रिमझिम पावसात दोघं शांत चाललेले असतात. रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांनी धरलेला अडोसा एका वळणावर थांबतो. रिमझिम पावसांच्या सरीने दोघेही नक्षिकांत चिंब झालेले. तो हातातील वह्या पुस्तकं डोक्यावर धरून तर ती ओढणी डोक्यावर व्यवस्थीत करत हातात असलेलं 'एनहिलेशन ऑफ कास्ट' डोक्यावर धरून झपझप पावलं उचलायला लागते. रिमझिम पावसात एकमेकांसोबत चालून आता 15-20 मिनिटांपेक्षा जास्त वेळ झालेला असतो पण तिच्या तोंडातून चकार शब्द निघालेला नाही. आता त्याच्या तगमग अधिकच वाढलेली... ही का बोलत नसेल. कशाचा राग.. की कोणासोबत बिनसलं आज... की आपल्याकडूनच एखादा वेडावाकडा शब्द निघाला असेल... एक ना दोन तो दिवसभरातील सगळ्या घटना आठवायला लागतो... अखेर पाऊस थांबतो आणि त्याच्या ओठांना शब्द फुटतात... सखे... काय झाले काय नेमके. का एवढी शांत आहे. वाटलं होत पावसामुळं थिजले असतील तुझे शब्द... पण जरा वेगळच प्रकरण दिसतयं... कोणासोबत काही बिनसलं का? की माझचं... काही चुकलयं... नाही रे... तुझं काही नाही चुकलं आणि तुझं चुकलं असतं तर एवढं शांत राहून सोडलं असत का तुला! आपलं काही चुकलं नाही हे कळाल्यावर त्या भोळ्या सांबाला ...