मुख्य सामग्रीवर वगळा

मुंबई - मराठीचा वांझोटा वाद

मुंबई कोणाची? महाराष्ट्रात मराठी सक्तीची. हा वाद पुन्हा एकदा चांगलाच रंगलाय. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मुंबईत टॅक्सी परवाना मराठी बोलता येणारांनाच दिला जाईल असं म्हटलंय. मुख्यमंत्री चव्हाण यांच्या या वक्तव्यानंतर दिल्लीश्वरांनी मुख्यमंत्र्यांना कान पिचक्या दिल्या असाव्यात. परिणामी अशोकरावांनी 'यु टर्न' घेत टॅक्सी चालकांना ग्राहकांना समजेल (अर्थात हिंदी-गुजराथी) अशा स्थानिक भाषेत संवाद साधावा असा पवित्रा घेतलाय.
या टॅक्सी परवान्यावरुन उद्योगपती मुकेश आंबानी यांना एनडीटिव्हीच्या एका चर्चासत्रात बरखा दत्त यांनी छेडलं असता, त्यानीही 'मुंबई सर्व भारतीयांची आहे', असं म्हटलं . झालं, शिवसेना - मनसे या मुद्यांच्या शोधात असलेल्या पक्षांना आयता विषय मिळाला. आंबानींच्या 'मुंबई इंडियन्स' च्या कॅप्टननेही असचं वक्तव्य मुंबईत केलं तेव्हाही बाळ ठाकरे आणि कंपनीला हे मुंबई वेगळे करण्याचे कारस्थान वाटले. आता आंबानी आणि सचिन कोणत्या सत्तास्थानावर आहेत की, ज्यांच्या बोलण्याने मुंबई वेगळी होईल हे ठाकरेंनाच माहित. मात्र या वक्तव्यामुळे असं बोलणा-यांना सेना धडा शिकवेल असं शिवसेनेचे मुखपत्र सामनातून सांगितलं गेलंय . तेही अत्यंत सभ्य भाषेत. कारण ते एका उद्योगपतीच्या विरोधातील वक्तव्य होतं. तर दुसरीकडे 'नाईट रायडर'चा मालक आणि अभिनेता शाहरुख खान याने पाकिस्तानी खेळाडूंना संघात घेता आले नाही याची खंत व्यक्त केली. झालं. पुन्हा एकदा सेनेचा आगाऊ राष्ट्रवाद उफाळून वर आला. भारतात पाकिस्तानी खेळाडूंना खेळू देणार नाही. शाहरुख मधील खान जागा झाला असेल तर त्याने 'मन्नत' सोडून कराचीला जाऊन खेळावे. असं शिवसेनेचे पगारी कार्यकर्ते खासदार संजय राऊत यांनी टीव्ही चॅनल्सच्या कॅमेरासमोर म्हटलं, आणि दुस-याच क्षणी
ठाण्यात आमदार एकनाथ शिंदेंनी 'माय नेम इज खान' चे पोस्टर जाळायला सुरुवात केली. सिनेमागृहाबाहेर पत्रकही लावले की शाहरुख खान जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत 'माय नेम इज खान' चे खेळ होउ देणार नाही. असे शिवसेनेचे एकाच वेळी मुंबई आणि मराठीचे वाक् बाण मुख्यमंत्र्यांपासून युपी-बिहारी पर्यंत सुटले. दुसरीकडे मुकेश आंबानी , शाहरुखवरही तोंडसुख घेण्याची संधी सेनेने सोडली नाही.
या मुंबई - मराठीच्या वादात आता 'रास्वसंघाचे' सरसंघचालक मोहन भागवतांप्रमाणेच कॉग्रंसचे युवराज राहूल गांधीही उतरले. युपी बिहारींना हकला म्हणणारांनी 'मुंबईवर हल्ला झाला तेव्हा एनएसजी कमांडोंना तुम्ही युपी- बिहारचे आहात म्हणून मुंबई बाहेर जायला सांगितले नाही, तर त्यांची मदत स्विकारली. असेच आपल्याला विकास साधायचा असेल तर सगळ्यांना सोबत घेवून पुढे जावे लागेल.' असं राहूल गांधीनी म्हटलंय. त्यावर सेनेने राहूलला रोम पुत्र म्हणत अत्यंत खालच्या थरावर जावून टिका केलीय. त्यांनंतर 5 तारखेला खासदार राहूल गांधी मुंबईत आले. लोकलने प्रवास केला. आपले कार्यक्रम यशस्वी पारपाडले आणि निघून गेले. मात्र शिवसेनेने 5 - 25 काळे झेंडे दाखविण्यापलिकडे काहीच केले नाही.
एकंदर मराठीच्या मुद्यावर बॅकफूटवर गेलेली शिवसेना, मनसेला मागे टाकून आता पुन्हा एकदा नव्या जोशात पुढे येण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान मुंबई महानगरपालिकेची ही तयारी आहेच.
मुळातच मराठीचा आग्रह . युपी - बिहारींवरील हल्ले. ऑस्ट्रेलिया - पाकिस्तानी खेळाडूंना मुंबईत भारतात खेळू न देण्याचा पवित्रा . पाकिस्तानी कलाकारांचे भारतात होणारे कार्यक्रम उधळणे किंवा उधळण्याच्या धमक्या देणे, हे मुंबई आणि महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या विकासाचे मुद्दे नाहीत. मराठी माणसालाही यात काही स्वारस्यं उरलेलं नाही.
सामान्य माणूस हा त्याच्या स्वंयपाक घरातील चिजवस्तूंचे भाव वाढल्याने ग्रासला आहे. पाणी वेळेवर येत नाही. पुरेसी विज मिळत नाही याने त्रासला आहे. पब्लिक ट्रांसपोर्ट चे धक्के खावून वैतागला आहे. तो या सर्व वक्तव्यांकडे - भाषणबाजीकडे तिरकसनजरेने करमणूक म्हणून पहात आहे. कारण यातून आउट-पुट काहिच नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरातील गाळ आणि चिखल

