मनसे अर्थात महाराष्ट्र नवनिर्माण सेना. लोकसभेच्या निवडणूकी नंतर सामान्य मतदाराने जरी या पक्षाचा गांभीर्य़ाने विचार करयाला सुरुवात केली नसली तरी, राज्यातील शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने आपला नवा - तरुण मतदार या पक्षाकडे आकृष्ट होणार नाही याची वेळोवेळी काळजी घेतांना दिसले. मात्र मागील काही दिवसात मनसेतील प्रमुख पदावरील दोन व्यक्तींची पक्षातून झालेली हकालपट्टी पुढील काळात या पक्षाचा चेहरा कोणता राहणार हे स्पष्ट करणारी ठरली आहे. श्वेता परुळकर यांना त्यांच्या पदावरुन दूर करण्यात आलं. तेव्हा मिडीया शिवाय कोणीच ही गोष्ट गांभीर्याने घेतली नाही. कारण श्वेता या काही मास लिडर नव्हत्या. त्यांच्या जाण्याने मनसेला देखील फार मोठा धक्का बसला नाही की त्या शिवसेनेत गेल्यामुळे सेनेचाही एखादा गड मजबूत झाला असंही काही नाही. शिवसेनेला त्यातल्यात्यात एकच जमेची बाजू की मनसेने चेहरा दिलेली माणसेच आता मनसेच्या विरोधात बोलायला त्यांना मिळाली. त्यामुळे सेनेला आता त्यासाठी जास्त शक्ती खर्च करण्याची गरज उरलेली नाही. काल (21 जूलै) रोजी औरंगाबादच्या प्रकाश महाजनांनी मनसेतून अपमानीत झाल्यानंतर शिवसेनेत प्रवेश केला. मुळचे बीडचे आणि दुसरी महत्त्वाची ओळख म्हणजे दिवंगत प्रमोद महाजनांचे धाकटे बंधू (प्रविण महाजन पेक्षा मोठे) असलेले प्रकाश यांची मनसेने पक्षविरोधी कारवया केल्याच्या कारणाने हकालपट्टी केली. मात्र या हकालपट्टी मागे बीडच्या संपर्कप्रमुखांशी (कर्णबाळा) त्यांचा झालेला राडा हे प्रमुख कारण आहे. प्रकाश महाजनांच्या जाण्यानेही मनसेला काडीमात्र फरक पडणार नाही हे राज ठाकरे आणि इतर 'सरचिटणीसां'ना माहीत आहे. त्यामुळेच त्यांच्या राड्या नंतर तिस-याच दिवशी प्रकाश यांची हकालपट्टीची नोटीस पक्षाच्या नोटीस बोर्डवर टांगण्यात आली. या सर्व प्रकारामुळे प्रकाश हे अतिशय हळवे झाले. त्यांना मनस्वी दु:ख झालं. 'मोतोश्री' वरील सेना प्रवेश सोहळ्यात ते पत्रकारांशी वार्तालाप करतांना त्यांना अश्रु अनावर झाल्यांचही महाराष्ट्रानं पाहिलं. कोणतीही आशा , आपेक्षा न बाळगता प्रकाश राज यांच्या मागे उभे राहीले होते. मराठवड्यात एक चांगलं नेतृत्व प्रकाश महाजनांच्या निमीत्तानं राज ठाकरेंना उभं करता आंलं आसतं . मात्र तसं काहीही न होता, प्रकाश यांना स्वत:च्या कर्मभुमीतच मनसेच्या 'राडा' संस्कृतीला सामोरं जावं लागलं . आणि राज यांनी त्यांची कैफियत एकून न घेताच त्यांची हकालपट्टी केली.
आता प्रश्न निर्माण होतो की श्वेता आणि प्रकाश या 'पांढरपेश्या' व्यक्तींची हकालपट्टी करुन राज ठाकरे हे पक्षात केवळ राडा करु शकणा-यांनाच स्थान देणार आहेत का ?
आता प्रश्न निर्माण होतो की श्वेता आणि प्रकाश या 'पांढरपेश्या' व्यक्तींची हकालपट्टी करुन राज ठाकरे हे पक्षात केवळ राडा करु शकणा-यांनाच स्थान देणार आहेत का ?
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा