मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मण अजूनही 'उपरा'

लक्ष्मण माने. 'उपरा' या पुस्तकाने महाराष्ट्रातील साहित्य जगत् ढवळून काढल्यानंतर लक्ष्मण मानेचा 'उपरा'कार लक्ष्मण माने झाले. आता पद्मश्री लक्ष्मण माने. फुले, शाहू, आंबेडकर चळवळीवर विश्वास असणा-य मानेंनी ज्या समाजातून आलो त्यांच्यासाठी काही करायचे ठरविले तेव्हा, "शिक्षण" हेच या समाजाला उन्नत्त करु शकेल हे जाणले आणि त्यांच्या साठी स्वत:च्या मालकीच्या जागेत आश्रम शाळा सुरु केली. या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आश्रमशाळेच्या तीन खोल्या आज पाडण्यात आल्या.
सातारा पालिकेने कोर्टाच्या आदेशाने ही शाळा जमीनदोस्त केली असलीतरी या मागे कच्छी आणि बारटक्के असोसिएट्स या बिल्डरांचा हात आहे.
सातारा जिल्हातील करंजे येथे वहिवाटीनुसार लक्ष्मण माने यांच्या मालकीच्या जागेत
भारतीय भटके विमुक्त संशोधन संस्थेची ही आश्रम शाळा आहे. विशेष म्हणजे शरद पवारांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे या विश्वस्त असलेल्या या शाळेला त्यांच्याच पक्षाच्या ताब्यात असलेल्या पोलीस खात्यांच्या सुरक्षेत पाडण्यात आले. या मुळे शासनापेक्षा बिल्डर भारी भरले आहेत, असंच म्हणावं लागेल.
उपरा या पुस्तकात माने यांनी सुरुवातीलाच लिहलं आहे की, ''जे जगलो, जे भोगलं, अनुभवलं, पाहिलं, ते तसचं लिहीत गेलो पुन्हा एकदा तेज जगणं जगत आहे." या ओळींचीच पुनुरोक्ती माने यांच्या आणि पर्यायाने भटक्या विमुक्तांच्या आयुष्यात आली आहे. असं म्हटल्यास वावगं ठरु नये.
भटक्या विमुक्तांच्या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही शाळा महत्त्वाचं काम करत आहे. आपल्याच जातीतील माणसाची शाळा आहे त्यामुळे आपल्या पोरांचं तिथ चांगलंच होईल हा विश्वास त्या निरक्षर मायबापांना आहे. त्यामुळे ही शाळा चालु राहणं , तिच्या इयत्ता वाढणं, वर्ग खोल्यांमध्ये आणि मुलभूत सोयीसुविधांमधे वाढ होणं पुरोगामी म्हणवूण घेणा-या आणि धनदांडग्यांच्या ईशा-यावर चालणा-या महाराष्ट्रासाठी गरजेचं आहे. शरद पवारांच्या मुलीचा सुप्रियांचा सक्रीय सहभाग असलेली ही शाळा त्यांच्याच शासनात पाडली जाते. याचा अर्थ सर्वसामान्य माणूस शासन व्यवस्थेपेक्षा न्यायव्यवस्था श्रेष्ठ असा घेईलही, परंतू ही शासनाची धूळफेक आहे. मुंबै-पुण्या प्रमाणेच आता महाराष्ट्रातल्या इतर शहरांमधेही बिल्डर लॉबी सक्रीय असल्याचे हे उदाहरण आहे. बिल्डरांना हवी असलेली जागा ते साम,दाम,दंड,भेद वापरुन हस्तगत करत आहेत. यातून कोणीच सुटु शकत नसल्याचंच यातून दिसत आहे.
या घटनेनंतर शासनातल्या कोणत्याच मंत्र्यानेही या घटनेची चौकशी केली जाईल, असे मगरीचे आश्रुही ढळले नाही आणि लक्ष्मण माने यांना पुन्हा एकदा "उपरा" ठरवलं आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरातील गाळ आणि चिखल