महाराष्ट्रात पुराने थैमान घातले आहे. सांगली, कोल्हापूर आणि सातारा शब्दशः पाण्याखाली गेला आहे. फक्त महाराष्ट्रच नाही तर केरळ, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश आणि राजस्थानही पावसाने धो-धो धुतले आहे. कोल्हापूरच्या पावसाच्या आणि पुराच्या बातम्या टीव्ही मीडियाने जरा बऱ्यापैकी दाखवण्यास सुरुवात केली होती. त्याचवेळी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस विदर्भातून महाजनादेश यात्रेवर निघाले होते. त्यांचा सहकारी पक्ष शिवसेनेची धाकटी पाती आदित्य ठाकरेची जनआशीर्वाद यात्रा सुरुच होती. या दोन्हीही यात्रा मीडिया पुराच्या पाण्यासोबत दाखवत होते. या दोन्ही मतांचा जोगवा मागणाऱ्या यात्रांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसही शिवाजी महाराजांचे नाव घेऊन टीव्हीतील संभाजी महाराजांना घेऊन शिवस्वराज्य यात्रेवर निघाली होती. या सर्व राजकीय यात्रा सुरु झाल्याबरोबरच मुंबई आणि कोकणात पावसाला सुरुवात झाली होती. मुख्यमंत्री फडणवीस अमरावतीहून गडचिरोलीला जाईपर्यंत पाऊस कोकणातून पश्चिम महाराष्ट्राकडे वळला होता. कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात पाऊस धो-धो बरसत होता. दिवसागणिक नाही तर तासातासाला पाणीपातळीत वाढ होत होती. राधानग...

भारत किती स्वच्छ

>> भारत किती स्वच्छ  नुकत्याच झालेल्या गांधी जयंतीला 'स्वच्छ भारत' अभियानाला एक वर्ष पूर्ण झाले.  या दिवशी गांधींऐवजी,  त्यांनी भगवान गौतम बुद्धांपासून घेतलेल्या अहिंसे ऐवजी स्वच्छतेचीच चर्चा जिकडे तिकडे होती. ही चांगली गोष्ट देखील आहे. लोक स्वच्छतेबाबत जागरुक होत आहे यात कोणालाही अडचण असण्याचे काही कारण नाही. महापुरुष हे आंधळ्यांच्या हाती लागलेल्या हत्तीसारखे असतात. ज्यांच्या हाताला जो भाग लागला ते त्याच अनुषंगाने त्यांचे विश्लेषण करतात यात महापुरुषाला दोष देता येणार नाही. केंद्रात भाजपचे सरकार (एनडीएचे सरकार आहे हे एनडीएचे घटक पक्षही विसरले असतील आतापर्यंत) आल्यापासून गांधींच्या अहिंसेऐवजी त्यांची स्वच्छताच अधिक चर्चेत आली आहे. नाही तर काँग्रेसच्या काळात गांधी जयंतीच्या आधीपासून आणि नंतरचे काही दिवस गांधींवर तत्कालिन माध्यमांमध्ये जी चर्चा होत होती त्यात गांधीचा स्वातंत्र्यासाठीचा लढा... हातात शस्त्र न घेता इंग्रजांची सत्ता उलथवून टाकणे... अहिंसेचे पुजारी... अशाच गांधींची चर्चा होत होती. आता वर्ध्यातील आश्रमात गांधींनी कोणाकोणाला संडास साफ करायला लावले. संडा...

गरज थोड्या लवचिकतेची

वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातील एक मोठ्या व्होट बँकचा पूर्ण ताकदीने पाठिंबा आहे. हा मतदार स्वाभिमानी, विचारकरणारा आणि आंबेडकरी घराण्यावर निष्ठा असलेला निष्ठावान आहे. मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (भारिप), भारिप बहुजन महासंघ, २०१४ मध्ये डाव्यांसोबत केलेली आघाडी, २०१९ लोकसभा निवडणुकीत  एमआयएमला सोबत घेऊन लढवलेली निवडणूक, आणि विधानसभेत एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन केलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग. बाळासाहेबांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या या सर्व प्रयोगांमध्ये 'आंबेडकर'नावावर जीव ओवाळून टाकणारा मतदार तन-मन-धनाने त्यांच्यासोबत राहिला आहे. मात्र या निष्ठावान जनतेला अद्याप सत्तेची चव चाखायला मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत 'वंचित' उमेदवारांना मिळालेली मते पाहिल्यास स्पष्ट होते की, बौद्ध समाजाने बाळासाहेबांच्या नावावर भरभरुन मतदान केले आहे. मात्र बाळासाहेब ज्या ओबीसी, ओबीसींमधील छोट्या जाती, धनगर, अलुतेदार, बलुतेदार, आदिवासी, लिंगायत यांना सोबत घेऊन सत्ता संपादनाची इच्छा व्यक्त करत आहेत तो समाज पूर्ण ताकदीने बाळासाहेबांसोबत आल...