मुख्य सामग्रीवर वगळा

यूपी में रहान है तो योगी - योगी कहना है

उत्तर प्रदेशमध्ये भाजपला जे अभूतपूर्व यश मिळाले त्यावर काय बोलावे हेच सुचत नव्हते. विजय हा विजय असतो त्याला दुसरे काहीही नाव नाही असे तेव्हा म्हणावसे वाटले होते. मात्र जेव्हा या विजयाचा बारकाईने विचार करत गेलो तेव्हा लक्षात येऊ लागले की भाजपने केवळ विजयी उमेदवारांचीच निवड केली नाही तर त्यांनी आपला मतदार शाबूत ठेवून विरोधकांची मते फोडणारे उमेदवार निवडले होते. महाराष्ट्रात ज्या प्रमाणे मराठा राजकारणाला वैतागलेल्या ओबीसींना जवळ केले तसेच यादवांना हात न लावता गैर-यादवांना शहांनी आपल्याकडे आणले. मायावतींचा जाटव मतबँकेवर लक्षकेंद्रीत न करता गैर-जाटव मतदारांना टार्गेट केले. त्यासोबत आदित्यनाथ योगी सारख्यांचे लाड करण्यात कुठलाही कसूर केला नाही. 

"यूपी में रहान है तो योगी - योगी कहना है" 

भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा आता समोर येत आहे. पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेशात विरोधकांवर आरोप करताना ते 'कुछ का साथ आणि कुछ का विकास' करत असल्याची मल्लीनाथी केली होती. या देशात हिंदू बहुसंख्य आहेत, हे कोणीच नाकारत नाही. मात्र या देशाचे राजकारण हे सर्वांना सोबत घेऊन चालणारे आहे. भाजपने उत्तर प्रदेशात मुख्यमंत्रीपदासाठी आदित्यनाथ योगी (ज्यांना लोक 'योगी आदित्यनाथ' नावाने ओळखतात त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना आदित्यनाथ योगी असे नाव घेतले होते. त्यांचे खरे नाव अजयसिंह बिष्ट आहे.) याचे नाव पुढे करुन आणि त्यांच्या खांद्यावर देशातील सर्वात मोठ्या राज्याची धुरा देऊन आपला अजेंडा स्पष्ट केला आहे. तसा तो त्यांनी उमेदवारीतूनच स्पष्ट केला होता.  तो विरोधकांसह कोणालाच ओळखता आला नाही यातच त्यांचे यश होते.

