मुख्य सामग्रीवर वगळा

किती ही मळमळ

रिमझिम पावसात दोघं शांत चाललेले असतात. रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांनी धरलेला अडोसा एका वळणावर थांबतो. रिमझिम पावसांच्या सरीने दोघेही नक्षिकांत चिंब झालेले. तो हातातील वह्या पुस्तकं डोक्यावर धरून तर ती ओढणी डोक्यावर व्यवस्थीत करत हातात असलेलं 'एनहिलेशन ऑफ कास्ट' डोक्यावर धरून झपझप पावलं उचलायला लागते. रिमझिम पावसात एकमेकांसोबत चालून आता 15-20 मिनिटांपेक्षा जास्त वेळ झालेला असतो पण तिच्या तोंडातून चकार शब्द निघालेला नाही. आता त्याच्या तगमग अधिकच वाढलेली... ही का बोलत नसेल. कशाचा राग.. की कोणासोबत बिनसलं आज... की आपल्याकडूनच एखादा वेडावाकडा शब्द निघाला असेल... एक ना दोन तो दिवसभरातील सगळ्या घटना आठवायला लागतो... अखेर पाऊस थांबतो आणि त्याच्या ओठांना शब्द फुटतात...

सखे... काय झाले काय नेमके. का एवढी शांत आहे. वाटलं होत पावसामुळं थिजले असतील तुझे शब्द... पण जरा वेगळच प्रकरण दिसतयं... कोणासोबत काही बिनसलं का? की माझचं... काही चुकलयं... नाही रे... तुझं काही नाही चुकलं आणि तुझं चुकलं असतं तर एवढं शांत राहून सोडलं असत का तुला! आपलं काही चुकलं नाही हे कळाल्यावर त्या भोळ्या सांबाला जरा आवसान आलं. मग त्याच्या विचारण्यात जरा जोर आला... अगं मग झाल तरी काय का एवढी शांत झाली...

अरे, तो माधव म्हणाला दलितांनो अभिनंदन... काय राष्ट्रपती पदावरही आता यांना पिढीजात आरक्षण हवं आहे का? सोशल मीडियावर तर जणू यांच्यातील मळमळ त्या गंगेसारखी दुथडी भरून वाहात आहे. तरी, बरे एका संघीय दलिताची यांनी निवड केली. पण दलित म्हटले की स्वातंत्र्यांच्या इतक्या वर्षानंतरही एवढी मळमळ अजूनही यांच्या मनात आहे? मला तर वाटतं 2022 मध्ये येणारा राष्ट्रपती त्या राष्ट्रपती भवनाची शुद्धी करुनच प्रवेश करेल !

सखे, असं कसं म्हणते... सगळेच सारखे नसतात. अरे, नाही यांची भावना राष्ट्रपती भवन बाटल्याचीच आहे. यांच्या मनातील जळमटं अजूनही गेलेली नाहीत. आजही मी दलितांच्या घरी जेवतो, हे सांगण्यात यांना काय भूषणावह वाटतं माहित नाही तुला. पेपरात फोटो छापून आणले जातात. ट्विटर-फेसबुकवर जेवणात काय-काय मेनू होता याचे रसभरीत वर्णनं लिहिली जातात. म्हणजे माणूस म्हणून अजूनही दलितांना हे मान्य करायलाच तयार नाहीत का? बरे तरी ते कोविंद संघीय दलित आहेत.. आंबेडकरवादी दलित नाहीत. पण एखादी व्यक्ती दलित म्हटलं की त्याचे काही कतृत्व मान्यच करायचे नाही का?  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

योगीसाठी शहीदाच्या घरी लावला एसी, दानवेंच्या दारी आलेली शेतकऱ्यांची पोरं 'उपाशी'

