मुख्य सामग्रीवर वगळा

आठवलेंचं बि-हाड रस्त्यावर

रामदास आठवले,
8-ए, लोधी रोड,
खान मार्केट समोर,
दिल्ली.


मागील अकरा वर्षांपासून असलेला रामदास आठवलेंचा हा पत्ता आता बेपत्ता झाला आहे. शुक्रवार, 18 सप्टेंबरला त्यांच्या दिल्लीतील सरकारी घराचा ताबा सरकारनं निष्ठूरपणे घेतला. आठवलेंच्या घरातील चीज-वस्तू या बेवारश्यासारख्या घराबाहेर ठेवून देण्यात आल्या.(की फेकून देण्यात आल्या). गौतम बुध्दांची मुर्ती, बाबासाहेबांचे छायाचित्र, पुस्तकांचे गठ्ठे, फुलदाण्या, टेबल-खुर्च्या, हे सर्व आठवलेंच्या मालकीचं सामान केंद्रीय सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कर्मचा-यांनी घराबाहेर काढलं. एका बाबागडीवर आठवलेंचा रुबाबदार फोटो ठेवून देण्यात आला होता. जणू काही आत्ताच तुम्ही या गाडीने आपला रस्ता पकडा असच काहीसं या सरकारी कर्मचा-यांना सांगायचं होतं. हे सरकारी कर्मचारी म्हणजे हुकमाचे ताबेदार. कोणीतरी 'बड्या' सरकारी बाबूने त्यांना आदेशदिला आणि त्या आदेशाची तामील करायला ते सरसावले. नसता सरकारी कर्मचारी एवढ्या तत्परतेने कामाला लागलेले कोणी पाहिलेत का ? माजी खासदार रामदास आठवलेंना घर खाली करण्यासाठी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम खात्याकडून 10 वेळा नोटीस बजावण्यात आली होती. मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही अश्या पद्धतीने बांधकाम खात्याकडून घर रिकामं करण्याचं समर्थन केलंय. मात्र अशी कारवाई आणखी किती माजी मंत्री आणि माजी खासदारांवर केली हे सांगण्यास ते विसरलेत. लोकसभा निवडणूकीत पराभूत झाल्यानंतर एका महिन्यात सरकारी निवासस्थानाचा ताबा सोडावा असा नियम आहे. त्यात आणखी एका महिन्याची वाढ करण्यात येते. या झाल्या तांत्रीक बाजू. हे नियम डावलून रहात असलेले काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचे शेजारी रामविलास पासवान यांच्याविरोधात 'सरकार'ने कोणतीही कारवाई केलेली नाही. मग आठवलेंनाच बेघर करण्याचा घाट बांधकाम विभागाने का घातला. काँग्रेसचे मणिशंकर अय्यर, रेणूका चौधरींसह अनेक पराभूत खासदारांच्या ताब्यात सरकारी बंगले आहेत. त्यांच्याकडे कशी काय डोळेझाक होते. भाजप,शिवसेना, अकाली दल, राष्ट्रीय जनता दलाचे अर्थात विरोधी पक्षाचे अनेक पराभूत खासदार अजूनही सरकारी बंगल्याच्या प्रेमात आहेत. सेनेचे मोहन रावले, तुकाराम रेंगे पाटील यांनीही माजी खासदार होऊनही खासदारांचे घर सोडलेले नाही. या कुणा विरुध्दच कारवाई झालेली नसतांना केवळ आठवलेंनी काँग्रेसच्या विरोधात आघाडी स्थापन केली म्हणून सुडबुध्दीने काँग्रेस शासनाने रामदास आठवलेंना रस्त्यावर आणण्याचा निचपणा केला आहे. हा राजकारणातील अत्यंत क्षुद्र प्रकार आहे.
काँग्रेस हे जळतं घर आहे, हे डॉ. बाबासाहेबांनी सांगितलं आणि अनेकदा अनेक आंबेडकरी पुढारी वेळोवेळी आपल्या भाषणातून सांगत असतात. तरीही सत्तेच्या तुकड्यासाठी याच जळत्या घराचा सहारा घेतात. या जळत्या घराचे चटके आता रामदास आठवलेंच्या रुपाने आंबेडकरी जनतेला वेळोवेळी बसत आहे. शिर्डी, अमरावती आणि अकोल्यातील पराभवाने आंबेडकरी जनता होरपळली. नंतर आठवलेंना राज्यसभेची उमेदवारी नाकारन्यात आली. आणि आता अपमानास्पदरित्या आठवलेंचं सामान घराबाहेर काढण्यात आलयं. केवळ आठवलेंनी काँग्रेस - राष्ट्रवादीची साथ-संगत सोडली म्हणून ही कारवाई करण्यात आलीय असं दिसत नाही तर महाराष्ट्रच्या येऊ घातलेल्या विधानसभेत आठवलेंनी उभी केलेली रिपाई ऐक्याची फळी आणि त्यापाठोपाठ तिस-या आघाडीचा महाराष्ट्रला दिलेला पर्याय, हा काँग्रेसला जास्त त्रासदायक ठरत असल्याने नेत्यांचं खच्चीकरण करण्यासाठीच हा प्रकार केला गेलाय. मात्र एवढ्याने खचतील ते आंबेडकरी पुढारी कसले. आम्ही कालही रस्त्यावर होतो आणि आजही रस्त्यावर आहोत. हिच भावना त्यांची असणार आहे. उलट या घटनेतून काँग्रेसबद्दलचा विरोध अधिक तिव्रच होईल. मतदानाच्या माध्यमातून हा विरोध नजिकच्या काळात दिसेलही.
या घटनेतून एक मात्र सिध्द झालय की काँग्रेसी हे कधीच कुणाचे नसतात. त्यांना गरज होती तो पर्यंत मार्क्सवादी डावेही काँग्रेसला हवेहवेशे होते. उत्तरप्रदेश, बिहार मधून काँग्रेसला नामशेष करणारे मुलायमसिंग आणि लालू यादवानांही मित्र म्हणून स्विकारलं. आज काँग्रेसची गरज संपल्यांनतर कसपटासमान त्यांनी या सर्वांना दुर केलं आहे. महाराष्ट्रात आता काँग्रेसला सेना-भाजपा बरोबर तिस-या आघाडीचाही सामना करावा लागणार आहे. याच धास्तीने काँग्रेसच्या पायाखालची जमीन सरकू लागल्याचे दिसत आहे. असल्या भ्याडप्रकाराने आंबेडकरी जनता घाबरणार तर नाही मात्र आणखी एकजूट होऊन काँग्रेस व त्याच्या मित्र पक्षांविरोधात भक्कमपणे उभी राहील.

