देशात लोकशाही आहे हे आज पुन्हा एकदा राज्यसभेच्या माध्यमातून सिद्ध झाले आले आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना देशाचे भाषणबाज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधीपक्षाच्या सदस्यांना अनेक टोमणे मारले आणि तुम्हाला 'ऐकावेच लागेल' हे एक नव्हे तर तीन वेळा म्हटले. तेव्हा त्यांचा बोलण्याचा टोन हा स्वतःच्या नावाचा सुट घालणार्या एका देशाच्या राजासारखा होता. त्यामुळेच विरोधीपक्षातील सदस्य नाराज झाले आणि त्यांनी सरकारला जमीनीवर आणले.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचूरी यांनी काळ्या धनावर सरकार अपयशी झाल्याचे राष्ट्रपतींच्या भाषणात संशोधन करावे हा प्रस्ताव आणला होता. पंतप्रधानांच्या भाषणानंतर तो मागे घेण्यास त्यांनी नकार दिला. त्यावर राज्यसभेचे पदसिद्ध सभापती उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी त्यांना परत-परत विचारले, तुम्हाला प्रस्ताव मतविभाजनासाठी ठेवायचा आहे??? त्यावर येचूरी यांनी होय असे सांगितले आणि सरकारचा राज्यसभेत धन्यवाद प्रस्तावावर 118 विरुद्ध 57 असा लाजीरवाणा पराभव झाला. वास्तविक वरिष्ठ सभागृहात सरकारचे 72 सदस्य आहेत. मात्र गुड गव्हर्नंन्सचा दावा करणार्या मोदींचे 15 खासदार कुठे गेले होते याचा त्यांनी शोध घेतला पाहिजे.
पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणात विरोधकांना शालजोडे दिले होते. त्याचा परतावा विरोधकांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणात संशोधन करुन तत्काळ केला. राज्यसभेची परंपरा राहिली आहे की, पंतप्रधान किंवा सभागृह नेत्याच्या भाषणानंतर त्यावर विरोधक प्रश्न विचारू शकतात. मात्र, एककलमी कार्यक्रम राबवणारे मोदी आपले भपकेबाज भाषण ठोकून तत्काळ सभागृहातून बाहेर पडले. मी बोलल्यानंतर बाकीचे कोणी बोलायची गरजच नाही असाच काहीसा त्यांचा समज असावा. पण आपण हुकूमशाही नाही तर लोकशाही देशात राहातो आणि लोकशाही राष्ट्राचे पंतप्रधान आहोत याचा त्यांना कदाचित भाषणानंतर विसर पडला असावा. परंतू त्यांच्या मंत्रिमंडळातील फ्लोअर मॅनेजमेंट करणारे व्यंकय्या नायडू यांना हे चांगले ज्ञात होते की येथे आपण कमजोर आहोत. त्यामुळे काँग्रेस सदस्य गुलामनबी आझाद यांच्याजवळ जाऊन त्यांनी मतविभाजनाची गरज नसल्याचे सांगितल्याचे सर्वांनी पाहिले. त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेकांची तेव्हा धावपळ झाली, पण पंतप्रधान कुठे गेले होते हे काही कळले नाही.
पंतप्रधान जर स्वतःच्या भाषणानंतर सभागृहात थांबले असते आणि त्यांनी विरोधकांच्या प्रश्नांचा सामना केला असता तर लोकसभेत बहुमतात असलेल्या सरकारवर आज ही नामुष्की आली नसती. गुजरात विधानसभेत मोदी दिसतच नव्हते हे ऐकून होतो, मात्र आज त्याची प्रचिती आली आहे. यामुळे एक बरे झाले लोकशाहीत तुम्हाला विरोधकांच्या मतालाही किंमत दिली पाहिजे हे अधोरेखीत झाले. केवळ भाषणातूनच आम्ही सर्वांच्या मतांचा आदर करतो हे बोलून चालत नाही तर तसे वागावे देखील लागते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा