मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

2016 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मित्रों sss

पंतप्रधान पदाचा मार्ग ज्या राज्यातून जातो त्या उत्तरप्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा या आठवड्यात होईल अशी आपेक्षा आहे. भारतीय जनता पक्षाला बिहारमधून मोठी आपटी मिळाली त्याआधी दिल्लीने दूर केले आहे. तरीही स्थानिक स्वराज्य संस्थातील निवडणुकीतील आकड्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष शहा हुरळून गेले. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांनी दिल्लीत प्रेस घेऊन गल्लीतील विजयाची पिपाणी वाजवली. (आपल्या विजयाचे श्रेय कोणी कसे घ्यावे, कुठे घ्यावे याचे काही नियम नाही. ठोकताळे नाही. संकेत आहेत ते पाळायचेच नाही हेच भाजपने ठरविलेले आहे त्यामुळे त्यावर न बोलले बरे !) सांगतिले काळेधन-दहशतवाद-बनावट नोटा, समोर आणला कॅशलेसचा बेसलेस मुद्दा : आज 500च्या जुन्या नोटा आणि 1000 रुपयांची बाद केलेली नोट बँकेत भरण्याचा शेवटचा दिवस आहे. ज्या प्रमाणे मोदी नोटा बंदकरण्यासाठी देशाला उद्देशून बोलले तसेच ते उद्या बोलणार आहे. नोटा बंद केल्या त्या दिवशी त्यांनी राणा भीमदेवी थाटात काळापैसा, भ्रष्टाचार, बनावट नोटा आणि दहशतवाद यांना पायबंद घालण्यासाठी हे पाऊल उचलत असल्याचे एक नाही तर 27-28 वेळा उच्चस्वरात सांगितले...

मनसेची खंडणी, मुख्यमंत्र्यांची 'मुश्किल'

'ऐ दिल है मुश्किल' चित्रपटाच्या प्रदर्शनाचा वाद अखेर मिटला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी विरोध मागे घेतला आहे. मात्र यामुळे मनसे या खळ्ळखट्याकची भाषा करणाऱ्या पक्षाने माघार घेतली की खरोखर हे त्यांच्या आंदोलनाचे यश आहे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच लष्कराच्या माजी अधिकाऱ्यांनी अशा प्रकारे एखाद्याला बळजबरी करुन आर्मी वेलफेअर फंडसाठी निधी घेणे, शहीदांचा अपमान आहे. लष्कराचा हा स्वाभिमान योग्य असल्याचे या वादावर शांत असलेल्या शिवसेनेने म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांनी याला 'खंडणी' हा शब्दप्रयोग करुन मनसे आणि भाजपने एकमेकांना मोठे करण्याचा चालवलेला प्रयत्न एका दगडात हाणून पाडला.  मनसे 'खळ्ळखट्याक' करणार म्हटल्यावर चांगल्या-चांगल्यांचे धाबे दणाणत होते. राज्य सरकारसह मुंबईतील मोठमोठ्ठे मॉल, चित्रपट निर्माते, कलाकार यांनाही अनेकदा मनसेपुढे झुकावे लागले असल्याची अनेक उदाहरणे आहेत. मग मराठी पाट्या असो किंवा मराठी मुलांना रेल्वेतील नोकरीचा मुद्द्दा किंवा नुकताच प्रदर्शित झालेला 'एम.एस धोनी' हा हिंदी चित्र...

#सखे... येतोस ना मग..

#सखे... तुला नाही का गं वाटतं आपणही गणपती पाहायला जावं. ते रंगीत-संगीत मंडप... वेगवेगळे देखावे... सजीव-निर्जीव... दहा दिवस पाणी बचतीचा संदेश. प्लॅस्टिक मुक्तीचा उपदेश देणारे फलक पाहून, आजची पिढीही किती जागरूक आहे नाही.. आपण उगाच त्यांना नाव ठेवतो, असे तेलकट-तुपकट चेहऱ्याच्या लोकांचे संवाद ऐकावे! पैठणगेटपासून सुरु करुया का प्रवास, की आधी टीव्ही सेंटर - एन नाईन - एन आक्राकडून निघायचे... ए.. तुला जिकडून निघायचे तिकडून निघ.. आमच्या भीमनगरमध्ये ना आम्ही कधी गणपती बसवला ना कधी औरंगपूऱ्यात गणपती पाहायला गेलो.. पाहायचचं असेल तर संध्याकाळी विद्यापीठ गेटवर ये, तिथेच गाडी लावून मस्तपैकी चालत लेणी पर्यंत जाऊ छान हरवगार झालयं सारं.. त्या तुझ्या धोनीचा पिक्चर येतोना.. तोही आपल्या लेणीच्याच साक्षीला फिरायला येत असल्याचं दाखवलय त्यात... येतोस ना मग..  

