबत घेऊन लढवलेली निवडणूक, आणि विधानसभेत एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन केलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग. बाळासाहेबांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या या सर्व प्रयोगांमध्ये 'आंबेडकर'नावावर जीव ओवाळून टाकणारा मतदार तन-मन-धनाने त्यांच्यासोबत राहिला आहे. मात्र या निष्ठावान जनतेला अद्याप सत्तेची चव चाखायला मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत 'वंचित' उमेदवारांना मिळालेली मते पाहिल्यास स्पष्ट होते की, बौद्ध समाजाने बाळासाहेबांच्या नावावर भरभरुन मतदान केले आहे. मात्र बाळासाहेब ज्या ओबीसी, ओबीसींमधील छोट्या जाती, धनगर, अलुतेदार, बलुतेदार, आदिवासी, लिंगायत यांना सोबत घेऊन सत्ता संपादनाची इच्छा व्यक्त करत आहेत तो समाज पूर्ण ताकदीने बाळासाहेबांसोबत आल...

हा कसला फकीर... हा तर बेफिकीर पंतप्रधान - राज ठाकरे

हा कसला फकीर... हा तर बेफिकीर पंतप्रधान - राज ठाकरे १७व्या लोकसभेत महाराष्ट्रासह देशभर सध्या कोणाचे भाषण गाजत असेल तर ते आहे राज ठाकरे यांचे. महाराष्ट्राला राजकीय वक्त्यांची मोठी पंरपरा लाभलेली आहे. बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय सभा मारून नेईल असा सध्या एकमेव नेता आहे, ते म्हणजे राज ठाकरे. त्यासोबतच नाव घ्यावे लागेल 'हैदराबादी शेरवानी' अर्थात बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांचे. ओवेसी महाराष्ट्रीयन नसले तरी, यंदाच्या निवडणुकीत त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांसोबत महाराष्ट्रात अनेक दौरे करुन महाराष्ट्रीयन जनतेची नस अचूक ओळखल्याचे प्रत्येक सभेतून पाहायला मिळाले. राज ठाकरे यांचे 'लाव रे तो व्हिडिओ' हे आता वाक्य राहिले नाही तर ती एक फ्रेज झाली आहे. राज यांची भाषणे महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही चर्चेत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या उरात धडकी भरवणारे त्यांचे 'लाव रे तो व्हिडिओ' सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. एकही उमेदवार उभा केलेला नसताना राज्यात सर्वाधिक चर्चा आहे ती राज ठाकरे यांची. उद्याच्या सभेत राज ठाकरे...