हिंदूत्वाचा कट्टर चेहरा 
- आदित्यनाथ योगी हा हिंदूत्वाचा कट्टर चेहरा आहे. भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जे साध्य करायचे आहे ते हा चेहरा सहज मिळवून देऊ शकतो. किंबहूना हा चेहरा पुढे करुन आपल्याला ते सर्व साध्य करुन घेता येईल ही आरएसएसची चाल आहे. त्यासाठीच त्यांनी योगीचे नाव जोरकसपणे पुढे केले आहे.
- आदित्यनाथ योगीचा उद्य राममंदिर आंदोलनातून झाला आहे. योगी गोरखपूरमधून प्रथम खासदार झाले तेव्हा ते फक्त 26 वर्षांचे होते. 1998 मध्ये प्रथम खासदार झालेल्या  योगींची खासदारकीची ही पाचवी टर्म होती. विशेष म्हणजे ते ज्या गोरखपूर मतदारसंघातून निवडून येत आले आहे, तो मतदारसंघ त्यांचे गुरु महंत अवैद्यनाथ यांचाच आहे. ते येथून चारवेळा खासदार होते. आदित्यनाथ यांनी आता चाळीशी पार केली आहे. त्याअर्थ्याने राजकारणात ते तरुण आहेत.
- आदित्यनाथ योगी यांनी 15 फेब्रुवारी 1994 ला नाथ संप्रदायाचे प्रमुख मठ गोरक्षनाथ मंदिराचे उत्तराधिकारी म्हणून त्यांचे गुरु मंहत अवैद्यनाथ यांच्याकडून दीक्षा घेतली होती. चार वर्षातच ते अवैद्यनाथ यांचे राजकीय उत्तराधिकारीही झाले होते.
- सुरुवातीपासूनच आदित्यनाथ हे त्यांच्या फायर ब्रँड छबीमुळे तरुणांमध्ये - त्यातही क्षत्रिय तरुणांमध्ये कमालीचे लोकप्रिय आहे.
- बिहार विधानसभेत झालेल्या पराभवानंतर यूपी भाजपमध्ये आदित्यनाथ यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार करुन निवडणुकीला सामोरे जाण्याची चर्चा होती. गोरखपूर येथे झालेल्या संत संमेलनातही याचीच चर्चा होती. संत - महंतांनी त्यांना मुख्यमंत्री करण्याचा संकल्प केला. संतांनी म्हटले की आम्ही 1992 मध्ये एकत्र येऊन आयोध्येतील ढांचा तोडला, आता केंद्रात आपले सरकार आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय आपल्याबाजूने आला तर आयोध्येत मंदिर बांधण्यासाठी आपलाच मुख्यमंत्री पाहिजे. तेव्हा आपल्याला आदित्यनाथ योगीच मुख्यमंत्री हवा. कारण समाजवादी किंवा बसपा नेत्या मायावती त्या खुर्चीवर असेल तर सुप्रीम कोर्टाचा निर्णय येऊनही आपली इच्छा पूर्ण होणार नाही.
- तेव्हा आता सुप्रीम कोर्टाकडून ही वादग्रस्त जागेवर मंदिर बांधण्याची परवानगी देणारा निर्णय आल्यास आश्चर्य वाटायला नको.

हत्येचा प्रयत्न - दंगल असे अनेक गुन्हे 
- योगी आदित्यनाथ हे भगवी वस्त्रे धारण करणारे असले तरी त्यांची करणी आजपर्यंत त्या उलट राहिली आहे. लव्ह जिहाद हे त्यांनी शोधलेले नवे प्रकरण सर्वांनाच माहित आहे. मात्र आधीपासून दोन समाजात दुही निर्माण होईल असे अनेक वक्तव्य आणि कारनामे त्यांच्या नावावार आहे.
- भाजपमध्ये राहूनही त्यांची स्वतःची समांतर व्यवस्था कार्यरत आहे. हिंदू युवा वाहिनी ही त्यांची अशीच एक संघटना आहे. त्याशिवाय ग्राम रक्षा दल देखील आहे. याचे काम हिंदू विरोधी, राष्ट्रविरोधी आणि माओवादी विरोधी कार्यक्रम हाणून पाडणे आहे. यासाठी या देशात कायदा-सुव्यवस्था नाही तर आपणच समर्थ असल्याचे यांना वाटते.
- हिंदू युवा वाहिनीवर अनेक ठिकाणी मुस्लिमांवर हल्ले आणि धार्मिक हिंसा भडकवण्याचे आरोप झाल्याची प्रकरणे दाखल आहे.
- योगी आदित्यनाथ यांच्यावरही हत्येचा प्रयत्न, दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करणे, सामाजिक सद्भाव कमी करणे, धर्मस्थळांना इजा पोहोचवणे या स्वरुपाचे तीन केसेसे सुरु आहे.
- या प्रकरणांची सुरुवात महाराजगंज जिल्ह्यातील पंचरुखिया कांडापासून होते. येथे आदित्यनाथ यांच्या ताफ्यातून समाजवादी पक्षाचे नेते तलत अजीज यांच्या सरकारी गनरवर गोळीबार झाला होता. त्यात गनर सत्यप्रकाश यादव यांचा मृत्यू झाला होता. तेव्हा राज्यात कल्याणसिंहाचे सरकार होते. या प्रकरणाच्या तपासात आदित्यनाथ यांना क्लिन चीट दिली गेली होती. आज योगींच्या मंत्रिमंडळात केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या मुलाचा समावेश झाला नाही, मात्र कल्याणसिंहांच्या नातवाचा समावेश झाला आहे. ही त्याचीच परतफेड तर नाहीना!

