मुख्य सामग्रीवर वगळा

तुझेच धम्मचक्र फिरे जगावरी...

अशोक विजयादशमी आणि ५3 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त हार्दिक शुभेच्छा!

आज ५3 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पावन दिवशी सर्व मित्र, बंधू आणि भगिनींना माझ्या हार्दिक शुभेच्छा !

सम्राट अशोकाने विजयादशमीच्या दिवशी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि बुद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसारा साठी आपले जीवन समर्पित केले. याच विजयादशमीच्या दिवशी म्हणजेच १४ अक्टोंबर १९५६ रोजी नागपुर च्या पवित्र दीक्षाभूमिला आपल्या पाच लाख अनुयायी सोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली. म्हणून या दिवसाला दुहेरी महत्व प्राप्त झाले आहे. किती पावन दिवस तो आणि किती पावन ती भूमी, दीक्षाभूमी !

आजही देशाच्या काना कोप-याहून "जय भीम बोलो और दीक्षाभूमी चलो" चे नारे लावत आंबेडकरी जनसमुदाय दीक्षाभूमिला येतो. जयभीम आणि बाबासाहेबांच्या जयघोषांनी सर्व परिसर दुमदुमून जातो. जिकडे तिकडे सभा, भीमस्तुतीची गाणी आणि बुद्ध वंदना तसेच बुद्ध-भीम गीतांनी पूर्ण परिसर पवित्र होऊन जातो.मंगलमय होतो. स्तुपाच्या दर्शनासाठी जनतेची खुप लांब रांग असते ... बाबासाहेबांच्या पदस्पर्षाने पुणित झालेली माती श्रध्देने भाळी लावून घेतात. बाबासाहेबांचा जयजयकार करीत आणि बुद्ध वंदनेचा उच्चार करीत स्तुपाचे दर्शन घेतात आणि त्या महामानवास म्हणतात की "भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना, आज घे ओथंबलेल्या आसवांची वंदना!"
पञ्चशिलाचे पठन करतात आणि म्हणतात "तुझाच गौतमा पडे प्रकाश अंतरी, तुझेच धम्मचक्र हे फिरे जगा वरी."
बुद्धं शरणम गच्छामी!
धम्मम शरणम गच्छामी!
संघम शरणम गच्छामी!

पञ्चशील या प्रकारे आहेत :
१) मी जीवहींसे पासून अलिप्त राहण्याचा प्रण करतो.
२) मी चोरी करण्या पासून अलिप्त राहण्याचा प्रण करतो.
३) मी कामवासना आणि व्यभिचारा पासून अलिप्त राहण्याचा प्रण करतो.
४) मी खोट बोलणे आणि निंदा नालस्ती करण्या पासून अलिप्त राहण्याचा प्रण करतो.
५) मी मद्य आणि इतर मादक पदार्थांच्यासेवना पासून अलिप्त राहण्याचा प्रण करतो.

..................................................

बाबासाहेबांनी धम्मदीक्षा घेऊन आपल्या लाखो अनुयायांचे जीवन बदलून टाकलं. या समाजाचे शेणाचे हात पेणाला लावले आणि या समाजाने एक अनोखं अनुभव विश्व जगासमोर आणलं. हजारो वर्ष खितपतपडलेला समाजात बाबासाहेबांनी रक्तहिन क्रांती घडविली. हिंदू धर्मात जन्मलो पण हिंदू म्हणून मरणार नाही हि प्रतिज्ञा 21 वर्ष जगातील सर्व धर्मांचा आभ्यास करुन पुर्ण केली. माणसाला माणूस म्हणून जगवणारा धर्म स्विकारला.बाबासाहेबांनी केलेल्या धर्मोल्लंघनाला आज 53 वर्ष पुर्ण होत आहेत . हा धम्मचक्र प्रवर्तन दिन चुरायु होवो. बोधीसत्व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी प्रणाम.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरातील गाळ आणि चिखल

