देशात लोकशाही आहे हे आज पुन्हा एकदा राज्यसभेच्या माध्यमातून सिद्ध झाले आले आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना देशाचे भाषणबाज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधीपक्षाच्या सदस्यांना अनेक टोमणे मारले आणि तुम्हाला 'ऐकावेच लागेल' हे एक नव्हे तर तीन वेळा म्हटले. तेव्हा त्यांचा बोलण्याचा टोन हा स्वतःच्या नावाचा सुट घालणार्या एका देशाच्या राजासारखा होता. त्यामुळेच विरोधीपक्षातील सदस्य नाराज झाले आणि त्यांनी सरकारला जमीनीवर आणले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचूरी यांनी काळ्या धनावर सरकार अपयशी झाल्याचे राष्ट्रपतींच्या भाषणात संशोधन करावे हा प्रस्ताव आणला होता. पंतप्रधानांच्या भाषणानंतर तो मागे घेण्यास त्यांनी नकार दिला. त्यावर राज्यसभेचे पदसिद्ध सभापती उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी त्यांना परत-परत विचारले, तुम्हाला प्रस्ताव मतविभाजनासाठी ठेवायचा आहे??? त्यावर येचूरी यांनी होय असे सांगितले आणि सरकारचा राज्यसभेत धन्यवाद प्रस्तावावर 118 विरुद्ध 57 असा लाजीरवाणा पराभव झाला. वास्तविक वरिष्ठ सभागृहात सरकारचे 72 सदस्य आहेत. मात...