महाराष्ट्रात पुराने थैमान घातले आहे. सांगली, कोल्हापूर आणि सातारा शब्दशः पाण्याखाली गेला आहे. फक्त महाराष्ट्रच नाही तर केरळ, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश आणि राजस्थानही पावसाने धो-धो धुतले आहे. कोल्हापूरच्या पावसाच्या आणि पुराच्या बातम्या टीव्ही मीडियाने जरा बऱ्यापैकी दाखवण्यास सुरुवात केली होती. त्याचवेळी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस विदर्भातून महाजनादेश यात्रेवर निघाले होते. त्यांचा सहकारी पक्ष शिवसेनेची धाकटी पाती आदित्य ठाकरेची जनआशीर्वाद यात्रा सुरुच होती. या दोन्हीही यात्रा मीडिया पुराच्या पाण्यासोबत दाखवत होते. या दोन्ही मतांचा जोगवा मागणाऱ्या यात्रांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसही शिवाजी महाराजांचे नाव घेऊन टीव्हीतील संभाजी महाराजांना घेऊन शिवस्वराज्य यात्रेवर निघाली होती. या सर्व राजकीय यात्रा सुरु झाल्याबरोबरच मुंबई आणि कोकणात पावसाला सुरुवात झाली होती. मुख्यमंत्री फडणवीस अमरावतीहून गडचिरोलीला जाईपर्यंत पाऊस कोकणातून पश्चिम महाराष्ट्राकडे वळला होता. कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात पाऊस धो-धो बरसत होता. दिवसागणिक नाही तर तासातासाला पाणीपातळीत वाढ होत होती. राधानग...

भारत किती स्वच्छ

>> भारत किती स्वच्छ  नुकत्याच झालेल्या गांधी जयंतीला 'स्वच्छ भारत' अभियानाला एक वर्ष पूर्ण झाले.  या दिवशी गांधींऐवजी,  त्यांनी भगवान गौतम बुद्धांपासून घेतलेल्या अहिंसे ऐवजी स्वच्छतेचीच चर्चा जिकडे तिकडे होती. ही चांगली गोष्ट देखील आहे. लोक स्वच्छतेबाबत जागरुक होत आहे यात कोणालाही अडचण असण्याचे काही कारण नाही. महापुरुष हे आंधळ्यांच्या हाती लागलेल्या हत्तीसारखे असतात. ज्यांच्या हाताला जो भाग लागला ते त्याच अनुषंगाने त्यांचे विश्लेषण करतात यात महापुरुषाला दोष देता येणार नाही. केंद्रात भाजपचे सरकार (एनडीएचे सरकार आहे हे एनडीएचे घटक पक्षही विसरले असतील आतापर्यंत) आल्यापासून गांधींच्या अहिंसेऐवजी त्यांची स्वच्छताच अधिक चर्चेत आली आहे. नाही तर काँग्रेसच्या काळात गांधी जयंतीच्या आधीपासून आणि नंतरचे काही दिवस गांधींवर तत्कालिन माध्यमांमध्ये जी चर्चा होत होती त्यात गांधीचा स्वातंत्र्यासाठीचा लढा... हातात शस्त्र न घेता इंग्रजांची सत्ता उलथवून टाकणे... अहिंसेचे पुजारी... अशाच गांधींची चर्चा होत होती. आता वर्ध्यातील आश्रमात गांधींनी कोणाकोणाला संडास साफ करायला लावले. संडा...

गरज थोड्या लवचिकतेची

वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातील एक मोठ्या व्होट बँकचा पूर्ण ताकदीने पाठिंबा आहे. हा मतदार स्वाभिमानी, विचारकरणारा आणि आंबेडकरी घराण्यावर निष्ठा असलेला निष्ठावान आहे. मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (भारिप), भारिप बहुजन महासंघ, २०१४ मध्ये डाव्यांसोबत केलेली आघाडी, २०१९ लोकसभा निवडणुकीत  एमआयएमला सोबत घेऊन लढवलेली निवडणूक, आणि विधानसभेत एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन केलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग. बाळासाहेबांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या या सर्व प्रयोगांमध्ये 'आंबेडकर'नावावर जीव ओवाळून टाकणारा मतदार तन-मन-धनाने त्यांच्यासोबत राहिला आहे. मात्र या निष्ठावान जनतेला अद्याप सत्तेची चव चाखायला मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत 'वंचित' उमेदवारांना मिळालेली मते पाहिल्यास स्पष्ट होते की, बौद्ध समाजाने बाळासाहेबांच्या नावावर भरभरुन मतदान केले आहे. मात्र बाळासाहेब ज्या ओबीसी, ओबीसींमधील छोट्या जाती, धनगर, अलुतेदार, बलुतेदार, आदिवासी, लिंगायत यांना सोबत घेऊन सत्ता संपादनाची इच्छा व्यक्त करत आहेत तो समाज पूर्ण ताकदीने बाळासाहेबांसोबत आल...