टिप्पण्या

  1. लेख चांगला आहे......पण आठवले अजुनही सुधरलेयत....असं म्हणणं प्राप्त परिस्थितीत योग्य होणार नाही....सरकारस्थापनेच्यावेळी आठवले काय भूमिका घेतात यावरच आठवलेंच मुल्यांकन होऊ शकेल.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरातील गाळ आणि चिखल

महाराष्ट्रात पुराने थैमान घातले आहे. सांगली, कोल्हापूर आणि सातारा शब्दशः पाण्याखाली गेला आहे. फक्त महाराष्ट्रच नाही तर केरळ, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश आणि राजस्थानही पावसाने धो-धो धुतले आहे. कोल्हापूरच्या पावसाच्या आणि पुराच्या बातम्या टीव्ही मीडियाने जरा बऱ्यापैकी दाखवण्यास सुरुवात केली होती. त्याचवेळी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस विदर्भातून महाजनादेश यात्रेवर निघाले होते. त्यांचा सहकारी पक्ष शिवसेनेची धाकटी पाती आदित्य ठाकरेची जनआशीर्वाद यात्रा सुरुच होती. या दोन्हीही यात्रा मीडिया पुराच्या पाण्यासोबत दाखवत होते. या दोन्ही मतांचा जोगवा मागणाऱ्या यात्रांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसही शिवाजी महाराजांचे नाव घेऊन टीव्हीतील संभाजी महाराजांना घेऊन शिवस्वराज्य यात्रेवर निघाली होती. या सर्व राजकीय यात्रा सुरु झाल्याबरोबरच मुंबई आणि कोकणात पावसाला सुरुवात झाली होती. मुख्यमंत्री फडणवीस अमरावतीहून गडचिरोलीला जाईपर्यंत पाऊस कोकणातून पश्चिम महाराष्ट्राकडे वळला होता. कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात पाऊस धो-धो बरसत होता. दिवसागणिक नाही तर तासातासाला पाणीपातळीत वाढ होत होती. राधानग...

