जोगवा... 18 सप्टेंबरला प्रदर्शीत होणार आहे. याआधीच हा चित्रपट गाजतोय तो मराठी चित्रपटांमध्ये पहिला "किस" सिन असल्यामुळे. या चित्रपटाला 60 नामांकनं मिळालीत तर 37 पारितोषिकं प्रदर्शनाआधिच या चित्रपटाने पटकावली आहेत. मराठी चित्रपट बदलतोय हे श्वास पासून आपण पहात आलोय. गंध, गाभ्रीचा पाऊस,हरिश्चंद्रांची फॅक्टरी, नुकताच प्रदर्शित झालेला रिटा आणि आता जोगवा... या सगळ्या चित्रपटांनी मराठी चित्रसृष्टीला आऊट ऑफ फ्रेम केलं आहे. एका चौकटीत अडकलेला मराठी सिनेमा या चित्रपटांमुळे जगाच्या पटलावर गेला. असं असतांना केवळ एका किसचं दृष्य आहे म्हणून मराठी माध्यमांनी मराठी चित्रपट बोल्ड झालाय म्हणनं कितीसं सोईस्कर आहे. जोगवा तून मांडलेला विषय आपल्या संस्कृतीचे गोडवे गाणा-यांना खरतर एक चपराक आहे. ज्याचा जन्म पुरुष म्हणून झालाय त्याला स्त्रीचा पेहराव करून त्याच्या मनाविरुध्द बायकांचं जिनं जगावं लागतं. त्याच्या भाव, भावनांचा विचार इथल्या समाजाने कधीच केला नाही. केवळ यल्लमाला वाहिला म्हणून त्यानं जोगत्याचंच जिनं जगावं, हे या समाजाला मान्य होतं? त्याविरोधात कधी कोणी बोलायला पुढे सरसावत नाही? कोणी त्याविषयी बोलायचा - ही कोंडी फोडायचा प्रयत्न केला तर संस्कृतीच्या फे-यात हा विषय अडकवण्याचा प्रयत्न होतांना दिसत आहे.
चित्रपट हे माध्यम मानवाच्या भाव-भावना, संस्कृती-विकृतींना जगासमोर आणणारं आहे. हिंदी चित्रपटांमध्ये चुंबन दृष्य दाखवली जाऊ लागली तेव्हा कोणी एवढा संस्कृती बुडाल्याचा आव आणला नाही. राजा हिंदूस्थानी सुपर-डूपर हिट झाला. मर्डरला नाकं मुरडली गेली, मात्र त्याच्यावर बंदी आणण्याइतपत कृत्य देशभर कुठेच घडलं नाही. हॉलिवूडचे चुंबन आणि त्याही पुढच्या प्रणय दृष्यांने भरलेले चित्रपट हेच प्रेक्षक मिटक्या मारत बघतातचना ? मग एखाद्या मराठी चित्रपटात चुंबनदृष्यं आलं तर त्या चित्रपटाचा विषय बाजूला ठेवून तेवढ्या एकाच दृष्याबद्दल वादंग का माजावा ?
आपल्याच मातीतल्या - रंग,रुप, भाषेने आपल्यासारखे असल्यामुळे कदाचित आपल्याला जोगवातील त्या दृष्याबद्दल आक्षेप असू शकतो, की आपल्या माणसांनी असं काही चव्हाट्यावर येवून करायला नको. मान्य आहे. आजही आपल्या समाजात सार्वजनिक ठिकाणांवर मुला मुलीने जास्त वेळ एकत्र बसनं , एकमेकांच्या अंगचटीला जाणं अशोभनीय वाटतं. याला समाजमान्यता नाही. मात्र चित्रपटांमध्ये आपल्याच आयुष्याचे प्रतिबिंब उमटलेलं असतं हे आपण का विसरतो? आजच्या समाजाची जीवनशैली, व्यक्त होण्याच्या पध्दती या चित्रपटांमध्ये येणारच. हे आपण का विसरतो. दोन प्रेमी जीव एकत्र आल्यानंतर - त्यांच्या भावनांचे बांध फुटल्यानंतर, ते निशब्द होतात... त्यावेळेस स्पर्षाची भाषाच हजार गोष्टी बालून जाते. हे समजायला आणि स्वाकारायला आपल्याला अजून किती वर्ष आणि किती शतकं जाऊद्यावी लागणार आहे.

भाई.....तुषार दळवी आणि रेश्म टिपणीस यांचा जीवलगा चित्रपटातील चुंबनदृश्य तुम्ही कसे काय विसरलेयत.....तुमच्याच काळातील चित्रपट तुम्ही विसरले की काय.......याला काय म्हणावं भाई....
उत्तर द्याहटवा