मुख्य सामग्रीवर वगळा

जयभीम : तुझी माझी अस्मिता आणि अस्तित्वाची ओळख


आज रात्री मस्त पैकी घरावर जाऊन थंडीत - गार हवेत सिगरेट ओढत कोक प्यावा वाटत आहे... घरी जाई पर्यंत दुकानं उघडी राहीली तर मनातला बेत नक्की पूर्ण करणार... वर्ष संपायला एकच दिवस उरला आहे आणि मला सुटी देखील आहे, त्यामुळे रात्री कितीही वेळ जागरण केले तरी उद्या वेळेवर उठण्याचे कंपल्शन नाही.  हे काय सांगत बसलो असे जर वाटत असेल तर,  मनातलं सांगण्यासाठीच तर ब्लॉग असतो. इथं नाही व्यक्त व्हायचं तर मग काय तयखाण्यात...

आज 'जयभीम' या घोषणेला 75 वर्ष पूर्ण झाली. मराठवाड्याचे सुपूत्र भाऊसाहेब मोरे यांनी ३० डिसेंबर १९३८ साली तत्कालिन निजाम राजवटीच्या सीमेवरील गावात - कन्नड तालुक्यातील मक्रणपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सभा आयोजित केली होती. ही सभा निजाम राजवटीविरोधात आणि दलित, शोषित, शेतमजुरांना आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. त्या काळात मराठवाड्यातील दलितांचे जोरजबरदस्तीने धर्मांतर केले जात होते. त्यांना मुसलमान केले जात होते. या सर्वांच्या विरोधात सुशिक्षीत भाऊसाहेब मोरे यांनी बाबासाहेबांच्या उपस्थितीत परिषदेचे आयोजन केले होते. भाऊसाहेब तेव्हा शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे मराठवाडा प्रांताध्यक्ष होते. याच परिषदेत भाऊसाहेबांनी जोहार मायबाप हे गुलामीचे प्रतिक असलेले अभिवादन नाकारण्याचे आणि फक्त आणि फक्त जयभीमचाच नारा देण्याचे - घोषणा देण्याचे - एकमेकांना भेटताना अभिवादनासाठी उच्चारला जाणारा शब्द फक्त जयभीमच असले असे आवाहन केले. ते आजतागायत अव्याहत सुरु आहे. बाबासाहेबांनी गुलामीत खितपत पडलेल्या माणसाला स्वाभिमानाने जगण्याचे धाडस दिले - मग याच महामानवाचा जयजयकार का नाही करायचा, असाही कदाचित भाऊसाहेबांचा व्होरा असले, नव्हे तो तसाच असला पाहिजे.

जयभीमने महाराष्ट्रात बौद्धांना वेगळी ओळख दिली. केवळ बौद्धांनाच नाही तर परिवर्तनवादी चळवळीचा हा अभिवादनाचा संस्कार बनला. जयभीम के नारे पे खून बहा तो बहने दो, हा बाबासाहेबांच्या नावासाठी मर-मिटण्याचा आतल्या आणि बाहेरच्या आवाजाचे उत्कट प्रतिबिंब जयभीम आहे. भर रस्त्यात उभे राहून - गल्लीच्या कोप-यावर  किंवा कॉर्पोरेट ऑफिसमध्ये दोघांनी एकमेकांना कडक जयभीम ठोकला तर चार-सहा माना वळल्याच पाहिजे. ही आपल्या अस्मितेची - अस्तित्वाची आज ओळख झाली आहे. पण 75 वर्षानंतरही माना का वळतात हा खरा प्रश्न आहे. बाबासाहेबांनी जर फक्त एका समाजासाठी काम केलेल नाही, त्यांनी संपूर्ण सर्वहारा वर्ग, ऐकूणच मागासलेला समाज, या देशात गुलामांपेक्षाही हिन वागणूक मिळत असलेल्या महिलांसाठी, त्यांच्या आत्मसन्मान आणि उत्थानासाठी जीवन वेचले आहे. असे असतानाही कपाळावर आढी न येवू देता सर्वांनीच बाबासाहेबांचा जयजयकार करण्यात इतरांची जीभ का अडखळते... केव्हा बदलणार हा तुझ्या माझ्यातील फरक. माझे काही मित्र आहेत, जे बौद्ध नाही, मागासलेल्या समाजातील नाही आणि त्यांना जयभीम म्हणण्यातही कोणतीही अडचण नाही. आणि मलाही त्यांना त्यांच्या धर्माप्रमाणे अभिवादन करण्यात गैर वाटत नाही.. पण मेंदू - मन - जिव्हेला सवय लागली आहे कोणीही भेटल्यावर जयभीम म्हणण्याची...

