२३ मार्च १९३१ रोजी भगतसिंग - राजगुरू - सुखदेव या तीन क्रांतिवीरांना इंग्रज सरकारने फाशी दिली होती. उद्या तो शहिद दिवस आहे. त्यांच्या सारखेच आता विधानसभेत बॉम्ब टाकावा असे वाटत आहे. त्यांनी जरी फक्त सरकारचे लक्ष्य वेधण्यासाठी धुरांचा बॉम्ब फेकला होता, तरी आता फेकला जाणारा बॉम्ब तिथल्या सर्व आमदारांना मुळापासून संपवणारा असावा असे वाटते. कोणत्याही मद्यावर या आमदारांची तोंडे पन्नास दिशांना असतात मात्र, पत्रकारांच्या हक्कभंगाविरोधात ते सर्व एकत्र येतात या पेक्षा महाराष्ट्राचे दुर्दैव ते काय ? एकाही आमदाराराला अभिव्यक्ती स्वातंत्र्याची चाड असू नये. केवळ यांचेच जनतेने आणि पत्रकारांनी ऐकावे अशीच यांची अपेक्षा आहे का ? त्यांच्या विरोधात काही बोलयचेच नाही का ? हे कुठले तुर्रमख्खा लागून गेले ? महाराष्ट्र राज्याचे राजकारण एवढ्या रसातळाला गेले आहे की, ज्या वास्तूत बसून राज्याच्या हिताचे निर्णय घेतले जावे त्याच वास्तूत एका पोलिस अधिका-यावर हात उगारले गेले. तेही एक दोघांनी नाही तर, पाच-पंचविस आमदारांनी. कोणी दुस-याने हे कृत्य केले असते तर, गोष्ट वेगळी होती मात्र, कायद्याचे राज्य ...