#सखे

#सखे मी असाच कफल्लक राहिलो तर... मोर्चे - आंदोलन - उपोषणं - धरणे, हाच माझा दिनक्रम राहिला तर. आंदोलनात चार-आठ दिवस जेलमध्ये, उपोषणानिमीत्त पाच-सहा दिवस घराबाहेर राहिलो तर... खिशात मोबाइल आहे पण बोलण्यासाठी त्यात बॅलेन्स नही. दौऱ्यावर असल्याने आपल्यात आठ-आठ दिवस बोलणं नाही. सणावाराला इतरांकडे गोडधोड होत असेल आणि आपल्याकडे दिवाळीतही होळी साजरी होत असली तरी... तरीही तू अशीच माझ्यावर निस्सीम प्रेम करत राहाशील... आपण आपल्या मुलाचे नाव 'निस्सीम' ठेवूया... अरे, हो- हो जर दम खाशील. तू तर ठरवूनही टाकले माझा होकार आहे आणि आपल्याला मुलगाच होईल. प्रश्नांची सरबत्ती केली, उत्तरही तूच देऊन टाकले. हा कसला तुझा स्त्री-पुरुष समानतेचा दृष्टीकोन ? क्रांतीचौकातून निघालेला मोर्चा पैठणगेटपर्यंत फूल जोशात असतो. टिळकपथावर त्याला आणखीच उकळी फुटलेली. गुलमंडी-सिटीचौकात जयभीमनगर-शहाबाजार येथून काही जथ्ते येऊन मिळतात...  काळ्या दरवाजातून मोर्चा आता कलेक्टर ऑफिसच्या दिशेने रंगिन दरवाजाकडे आलेला आसतो. तो तिला म्हणतो, आपण जरा जास्तच लवकर येथे आलो असे नाही का वाटत..  हो तुझा वेग जरा जास्त होता म्हणून...

मोदींचे मगरीचे अश्रू आणि पुतना मावशीचे प्रेम

लखनऊ - हैद्राबाद केंद्रीय विद्यापीठाचा स्कॉलर रोहित वेमुला याच्या आत्महत्येचा उल्लेख करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी भावूक झाले. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात भाषणासाठी पंतप्रधान उभे राहिले असता काही विद्यार्थ्यांनी मोदी मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. यामुळे सभागृहात गोंधळ उडाला. विद्यार्थ्यांनी 'मोदी मुर्दाबाद', 'मोदी गो बॅक'च्या घोषणा दिल्या. त्यांना सभागृहातून बाहेर काढण्यात आले. (थांबा. त्यांना बोलू द्या. ते काय म्हणतात हे मला ऐकायचे आहे. त्यासाठीच मी येथे आलो. त्यांना बसू द्या. असे मोदी म्हणाले नाही, ते तसे म्हणाले असते तर मग 40 साहित्यिकांना साहित्य अकादमी परत करण्याची गरजच काय होती आणि रोहितचाही जीव कशाला गेल असता.) हैदराबाद केंद्रीय विद्यापीठातील पीएच.डी करत असलेला दलित विद्यार्थी रोहित वेमुला याच्यासह चार विद्यार्थ्यांना विद्यापीठाने निलंबित केले होते. एवढेच नाही, तर या पाच विद्यार्थ्यांना विद्यापीठ परिसरात प्रवेश बंदी होती, हा नव्या मनुचा सामाजिक बहिष्कार नाही तर काय होता.   त्याविरोधात विद्यार्थी संघटनांनी आंदोलन करुनही...