मुख्य सामग्रीवर वगळा

अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली !

6 डिसेंबर हा दिवस महाराष्ट्रातील आणि देशातील तमाम दलित जनता कधीच विसरू शकणारी नाही. याच दिवशी सर्व दलित, पिडित, तळागळातील समाजाचे उध्दारकर्ते भारतरत्न बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले. या घटनेला उद्या 53 वर्ष होतील. या 53 वर्षात प्रामुख्याने महाराष्ट्रातील दलित चळवळ ही आंबेडकरी चळवळ म्हणून नावारुपास आली. बाबासाहेबांनतर कर्मवीर दादासाहेब गायकवाडांनी चळवळीला एका विशिष्ट टप्प्यावर नेऊन ठेवले. मात्र त्यांच्यानंतरच्या पिढीने रिपब्लिकन पक्ष आणि दलित चळवळ बौध्दांपूरती मर्यादीत करुन टाकली. आजच्या रिपब्लिकन नेत्यांनीतर आपापल्या वाट्याहिश्याला येईल तेवढे काखोटीला मारण्याचा एकमेव कार्यक्रम केलेला आहे. त्यात कोणी खासदारकी तर कोणी राज्यपालपदाची येस्करकी मिळवण्यातच धन्यता मानलेली आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत प्रमुख रिपाई नेते रामदास आठवले, प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर, जोगेंद्र कवाडे, टी.एम. कांबळे, यांचे संसदीय राजकारण संपुष्टात आल्यातच जमा आहे. यातील एकही जण खासदार होऊन देशाच्या संसदेत तर गेलेच नाही मात्र बाळासाहेब आंबेडकर वगळता महाराष्ट्रातही एक आमदार देखील कुणाकडे नाही. नवा मतदार यानेत्यांनी तोडला आहे. त्याला हे नेते जोडूच शकलेले दिसत नाही. 80 नंतरची तरुणपिढी ही कुठेच रिपब्लिकन पक्षासोबत जोडली गेलीय असं चित्र नाही. प्रामुख्याने उच्चशिक्षीत तरुण. मग तो तरुण डॉक्टर,वकिल, इंजिनियर, मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करणारा, हा तरुण कुठेच चळवळीशी जोडलेला नाही. याचे कारणे शोधण्याचीही तसदी ही तथाकथीत नेतेमंडळी घेतांना दिसत नाही.

आजची सामाजीक मानसीकता बदलली आहे. रोजगाराच्या संधी बदलल्या आहेत. तरीही नेते पारंपरिक प्रश्नांवरच आपले लढे उभारत आहे. आज गायरान जमीन किंवा शिष्यवृत्ती वाढीचा मुद्दा महत्त्वाचा नाही तर नव्याने निर्माण झालेल्या सामाजिक आर्थिक परिस्थितीत आपले अस्तित्व कुठे आहे , उद्या आपण कुठे असणार आहोत, याचा ताळेबंद यांच्याकडे नाही. ग्रामीण भागातील शेतक-यांच्या समस्या काय, कारखाने बंद पडल्यामुळे बेरोजगार झालेल्या दलित बहुजन माणसाचे काय आणि खासगी विद्यापीठांमधील महागडे शिक्षण, व्यवसायीक शिक्षण, तंत्र शिक्षण दलित - बहुजन तरुणांना कसे उपलब्ध होईल यासाठी आंदोलन उभारण्याची गरज आहे. नव्या नोकरीच्या संधी कुठे आहेत, त्यासाठी कोणते शिक्षण आवश्यक आहे. याची माहिती या तरुणांना तथाकथीत आंबेडकरी विचारवंत, नेत्यांकडून मिळायला हवी. जर या नव्या पिढीच्या रोजीरोटीच्या प्रश्नांना या नेत्यांकडे प्राधान्य नसेल तर त्यांनाही यानेत्यांचे अस्तित्व नकोशे झाले तर आश्चर्य वाटायला नको.

सत्तेच्या चाव्या आपल्याकडे ठेवता येईल एवढे संख्याबळ असूनही आज तुकड्या तुकड्यांमधे आपण विभागलो गेलो आहोत. त्यामुळे सत्तेच्या दारात उभेराहण्याचीही आपली लायकी उरलेली नाही. अशी सध्याची अवस्था आहे. यासर्वांनी एकत्र लढा उभारावा असाही आग्रह नाही. मात्र जे काही करणार असतील त्यात त्यांनी नव्याचा शोध घ्यावा एवढी आपेक्षा आहे. बाबासाहेबांच्या 53 व्या महापरिनिर्वाणदिनी मागील पन्नासवर्षातील चुका सुधारण्याचा आणि we can... चा जोरदार नारा देण्याची गरज आहे.

