विजयादशमी. दसरा. हे शब्द कानावर येताच आठवतात. सोनं म्हणून एकमेकांनी दिली जाणारी आपट्याची पानं. आप्त नातेवाईकांचे घेतलेलं दर्शन. संध्याकाळी रामलीला मैदानावर भरगच्च गर्दीत बघीतलेलं रावण दहन. यासगळ्या माझ्या औरंगाबादच्या बालपणीच्या आठवणी. यंदाचा माझा दसरा... विजयादशमी... धम्मचक्र प्रवर्तन दिन हा मुंबईत असणार आहे. उद्यावर येवून ठेपलेल्या या सणाचं मला इथं जराही अप्रुप नाही. हिंदू मायथालॉजीत दसरा किंवा दशहरा , विजयादशमीला वेगवेगळे अर्थ आहेत. आणि त्या अर्थानं यंदाचा दसरा राजकीयदृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. शस्त्रास्त्रांची पुजा करुन नवीन भूमी जिंकण्यासाठी पुर्वी सीमोल्लंघन या दिवशी केलं जात होतं. समाजातील आसुरी प्रवृत्तींवर शौर्यानं विजय मिळवून हा विजय साजरा करणं हे ह्या दिवसाचं महत्वं. याच दसरा दिवाळीच्या काळात यंदा महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूका आल्या आणि राजकीय पटलावरचं सीमोल्लंघन उभा महाराष्ट्र देश पाहणार आहे. आज म्हणजे दस-याच्या पुर्वसंध्येला राज ठाकरेंनी विधानसेभेच्या प्रचाराचा शुभारंभ मुंबईतील भांडूप येथून केला. तर काँग्रेस - राष्ट्रवादी यांच्या प्रचाराचा नारळ शरद पवारांनी सुशी...