- हिंदुत्वाची पहिली प्रयोगशाला गुजरातमधील  2002 च्या कांडानंतर हिंदू युवा वाहिनीने गोरखपूर बंदची हाक दिली होती. त्यासाठी आयोजित सभेत एका विकेटच्या बदल्यात दहा विकेट घेतल्या पाहिजे म्हटले होते.
- योगींची किर्ती दिवसेंदिवस वाढत गेली ती त्यांच्या या भडक कृत्यांमुळे. 2007 मध्ये एका तरुणाच्या हत्येनंतर हिंदू युवा वाहिनीने सैयद मुराद अली शहा मजारवर आग लावून देण्याची घटना घडली होती. या प्रकरणाची प्रशासनाने गंभीर दखल घेतली. कर्फ्यू लावावा लागला. आदित्यनाथ यांना सभेची परवानगी नाकारण्यात आल्यानंतरही त्यांनी सभा घेतली आणि भडकाऊ भाषण दिले. त्या आरोपात त्यांना 28 जानेवारी 2007 मध्ये अटक करण्यात आली होती.
- त्यांना अटक करणाऱ्या पोलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्याला मुलायमसिंहांनी काय बक्षिसी दिली तर, त्या दोघांनाही सस्पेंड केले होते. तेव्हापासूनचे नाते आजपर्यंत जपत मुलायम सिंह मुलासह आज आदित्यनाथ योगींच्या शपथविधीला हजर राहिले असले पाहिजे.

- ज्या प्रमाणे देशात हर हर मोदीच्या घोषणा प्रचलित आहे. तशाच यावेळी यूपीमध्ये 'योगी योगी'या घोषणा होत्या. या घोषणांची सुरुवात सहाजिकच गोरखपूरपासूनच आहे. 'गोरखपूर में रहना है तो योगी योगी कहना है'. आता या घोषणांची व्याप्ती 'यूपी मे रहना है तो योगी योगी कहना है' अशी झाली नाही तर मिळवले.

ता.क. : एक मात्र नक्की भाजपने ध्रुवीकरणाचे राजकारण उत्तर प्रदेशात यशस्वी केले आहे. यासाठी त्यांचे अभिनंदन केलेच पाहिजे. लोकांनी विशेषतः युवकांनी विकासाच्या मुद्द्यावर आणि महिलांनी सुरक्षेसाठी मोदींना पाहून मतदान केले होते. ते आता योगी किती खरे ठरवतात हे पाहिले पाहिजे. कारण घोडा मैदान समोर आहे. येत्या दोन वर्षांचा विचार करुनच (2019 लोकसभा) मोदी-शहांनी योगींची निवड केली असणार.  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

योगीसाठी शहीदाच्या घरी लावला एसी, दानवेंच्या दारी आलेली शेतकऱ्यांची पोरं 'उपाशी'

