माणूस म्हणून जगत असताना अनेक चांगल्या गोष्टी - घटना लक्ष वेधून घेत असतात, त्याच बरोबर मनाला न पटणार्या घटना बेचैन करत असतात. गेल्या आठवड्यात उजव्या हाताच्या आंगठ्याची योग्य हलचल होत नाही म्हणून छोटे अॉपरेशन झाले, त्यामुळे घरात पडून आहे. याच दरम्यान ओबामा भारतात येऊन गेले - दिल्लीत निवडणूक दंगलीला रंग चढत आहे - राज्यात शेतकरी आत्महत्या सूरुच आहे - तसेच विवेकानंद यांच्या धार्मिक विचारांवर पुरोगामी आणि प्रतिगामी यांच्यात अदृष्य चकमक सूरू आहे - भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेतील दोन शब्द गायब करण्यात आले- मोदीने जोधपुरी सूटवर स्वतःचे नाव लिहून घेतले - गल्लीपासून दिल्ली पर्यंत असे काही घडत असताना मला "मोकल्या हाताने " लिहिता येत नसल्याचे वाइट वाटते. 😴 श्टी