महाराष्ट्रात पुराने थैमान घातले आहे. सांगली, कोल्हापूर आणि सातारा शब्दशः पाण्याखाली गेला आहे. फक्त महाराष्ट्रच नाही तर केरळ, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश आणि राजस्थानही पावसाने धो-धो धुतले आहे. कोल्हापूरच्या पावसाच्या आणि पुराच्या बातम्या टीव्ही मीडियाने जरा बऱ्यापैकी दाखवण्यास सुरुवात केली होती. त्याचवेळी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस विदर्भातून महाजनादेश यात्रेवर निघाले होते. त्यांचा सहकारी पक्ष शिवसेनेची धाकटी पाती आदित्य ठाकरेची जनआशीर्वाद यात्रा सुरुच होती. या दोन्हीही यात्रा मीडिया पुराच्या पाण्यासोबत दाखवत होते. या दोन्ही मतांचा जोगवा मागणाऱ्या यात्रांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसही शिवाजी महाराजांचे नाव घेऊन टीव्हीतील संभाजी महाराजांना घेऊन शिवस्वराज्य यात्रेवर निघाली होती. या सर्व राजकीय यात्रा सुरु झाल्याबरोबरच मुंबई आणि कोकणात पावसाला सुरुवात झाली होती. मुख्यमंत्री फडणवीस अमरावतीहून गडचिरोलीला जाईपर्यंत पाऊस कोकणातून पश्चिम महाराष्ट्राकडे वळला होता. कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात पाऊस धो-धो बरसत होता. दिवसागणिक नाही तर तासातासाला पाणीपातळीत वाढ होत होती. राधानग...

भारत किती स्वच्छ

>> भारत किती स्वच्छ  नुकत्याच झालेल्या गांधी जयंतीला 'स्वच्छ भारत' अभियानाला एक वर्ष पूर्ण झाले.  या दिवशी गांधींऐवजी,  त्यांनी भगवान गौतम बुद्धांपासून घेतलेल्या अहिंसे ऐवजी स्वच्छतेचीच चर्चा जिकडे तिकडे होती. ही चांगली गोष्ट देखील आहे. लोक स्वच्छतेबाबत जागरुक होत आहे यात कोणालाही अडचण असण्याचे काही कारण नाही. महापुरुष हे आंधळ्यांच्या हाती लागलेल्या हत्तीसारखे असतात. ज्यांच्या हाताला जो भाग लागला ते त्याच अनुषंगाने त्यांचे विश्लेषण करतात यात महापुरुषाला दोष देता येणार नाही. केंद्रात भाजपचे सरकार (एनडीएचे सरकार आहे हे एनडीएचे घटक पक्षही विसरले असतील आतापर्यंत) आल्यापासून गांधींच्या अहिंसेऐवजी त्यांची स्वच्छताच अधिक चर्चेत आली आहे. नाही तर काँग्रेसच्या काळात गांधी जयंतीच्या आधीपासून आणि नंतरचे काही दिवस गांधींवर तत्कालिन माध्यमांमध्ये जी चर्चा होत होती त्यात गांधीचा स्वातंत्र्यासाठीचा लढा... हातात शस्त्र न घेता इंग्रजांची सत्ता उलथवून टाकणे... अहिंसेचे पुजारी... अशाच गांधींची चर्चा होत होती. आता वर्ध्यातील आश्रमात गांधींनी कोणाकोणाला संडास साफ करायला लावले. संडा...

गरज थोड्या लवचिकतेची

वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातील एक मोठ्या व्होट बँकचा पूर्ण ताकदीने पाठिंबा आहे. हा मतदार स्वाभिमानी, विचारकरणारा आणि आंबेडकरी घराण्यावर निष्ठा असलेला निष्ठावान आहे. मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (भारिप), भारिप बहुजन महासंघ, २०१४ मध्ये डाव्यांसोबत केलेली आघाडी, २०१९ लोकसभा निवडणुकीत  एमआयएमला सोबत घेऊन लढवलेली निवडणूक, आणि विधानसभेत एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन केलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग. बाळासाहेबांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या या सर्व प्रयोगांमध्ये 'आंबेडकर'नावावर जीव ओवाळून टाकणारा मतदार तन-मन-धनाने त्यांच्यासोबत राहिला आहे. मात्र या निष्ठावान जनतेला अद्याप सत्तेची चव चाखायला मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत 'वंचित' उमेदवारांना मिळालेली मते पाहिल्यास स्पष्ट होते की, बौद्ध समाजाने बाळासाहेबांच्या नावावर भरभरुन मतदान केले आहे. मात्र बाळासाहेब ज्या ओबीसी, ओबीसींमधील छोट्या जाती, धनगर, अलुतेदार, बलुतेदार, आदिवासी, लिंगायत यांना सोबत घेऊन सत्ता संपादनाची इच्छा व्यक्त करत आहेत तो समाज पूर्ण ताकदीने बाळासाहेबांसोबत आल...