रिपब्लिकन पक्षाचे नेत रामदास आठवले यांचा मुंबई महापालिकेत केवळ एक उमेदवार निवडून आला आहे. मात्र याच वेळी त्यांनी ज्या दोन पक्षांशी युती केली त्या शिवसेना - भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मोठ्या प्रमाणात निवडून आले आहेत. भाजप तर मागील निवडणूकीपेक्षा तीनने अधिक आहे. मतदानाची टक्केवारी देखील वाढली आहे. ज्याची भाजपनेत्यांनाही अपेक्षा नव्हती. या सगळ्यावर रिपाई नेते आठवले यांनी नुकतेच मुंबईत भाष्य केले आहे. गेली अनेक वर्षे आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर होतो. आमची मते त्यांना मिळत होती, परंतु आता आम्ही शिवसेना-भाजपबरोबर आहोत. महापालिका निवडणुकीत मात्र या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी बंडखोरी केल्याने आणि आमच्यातही बंडखोरी झाल्याने रिपाइंचे उमेदवार निवडून आले नाहीत, असा आरोप पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी बुधवारी पुन्हा एकदा केला. मुंबई पत्रकार संघात आयोजित एका कार्यक्रमात शिवेसना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे आणि रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले एकत्र आले होते. याप्रसंगी आठवले म्हणाले की, ‘गड आला पण सिंह गेला’ अशी आमची अवस्था झ...