जयभीम.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरातील गाळ आणि चिखल

महाराष्ट्रात पुराने थैमान घातले आहे. सांगली, कोल्हापूर आणि सातारा शब्दशः पाण्याखाली गेला आहे. फक्त महाराष्ट्रच नाही तर केरळ, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश आणि राजस्थानही पावसाने धो-धो धुतले आहे. कोल्हापूरच्या पावसाच्या आणि पुराच्या बातम्या टीव्ही मीडियाने जरा बऱ्यापैकी दाखवण्यास सुरुवात केली होती. त्याचवेळी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस विदर्भातून महाजनादेश यात्रेवर निघाले होते. त्यांचा सहकारी पक्ष शिवसेनेची धाकटी पाती आदित्य ठाकरेची जनआशीर्वाद यात्रा सुरुच होती. या दोन्हीही यात्रा मीडिया पुराच्या पाण्यासोबत दाखवत होते. या दोन्ही मतांचा जोगवा मागणाऱ्या यात्रांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसही शिवाजी महाराजांचे नाव घेऊन टीव्हीतील संभाजी महाराजांना घेऊन शिवस्वराज्य यात्रेवर निघाली होती. या सर्व राजकीय यात्रा सुरु झाल्याबरोबरच मुंबई आणि कोकणात पावसाला सुरुवात झाली होती. मुख्यमंत्री फडणवीस अमरावतीहून गडचिरोलीला जाईपर्यंत पाऊस कोकणातून पश्चिम महाराष्ट्राकडे वळला होता. कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात पाऊस धो-धो बरसत होता. दिवसागणिक नाही तर तासातासाला पाणीपातळीत वाढ होत होती. राधानग...

भारत किती स्वच्छ

>> भारत किती स्वच्छ  नुकत्याच झालेल्या गांधी जयंतीला 'स्वच्छ भारत' अभियानाला एक वर्ष पूर्ण झाले.  या दिवशी गांधींऐवजी,  त्यांनी भगवान गौतम बुद्धांपासून घेतलेल्या अहिंसे ऐवजी स्वच्छतेचीच चर्चा जिकडे तिकडे होती. ही चांगली गोष्ट देखील आहे. लोक स्वच्छतेबाबत जागरुक होत आहे यात कोणालाही अडचण असण्याचे काही कारण नाही. महापुरुष हे आंधळ्यांच्या हाती लागलेल्या हत्तीसारखे असतात. ज्यांच्या हाताला जो भाग लागला ते त्याच अनुषंगाने त्यांचे विश्लेषण करतात यात महापुरुषाला दोष देता येणार नाही. केंद्रात भाजपचे सरकार (एनडीएचे सरकार आहे हे एनडीएचे घटक पक्षही विसरले असतील आतापर्यंत) आल्यापासून गांधींच्या अहिंसेऐवजी त्यांची स्वच्छताच अधिक चर्चेत आली आहे. नाही तर काँग्रेसच्या काळात गांधी जयंतीच्या आधीपासून आणि नंतरचे काही दिवस गांधींवर तत्कालिन माध्यमांमध्ये जी चर्चा होत होती त्यात गांधीचा स्वातंत्र्यासाठीचा लढा... हातात शस्त्र न घेता इंग्रजांची सत्ता उलथवून टाकणे... अहिंसेचे पुजारी... अशाच गांधींची चर्चा होत होती. आता वर्ध्यातील आश्रमात गांधींनी कोणाकोणाला संडास साफ करायला लावले. संडा...

गरज थोड्या लवचिकतेची

वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातील एक मोठ्या व्होट बँकचा पूर्ण ताकदीने पाठिंबा आहे. हा मतदार स्वाभिमानी, विचारकरणारा आणि आंबेडकरी घराण्यावर निष्ठा असलेला निष्ठावान आहे. मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (भारिप), भारिप बहुजन महासंघ, २०१४ मध्ये डाव्यांसोबत केलेली आघाडी, २०१९ लोकसभा निवडणुकीत  एमआयएमला सोबत घेऊन लढवलेली निवडणूक, आणि विधानसभेत एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन केलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग. बाळासाहेबांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या या सर्व प्रयोगांमध्ये 'आंबेडकर'नावावर जीव ओवाळून टाकणारा मतदार तन-मन-धनाने त्यांच्यासोबत राहिला आहे. मात्र या निष्ठावान जनतेला अद्याप सत्तेची चव चाखायला मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत 'वंचित' उमेदवारांना मिळालेली मते पाहिल्यास स्पष्ट होते की, बौद्ध समाजाने बाळासाहेबांच्या नावावर भरभरुन मतदान केले आहे. मात्र बाळासाहेब ज्या ओबीसी, ओबीसींमधील छोट्या जाती, धनगर, अलुतेदार, बलुतेदार, आदिवासी, लिंगायत यांना सोबत घेऊन सत्ता संपादनाची इच्छा व्यक्त करत आहेत तो समाज पूर्ण ताकदीने बाळासाहेबांसोबत आल...