मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जुलै, २००९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आता पँथर हवीच

मानवमुक्तीचा लढा सुरुच ठेवा हे प्रसिध्द विचारवंत आणि दलित पॅंथरच्या संस्थापकांपैकी एक असलेले प्रा. अरुण कांबळे यांचे सोलापूरातील आजचे भाषण. या भाषणातून पुन्हा एकदा प्रा. कांबळे यांच्यातील पॅंथर बोलला असं वाटतंय. संसदीय राजकारणाची पॅंथरला कधीच गरज वाटली नाही. सभागृहामधे जावूनच प्रश्न सुटतात यावर पॅँथरचा विश्वास नव्हता. त्यामुळेच प्रा. कांबळेंनी रिपब्लीकन पुढा-यांच्या पराभवानंतर जनआंदोलनाची गरज आधोरेखीत करुन पँथर संघटनेची आज गरज असल्याचं म्हटलं आहे. आजच्या दलित नेत्यांवरती दलित जनतेचा विश्वास राहिलेला तर नाहीच. परंतू या नेत्यांचे अनुयायी म्हणवून घेणारेही तन-मनाने या नेत्यांच्या बरोबरच आहेत. हे विधान धाडसाचं ठरणारं आहे. कारण दलित जनतेवरील अन्याय अत्याचार थांबत नाहीत, ग्रामीण भागातील दलितांची अडवणूक आणि छळवणूकीचे नवे प्रकार नव्या सरंजामदारांनी (राज्यकर्त्यांनी) शोधून काढले आहेत. या सगळ्या जाचातून दलित जनतेची सोडवणूक करण्यास खंबीरपणे कोणताच तथाकथीत दलित नेता अंगझटकून पुढे सरसावत नाही. या गोष्टींचा दलित जनतेला आणि सामान्य कार्यकर्त्यांना उबग आलाय. यामुळे खरोखरच सुप्त लाट दलित कार्यकर्ते आणि ...

लक्ष्मण अजूनही 'उपरा'

लक्ष्मण माने. 'उपरा' या पुस्तकाने महाराष्ट्रातील साहित्य जगत् ढवळून काढल्यानंतर लक्ष्मण मानेचा 'उपरा'कार लक्ष्मण माने झाले. आता पद्मश्री लक्ष्मण माने. फुले, शाहू, आंबेडकर चळवळीवर विश्वास असणा-य मानेंनी ज्या समाजातून आलो त्यांच्यासाठी काही करायचे ठरविले तेव्हा, "शिक्षण" हेच या समाजाला उन्नत्त करु शकेल हे जाणले आणि त्यांच्या साठी स्वत:च्या मालकीच्या जागेत आश्रम शाळा सुरु केली. या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आश्रमशाळेच्या तीन खोल्या आज पाडण्यात आल्या. सातारा पालिकेने कोर्टाच्या आदेशाने ही शाळा जमीनदोस्त केली असलीतरी या मागे कच्छी आणि बारटक्के असोसिएट्स या बिल्डरांचा हात आहे. सातारा जिल्हातील करंजे येथे वहिवाटीनुसार लक्ष्मण माने यांच्या मालकीच्या जागेत भारतीय भटके विमुक्त संशोधन संस्थेची ही आश्रम शाळा आहे. विशेष म्हणजे शरद पवारांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे या विश्वस्त असलेल्या या शाळेला त्यांच्याच पक्षाच्या ताब्यात असलेल्या पोलीस खात्यांच्या सुरक्षेत पाडण्यात आले. या मुळे शासनापेक्षा बिल्डर भारी भरले आहेत, असंच म्हणावं लागेल. उपरा या पुस्तकात माने यांनी...

मनसेतून 'श्वेतप्रकाश' बाहेर

मनसे अर्थात महाराष्ट्र नवनिर्माण सेना. लोकसभेच्या निवडणूकी नंतर सामान्य मतदाराने जरी या पक्षाचा गांभीर्य़ाने विचार करयाला सुरुवात केली नसली तरी, राज्यातील शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने आपला नवा - तरुण मतदार या पक्षाकडे आकृष्ट होणार नाही याची वेळोवेळी काळजी घेतांना दिसले. मात्र मागील काही दिवसात मनसेतील प्रमुख पदावरील दोन व्यक्तींची पक्षातून झालेली हकालपट्टी पुढील काळात या पक्षाचा चेहरा कोणता राहणार हे स्पष्ट करणारी ठरली आहे. श्वेता परुळकर यांना त्यांच्या पदावरुन दूर करण्यात आलं. तेव्हा मिडीया शिवाय कोणीच ही गोष्ट गांभीर्याने घेतली नाही. कारण श्वेता या काही मास लिडर नव्हत्या. त्यांच्या जाण्याने मनसेला देखील फार मोठा धक्का बसला नाही की त्या शिवसेनेत गेल्यामुळे सेनेचाही एखादा गड मजबूत झाला असंही काही नाही. शिवसेनेला त्यातल्यात्यात एकच जमेची बाजू की मनसेने चेहरा दिलेली माणसेच आता मनसेच्या विरोधात बोलायला त्यांना मिळाली. त्यामुळे सेनेला आता त्यासाठी जास्त शक्ती खर्च करण्याची गरज उरलेली नाही. काल (21 जूलै) रोजी औरंगाबादच्या प्रकाश महाजनांनी मनसेतून अपम...