जयभीम.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरातील गाळ आणि चिखल

महाराष्ट्रात पुराने थैमान घातले आहे. सांगली, कोल्हापूर आणि सातारा शब्दशः पाण्याखाली गेला आहे. फक्त महाराष्ट्रच नाही तर केरळ, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश आणि राजस्थानही पावसाने धो-धो धुतले आहे. कोल्हापूरच्या पावसाच्या आणि पुराच्या बातम्या टीव्ही मीडियाने जरा बऱ्यापैकी दाखवण्यास सुरुवात केली होती. त्याचवेळी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस विदर्भातून महाजनादेश यात्रेवर निघाले होते. त्यांचा सहकारी पक्ष शिवसेनेची धाकटी पाती आदित्य ठाकरेची जनआशीर्वाद यात्रा सुरुच होती. या दोन्हीही यात्रा मीडिया पुराच्या पाण्यासोबत दाखवत होते. या दोन्ही मतांचा जोगवा मागणाऱ्या यात्रांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसही शिवाजी महाराजांचे नाव घेऊन टीव्हीतील संभाजी महाराजांना घेऊन शिवस्वराज्य यात्रेवर निघाली होती. या सर्व राजकीय यात्रा सुरु झाल्याबरोबरच मुंबई आणि कोकणात पावसाला सुरुवात झाली होती. मुख्यमंत्री फडणवीस अमरावतीहून गडचिरोलीला जाईपर्यंत पाऊस कोकणातून पश्चिम महाराष्ट्राकडे वळला होता. कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात पाऊस धो-धो बरसत होता. दिवसागणिक नाही तर तासातासाला पाणीपातळीत वाढ होत होती. राधानग...

भारत किती स्वच्छ

>> भारत किती स्वच्छ  नुकत्याच झालेल्या गांधी जयंतीला 'स्वच्छ भारत' अभियानाला एक वर्ष पूर्ण झाले.  या दिवशी गांधींऐवजी,  त्यांनी भगवान गौतम बुद्धांपासून घेतलेल्या अहिंसे ऐवजी स्वच्छतेचीच चर्चा जिकडे तिकडे होती. ही चांगली गोष्ट देखील आहे. लोक स्वच्छतेबाबत जागरुक होत आहे यात कोणालाही अडचण असण्याचे काही कारण नाही. महापुरुष हे आंधळ्यांच्या हाती लागलेल्या हत्तीसारखे असतात. ज्यांच्या हाताला जो भाग लागला ते त्याच अनुषंगाने त्यांचे विश्लेषण करतात यात महापुरुषाला दोष देता येणार नाही. केंद्रात भाजपचे सरकार (एनडीएचे सरकार आहे हे एनडीएचे घटक पक्षही विसरले असतील आतापर्यंत) आल्यापासून गांधींच्या अहिंसेऐवजी त्यांची स्वच्छताच अधिक चर्चेत आली आहे. नाही तर काँग्रेसच्या काळात गांधी जयंतीच्या आधीपासून आणि नंतरचे काही दिवस गांधींवर तत्कालिन माध्यमांमध्ये जी चर्चा होत होती त्यात गांधीचा स्वातंत्र्यासाठीचा लढा... हातात शस्त्र न घेता इंग्रजांची सत्ता उलथवून टाकणे... अहिंसेचे पुजारी... अशाच गांधींची चर्चा होत होती. आता वर्ध्यातील आश्रमात गांधींनी कोणाकोणाला संडास साफ करायला लावले. संडा...

गरज थोड्या लवचिकतेची

वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातील एक मोठ्या व्होट बँकचा पूर्ण ताकदीने पाठिंबा आहे. हा मतदार स्वाभिमानी, विचारकरणारा आणि आंबेडकरी घराण्यावर निष्ठा असलेला निष्ठावान आहे. मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (भारिप), भारिप बहुजन महासंघ, २०१४ मध्ये डाव्यांसोबत केलेली आघाडी, २०१९ लोकसभा निवडणुकीत  एमआयएमला सोबत घेऊन लढवलेली निवडणूक, आणि विधानसभेत एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन केलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग. बाळासाहेबांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या या सर्व प्रयोगांमध्ये 'आंबेडकर'नावावर जीव ओवाळून टाकणारा मतदार तन-मन-धनाने त्यांच्यासोबत राहिला आहे. मात्र या निष्ठावान जनतेला अद्याप सत्तेची चव चाखायला मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत 'वंचित' उमेदवारांना मिळालेली मते पाहिल्यास स्पष्ट होते की, बौद्ध समाजाने बाळासाहेबांच्या नावावर भरभरुन मतदान केले आहे. मात्र बाळासाहेब ज्या ओबीसी, ओबीसींमधील छोट्या जाती, धनगर, अलुतेदार, बलुतेदार, आदिवासी, लिंगायत यांना सोबत घेऊन सत्ता संपादनाची इच्छा व्यक्त करत आहेत तो समाज पूर्ण ताकदीने बाळासाहेबांसोबत आल...