शहीदाच्या कुटुंबाचीही देशभक्तीचे उमाळे येणारं सरकार थट्टा करु शकते, याचे ताजे उदाहरण उत्तर प्रदेशात पाहायला मिळाले आहे. भारत 'माते'साठी जीवाची बाजी लावून लढणाऱ्या शहीद प्रेम सागर यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी योगी आदित्यनाथांना 11 दिवस लागले. (की माहित नाही योगी मयताच्या दहाव्यानंतरच त्या घरात जातात असा काही नियम आहे.) हरकत नाही. ते शहीदाच्या घरी गेले. त्याच्या आदल्या रात्री उत्तर प्रदेशातील देवरिया या शहीद प्रेम सागर यांच्या घरी एसी, सोफा सेट, गालिचा आणि काही भगवी वस्त्रे पाठवण्यात आली होती. एवढेच नाही तर घरातील टॉवेल ही बदलण्यात आले होते. एका रात्रीतून एसी लाकडी बल्ल्यांवर फीट करण्यात आला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आले, त्यांनी शहीदाचे घर पाहिले, कुटुंबियांची भेट घेतली आणि कोरडी आश्वासने देऊन ते आल्या पावली परत गेले. शहीद प्रेम सागर यांच्या कुटुंबियांना वाटले होते की आदल्या रात्री आलेल्या वस्तू आता आपल्याच घरात राहातील. मुलगा गेला तरी सरकारने आपल्याला वाऱ्यावर सोडले नाही, मात्र त्यांचा हा भ्रम होता. शहीद प्रेम सागर यांचे वडील इश्वर चंद्र यांनी एका दैनिकाला दिलेल्य...

गरज थोड्या लवचिकतेची

वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातील एक मोठ्या व्होट बँकचा पूर्ण ताकदीने पाठिंबा आहे. हा मतदार स्वाभिमानी, विचारकरणारा आणि आंबेडकरी घराण्यावर निष्ठा असलेला निष्ठावान आहे. मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (भारिप), भारिप बहुजन महासंघ, २०१४ मध्ये डाव्यांसोबत केलेली आघाडी, २०१९ लोकसभा निवडणुकीत  एमआयएमला सोबत घेऊन लढवलेली निवडणूक, आणि विधानसभेत एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन केलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग. बाळासाहेबांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या या सर्व प्रयोगांमध्ये 'आंबेडकर'नावावर जीव ओवाळून टाकणारा मतदार तन-मन-धनाने त्यांच्यासोबत राहिला आहे. मात्र या निष्ठावान जनतेला अद्याप सत्तेची चव चाखायला मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत 'वंचित' उमेदवारांना मिळालेली मते पाहिल्यास स्पष्ट होते की, बौद्ध समाजाने बाळासाहेबांच्या नावावर भरभरुन मतदान केले आहे. मात्र बाळासाहेब ज्या ओबीसी, ओबीसींमधील छोट्या जाती, धनगर, अलुतेदार, बलुतेदार, आदिवासी, लिंगायत यांना सोबत घेऊन सत्ता संपादनाची इच्छा व्यक्त करत आहेत तो समाज पूर्ण ताकदीने बाळासाहेबांसोबत आल...

हा कसला फकीर... हा तर बेफिकीर पंतप्रधान - राज ठाकरे

हा कसला फकीर... हा तर बेफिकीर पंतप्रधान - राज ठाकरे १७व्या लोकसभेत महाराष्ट्रासह देशभर सध्या कोणाचे भाषण गाजत असेल तर ते आहे राज ठाकरे यांचे. महाराष्ट्राला राजकीय वक्त्यांची मोठी पंरपरा लाभलेली आहे. बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय सभा मारून नेईल असा सध्या एकमेव नेता आहे, ते म्हणजे राज ठाकरे. त्यासोबतच नाव घ्यावे लागेल 'हैदराबादी शेरवानी' अर्थात बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांचे. ओवेसी महाराष्ट्रीयन नसले तरी, यंदाच्या निवडणुकीत त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांसोबत महाराष्ट्रात अनेक दौरे करुन महाराष्ट्रीयन जनतेची नस अचूक ओळखल्याचे प्रत्येक सभेतून पाहायला मिळाले. राज ठाकरे यांचे 'लाव रे तो व्हिडिओ' हे आता वाक्य राहिले नाही तर ती एक फ्रेज झाली आहे. राज यांची भाषणे महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही चर्चेत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या उरात धडकी भरवणारे त्यांचे 'लाव रे तो व्हिडिओ' सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. एकही उमेदवार उभा केलेला नसताना राज्यात सर्वाधिक चर्चा आहे ती राज ठाकरे यांची. उद्याच्या सभेत राज ठाकरे...