शहीदाच्या कुटुंबाचीही देशभक्तीचे उमाळे येणारं सरकार थट्टा करु शकते, याचे ताजे उदाहरण उत्तर प्रदेशात पाहायला मिळाले आहे. भारत 'माते'साठी जीवाची बाजी लावून लढणाऱ्या शहीद प्रेम सागर यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी योगी आदित्यनाथांना 11 दिवस लागले. (की माहित नाही योगी मयताच्या दहाव्यानंतरच त्या घरात जातात असा काही नियम आहे.) हरकत नाही. ते शहीदाच्या घरी गेले. त्याच्या आदल्या रात्री उत्तर प्रदेशातील देवरिया या शहीद प्रेम सागर यांच्या घरी एसी, सोफा सेट, गालिचा आणि काही भगवी वस्त्रे पाठवण्यात आली होती. एवढेच नाही तर घरातील टॉवेल ही बदलण्यात आले होते. एका रात्रीतून एसी लाकडी बल्ल्यांवर फीट करण्यात आला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आले, त्यांनी शहीदाचे घर पाहिले, कुटुंबियांची भेट घेतली आणि कोरडी आश्वासने देऊन ते आल्या पावली परत गेले. शहीद प्रेम सागर यांच्या कुटुंबियांना वाटले होते की आदल्या रात्री आलेल्या वस्तू आता आपल्याच घरात राहातील. मुलगा गेला तरी सरकारने आपल्याला वाऱ्यावर सोडले नाही, मात्र त्यांचा हा भ्रम होता. शहीद प्रेम सागर यांचे वडील इश्वर चंद्र यांनी एका दैनिकाला दिलेल्य...

गरज थोड्या लवचिकतेची

वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातील एक मोठ्या व्होट बँकचा पूर्ण ताकदीने पाठिंबा आहे. हा मतदार स्वाभिमानी, विचारकरणारा आणि आंबेडकरी घराण्यावर निष्ठा असलेला निष्ठावान आहे. मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (भारिप), भारिप बहुजन महासंघ, २०१४ मध्ये डाव्यांसोबत केलेली आघाडी, २०१९ लोकसभा निवडणुकीत  एमआयएमला सोबत घेऊन लढवलेली निवडणूक, आणि विधानसभेत एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन केलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग. बाळासाहेबांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या या सर्व प्रयोगांमध्ये 'आंबेडकर'नावावर जीव ओवाळून टाकणारा मतदार तन-मन-धनाने त्यांच्यासोबत राहिला आहे. मात्र या निष्ठावान जनतेला अद्याप सत्तेची चव चाखायला मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत 'वंचित' उमेदवारांना मिळालेली मते पाहिल्यास स्पष्ट होते की, बौद्ध समाजाने बाळासाहेबांच्या नावावर भरभरुन मतदान केले आहे. मात्र बाळासाहेब ज्या ओबीसी, ओबीसींमधील छोट्या जाती, धनगर, अलुतेदार, बलुतेदार, आदिवासी, लिंगायत यांना सोबत घेऊन सत्ता संपादनाची इच्छा व्यक्त करत आहेत तो समाज पूर्ण ताकदीने बाळासाहेबांसोबत आल...

हा कसला फकीर... हा तर बेफिकीर पंतप्रधान - राज ठाकरे

हा कसला फकीर... हा तर बेफिकीर पंतप्रधान - राज ठाकरे १७व्या लोकसभेत महाराष्ट्रासह देशभर सध्या कोणाचे भाषण गाजत असेल तर ते आहे राज ठाकरे यांचे. महाराष्ट्राला राजकीय वक्त्यांची मोठी पंरपरा लाभलेली आहे. बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय सभा मारून नेईल असा सध्या एकमेव नेता आहे, ते म्हणजे राज ठाकरे. त्यासोबतच नाव घ्यावे लागेल 'हैदराबादी शेरवानी' अर्थात बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांचे. ओवेसी महाराष्ट्रीयन नसले तरी, यंदाच्या निवडणुकीत त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांसोबत महाराष्ट्रात अनेक दौरे करुन महाराष्ट्रीयन जनतेची नस अचूक ओळखल्याचे प्रत्येक सभेतून पाहायला मिळाले. राज ठाकरे यांचे 'लाव रे तो व्हिडिओ' हे आता वाक्य राहिले नाही तर ती एक फ्रेज झाली आहे. राज यांची भाषणे महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही चर्चेत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या उरात धडकी भरवणारे त्यांचे 'लाव रे तो व्हिडिओ' सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. एकही उमेदवार उभा केलेला नसताना राज्यात सर्वाधिक चर्चा आहे ती राज ठाकरे यांची. उद्याच्या सभेत राज ठाकरे...