भारत किती स्वच्छ

>> भारत किती स्वच्छ  नुकत्याच झालेल्या गांधी जयंतीला 'स्वच्छ भारत' अभियानाला एक वर्ष पूर्ण झाले.  या दिवशी गांधींऐवजी,  त्यांनी भगवान गौतम बुद्धांपासून घेतलेल्या अहिंसे ऐवजी स्वच्छतेचीच चर्चा जिकडे तिकडे होती. ही चांगली गोष्ट देखील आहे. लोक स्वच्छतेबाबत जागरुक होत आहे यात कोणालाही अडचण असण्याचे काही कारण नाही. महापुरुष हे आंधळ्यांच्या हाती लागलेल्या हत्तीसारखे असतात. ज्यांच्या हाताला जो भाग लागला ते त्याच अनुषंगाने त्यांचे विश्लेषण करतात यात महापुरुषाला दोष देता येणार नाही. केंद्रात भाजपचे सरकार (एनडीएचे सरकार आहे हे एनडीएचे घटक पक्षही विसरले असतील आतापर्यंत) आल्यापासून गांधींच्या अहिंसेऐवजी त्यांची स्वच्छताच अधिक चर्चेत आली आहे. नाही तर काँग्रेसच्या काळात गांधी जयंतीच्या आधीपासून आणि नंतरचे काही दिवस गांधींवर तत्कालिन माध्यमांमध्ये जी चर्चा होत होती त्यात गांधीचा स्वातंत्र्यासाठीचा लढा... हातात शस्त्र न घेता इंग्रजांची सत्ता उलथवून टाकणे... अहिंसेचे पुजारी... अशाच गांधींची चर्चा होत होती. आता वर्ध्यातील आश्रमात गांधींनी कोणाकोणाला संडास साफ करायला लावले. संडा...

गरज थोड्या लवचिकतेची

वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातील एक मोठ्या व्होट बँकचा पूर्ण ताकदीने पाठिंबा आहे. हा मतदार स्वाभिमानी, विचारकरणारा आणि आंबेडकरी घराण्यावर निष्ठा असलेला निष्ठावान आहे. मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (भारिप), भारिप बहुजन महासंघ, २०१४ मध्ये डाव्यांसोबत केलेली आघाडी, २०१९ लोकसभा निवडणुकीत  एमआयएमला सोबत घेऊन लढवलेली निवडणूक, आणि विधानसभेत एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन केलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग. बाळासाहेबांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या या सर्व प्रयोगांमध्ये 'आंबेडकर'नावावर जीव ओवाळून टाकणारा मतदार तन-मन-धनाने त्यांच्यासोबत राहिला आहे. मात्र या निष्ठावान जनतेला अद्याप सत्तेची चव चाखायला मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत 'वंचित' उमेदवारांना मिळालेली मते पाहिल्यास स्पष्ट होते की, बौद्ध समाजाने बाळासाहेबांच्या नावावर भरभरुन मतदान केले आहे. मात्र बाळासाहेब ज्या ओबीसी, ओबीसींमधील छोट्या जाती, धनगर, अलुतेदार, बलुतेदार, आदिवासी, लिंगायत यांना सोबत घेऊन सत्ता संपादनाची इच्छा व्यक्त करत आहेत तो समाज पूर्ण ताकदीने बाळासाहेबांसोबत आल...