मुख्य सामग्रीवर वगळा

दुष्काळाच्या झळा... आधी गाव झाले परके, नंतर मुले झाली पोरकी

शहरातील बंद दारा आड टीव्ही समोर बसून नळाला पाणी कधी येईल याची चिंता करणारे 'नागरिक' आणि एसी ऑफिसमध्ये बसून बिस्लरी कॅनचे पाणीही फिल्टर करून पिणारे 'कर्मचारी', दोन दिवस झाले नळाला पाणी आले नाही म्हणून पालिकेला शिव्या घालतात... मात्र, आभाळातून पाणी पडलं नाही म्हणून म्हातार्‍या-कोतार्‍यांच्या हवाली कच्ची-बच्ची टाकून त्यांच्या व स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी शहराचा रस्ता धरणार्‍यांची कथा फार वेगळी आहे.
मात्र, कोट्यवधींचा कोळसा घोटाळा... त्यात कोणाचे हात काळे झाले होते आणि इकडे पावसाचा टिपूस नसताना राज्याच्या उपमुख्यंमत्र्याचे नाव सिंचन घोटाळ्यात येते... नैतिकतेच्या मुद्यावर ते राजीनामा देतात आणि त्यानंतरच्या राजकीय नाट्यावर वृत्तपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे रकानेच्या रकाने भरतात आणि तासंतास चर्चा करतात... या चर्चेच्या गुर्हाळात दुष्काळाचे कुणाला घेणे देणे ? पण, दुर्लक्ष्य केले म्हणून दुष्काळाची दाहकता कमी होत नाही.
या दुष्काळाने बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील भोजेवाडीच्या दोन जणांचा बळी घेतला. भोजेवाडीत गेल्या दोन वर्षात पावसाचा थेंब पडला नाही.  कोरडवाहू जमीनीतून शेतकरी पोटापूरते ज्वारी, बाजरी पिकवतो मात्र, निसर्गाच्या दोन वर्षांच्या अवकृपेने यंदा तेही शक्य झाले नाही. येथील शेतकरी मग पोटाची खळगी भरण्यासाठी साखर कारखान्यांवर ऊसतोडीला जातात. मात्र, कारखान्याचा बॉयलर पेटायलाही अजून बराच काळ बाकी आहे. म्हणून शहराकडे जाऊन मोल-मजूरीचा पर्याय अनेकांनी स्विकारला. अण्णासाहेब देवकातेंनीही इतरांप्रमाणे शहराचा रस्ता धराला..  पण, त्यांना काय माहिती त्यांच्या पुढ्यात काय वाढून ठेवले होते...   
 अण्णासाहेब देवकाते यांची भोजेवाडीत दहा एकर शेती. पण पावसाचा थेंब नाही म्हणून ओसाड पडलेली. म्हणून अण्णासाहेब कामाच्या शोधात पुण्यनगरीत गेले. पुण्यातील तळजाई टेकडीवरील इमारतीत ते, त्यांची पत्नी दिपाली आणि वहिनी मिता काम करीत होते. अचानक इमारत कोसळली आणि सगळे होत्याचे नव्हते झाले. अण्णासाहेब आणि त्यांची वहिनी मिताचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. त्यांची पत्नी दिपाली गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरु आहेत. ही घटना भोजेवाडीत कळाली आणि तिथे स्मशान शांतता पसरली. म्हातारी आई डोक्याला हात लावून बसली, तर आपलं आभाळ फाटलयं - डोक्यावरचं छत्र हरपलं याची पूसटशीही कल्पना नसलेले निरागस चिमुरडे आजी समोर बसले होते...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरातील गाळ आणि चिखल

