अण्णाभाऊ साठेंनी मुंबईचे यथार्थ वर्णन त्यांच्या 'मुंबईची लावणी'मध्ये केले आहे. पहिल्या दोन ओळीतच त्यांनी मलबार हिलचा उल्लेख केला, तो असा... 'मुंबईत उंचावरी । मलबार हिल इंद्रपुरी । कुबेराची वस्ती तिथं सुख भोगती ।।' अशा कुबेरांच्या वस्तीचे लोकप्रतिनिधी आहेत भाजपचे मंगल प्रभात लोढा. त्यांनी याच मलबार हिलमधील जीना हाऊस जमीनदोस्त करण्याची मागणी केली आहे. त्या ठिकाणी सांस्कृतिक केंद्र उभारण्याची त्यांनी केलेली मागणी कोणत्याही व्यक्तीला रास्तच वाटू शकते. त्यातही सध्याच्या 'देशद्रोही' आणि 'देशभक्त' या व्याख्येत त्यांची मागणी सहाजिकच देशप्रेमाचे भरते आणणारीच आहे. त्यांच्या या मागणीने काही प्रश्नही निर्माण झाले आहे. मंगल प्रभात लोढा यांनाच फाळणीच्या प्रतीकाची एवढी शीरशीरी का यावी ? - 'जीना हाऊस' ज्या भागात आहे तो मलबार हिल परिसर लोढांचा विधानसभा मतदारसंघ आहे. 1995 मध्ये ते येथून प्रथम आमदार झाले. - मुख्यमंत्र्यांचा बंगला 'वर्षा' देखील मलबार हिलमध्ये आहे. 'वर्षा' समोरच अडीच एकरातील परिसरात 'जीना हाऊस' आहे. - लोढा...