महाराष्ट्रातील निवडणुका संपल्या आणि दिवळीला सुरवात झाली आहे.या दोन्ही सणांच्या दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा या गावातील आई, वडिल आणि मुलगा या उमेदीच्या वयातील कुटुंबाची हत्या करून त्यांचे तुकडे करून विहीरीत टाकण्यात आले. आता राज्यात कोणाचेही सरकार नसल्यामुळे कोणी मंत्री फिरकणार नाही, निवडणुका संपल्यामुळे आमदार आणि काल आमदार होण्याच्या शर्यतीतीलही फिरकणार नाहीत. रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर तेवढे अत्याचार पर्यटन करुन येतील. पुढे काय? नगरमध्ये याआधीही काही महिन्यांपूर्वी अशाच दोन घटना झाल्या ही, तिसरी! एवढेच काय ते येथील पोलिस प्रशासनासाठी या घटनचे महत्त्व. सहा महिन्यांपूर्वी नितीन आगे या तरुणाचे हत्याकांड झाले होते. त्याच्या आरोपींचे काय झाले हे नंतर दलित नेत्यांनी प्रशासन आणि राज्यकर्त्यांना विचारले का? तर याचे उत्तर नाही असेच आहे.काल हत्याकांड झालेल्या सुनील जयश्री संजय जाधव या मुलगा - आई - वडिलांच्या हत्याकांडाचे वेगळे काय होणार. याला तुम्ही आणि मी जबाबदार नाही का? नगरमध्येच का हत्या होत आहेत असा माझा प्रश्न नाही, तर दलितांवरच ही वेळ का येत आहे? ...