महाराष्ट्रात पुराने थैमान घातले आहे. सांगली, कोल्हापूर आणि सातारा शब्दशः पाण्याखाली गेला आहे. फक्त महाराष्ट्रच नाही तर केरळ, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश आणि राजस्थानही पावसाने धो-धो धुतले आहे. कोल्हापूरच्या पावसाच्या आणि पुराच्या बातम्या टीव्ही मीडियाने जरा बऱ्यापैकी दाखवण्यास सुरुवात केली होती. त्याचवेळी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस विदर्भातून महाजनादेश यात्रेवर निघाले होते. त्यांचा सहकारी पक्ष शिवसेनेची धाकटी पाती आदित्य ठाकरेची जनआशीर्वाद यात्रा सुरुच होती. या दोन्हीही यात्रा मीडिया पुराच्या पाण्यासोबत दाखवत होते. या दोन्ही मतांचा जोगवा मागणाऱ्या यात्रांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसही शिवाजी महाराजांचे नाव घेऊन टीव्हीतील संभाजी महाराजांना घेऊन शिवस्वराज्य यात्रेवर निघाली होती. या सर्व राजकीय यात्रा सुरु झाल्याबरोबरच मुंबई आणि कोकणात पावसाला सुरुवात झाली होती. मुख्यमंत्री फडणवीस अमरावतीहून गडचिरोलीला जाईपर्यंत पाऊस कोकणातून पश्चिम महाराष्ट्राकडे वळला होता. कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात पाऊस धो-धो बरसत होता. दिवसागणिक नाही तर तासातासाला पाणीपातळीत वाढ होत होती. राधानग...

भारत किती स्वच्छ

>> भारत किती स्वच्छ  नुकत्याच झालेल्या गांधी जयंतीला 'स्वच्छ भारत' अभियानाला एक वर्ष पूर्ण झाले.  या दिवशी गांधींऐवजी,  त्यांनी भगवान गौतम बुद्धांपासून घेतलेल्या अहिंसे ऐवजी स्वच्छतेचीच चर्चा जिकडे तिकडे होती. ही चांगली गोष्ट देखील आहे. लोक स्वच्छतेबाबत जागरुक होत आहे यात कोणालाही अडचण असण्याचे काही कारण नाही. महापुरुष हे आंधळ्यांच्या हाती लागलेल्या हत्तीसारखे असतात. ज्यांच्या हाताला जो भाग लागला ते त्याच अनुषंगाने त्यांचे विश्लेषण करतात यात महापुरुषाला दोष देता येणार नाही. केंद्रात भाजपचे सरकार (एनडीएचे सरकार आहे हे एनडीएचे घटक पक्षही विसरले असतील आतापर्यंत) आल्यापासून गांधींच्या अहिंसेऐवजी त्यांची स्वच्छताच अधिक चर्चेत आली आहे. नाही तर काँग्रेसच्या काळात गांधी जयंतीच्या आधीपासून आणि नंतरचे काही दिवस गांधींवर तत्कालिन माध्यमांमध्ये जी चर्चा होत होती त्यात गांधीचा स्वातंत्र्यासाठीचा लढा... हातात शस्त्र न घेता इंग्रजांची सत्ता उलथवून टाकणे... अहिंसेचे पुजारी... अशाच गांधींची चर्चा होत होती. आता वर्ध्यातील आश्रमात गांधींनी कोणाकोणाला संडास साफ करायला लावले. संडा...

गरज थोड्या लवचिकतेची

वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातील एक मोठ्या व्होट बँकचा पूर्ण ताकदीने पाठिंबा आहे. हा मतदार स्वाभिमानी, विचारकरणारा आणि आंबेडकरी घराण्यावर निष्ठा असलेला निष्ठावान आहे. मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (भारिप), भारिप बहुजन महासंघ, २०१४ मध्ये डाव्यांसोबत केलेली आघाडी, २०१९ लोकसभा निवडणुकीत  एमआयएमला सोबत घेऊन लढवलेली निवडणूक, आणि विधानसभेत एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन केलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग. बाळासाहेबांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या या सर्व प्रयोगांमध्ये 'आंबेडकर'नावावर जीव ओवाळून टाकणारा मतदार तन-मन-धनाने त्यांच्यासोबत राहिला आहे. मात्र या निष्ठावान जनतेला अद्याप सत्तेची चव चाखायला मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत 'वंचित' उमेदवारांना मिळालेली मते पाहिल्यास स्पष्ट होते की, बौद्ध समाजाने बाळासाहेबांच्या नावावर भरभरुन मतदान केले आहे. मात्र बाळासाहेब ज्या ओबीसी, ओबीसींमधील छोट्या जाती, धनगर, अलुतेदार, बलुतेदार, आदिवासी, लिंगायत यांना सोबत घेऊन सत्ता संपादनाची इच्छा व्यक्त करत आहेत तो समाज पूर्ण ताकदीने बाळासाहेबांसोबत आल...