दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात आम आदमी पार्टीने विक्रमी (७० पैकी ६७) विजय मिळविला आहे. त्यांच्या विजयाने भाजपचा (७० पैकी ०३) आणि एका अर्थाने मोदींचा अश्वमेध रोखला गेला आहे. एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या दिल्लीत भाजपला केवळ तीन जागांवर रोखून त्यांच्या गेल्या नऊ महिन्यांच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सत्ता-पैसा-जात-धर्म आणि नकारात्मकता यांच्यापलिकडे मतदार विचार करतात याचा भाजपला नऊ महिन्यात विसर पडला होता. सर्वसामान्यांच्या हिताऐवजी नकारात्मक राजकारणावर स्वार होऊन विजय मिळविता येईल याला भाजप बळी पडली. दुसरीकडे पॅरेशूट उमेदवार किरण बेदी यांना मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार करुन स्वपक्षीयांचा रोष ओढवून घेतला, त्याचाच परिणाम त्यांना दिल्ली विधानसभा निवडणुकीत भोगावा लागला. भाजपमध्ये अंतर्गत लोकशाहीची गरज राजकीय विश्लेषक डॉ. सुधीर गव्हाणे यांच्या मतानुसार, सध्याच्या राजकारणात वचनांची आणि आश्वासनांची परिपूर्ती करणे राजकीय पक्षांसाठी अत्यंत गरजेचे आहे. सत्ता मिळविण्यासाठी जनतेच्या आकांक्षा जागवणे वेगळी गोष्ट आहे आणि त्याची परिपूर्ती करणे वेगळी बाब...