मुख्य सामग्रीवर वगळा

दस-याच्या निमीत्ताने...

विजयादशमी. दसरा. हे शब्द कानावर येताच आठवतात. सोनं म्हणून एकमेकांनी दिली जाणारी आपट्याची पानं. आप्त नातेवाईकांचे घेतलेलं दर्शन. संध्याकाळी रामलीला मैदानावर भरगच्च गर्दीत बघीतलेलं रावण दहन. यासगळ्या माझ्या औरंगाबादच्या बालपणीच्या आठवणी.
यंदाचा माझा दसरा... विजयादशमी... धम्मचक्र प्रवर्तन दिन हा मुंबईत असणार आहे. उद्यावर येवून ठेपलेल्या या सणाचं मला इथं जराही अप्रुप नाही.
हिंदू मायथालॉजीत दसरा किंवा दशहरा , विजयादशमीला वेगवेगळे अर्थ आहेत. आणि त्या अर्थानं यंदाचा दसरा राजकीयदृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे.
शस्त्रास्त्रांची पुजा करुन नवीन भूमी जिंकण्यासाठी पुर्वी सीमोल्लंघन या दिवशी केलं जात होतं. समाजातील आसुरी प्रवृत्तींवर शौर्यानं विजय मिळवून हा विजय साजरा करणं हे ह्या दिवसाचं महत्वं.
याच दसरा दिवाळीच्या काळात यंदा महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूका आल्या आणि राजकीय पटलावरचं सीमोल्लंघन उभा महाराष्ट्र देश पाहणार आहे.
आज म्हणजे दस-याच्या पुर्वसंध्येला राज ठाकरेंनी विधानसेभेच्या प्रचाराचा शुभारंभ मुंबईतील भांडूप येथून केला. तर काँग्रेस - राष्ट्रवादी यांच्या प्रचाराचा नारळ शरद पवारांनी सुशीलकुमार आणि दोघांच्याही कन्या सुप्रिया - प्रणिती (आता या दोघी केवळ यांच्या कन्यका नाहीत तर एक खासदार सुप्रिया सुळे तर दुसरी आमदार होण्यासाठी मध्य सोलापूर मधून रिंगणात उतरलीय.) यांच्या उपस्थितीत सोलापूर जिल्ह्यातील शेटफळ येथे फोडला.
पुर्वी समारंगणावर जाण्यासाठी दस-याचा मुहुर्त निवडला जात होता. आता या नेत्यांना जनतेवर आणि महाराष्ट्रावर राज्य करण्यासाठीही दस-याचा आयता मुहुर्त सापडला आहे. आता ही सर्व नेतेमंडळी महाराष्ट्रतील महानगरांपासून शहर, वाड्या वस्त्यांवर आपल्या एसी गाड्यांची धूळ झाडणार आहेत.
आचारसंहितेच्या बडग्यामुळे पुर्वीसारखे निवडणूकीचे वातावरण आता दिसत नाही. सामान्यमाणूस निवडणूकीपासून अलिप्त असल्यासारखा दिसत असला तरी तो या निवडणूकीने भारवून गेलेला काही दिवसांमधे दिसेल. कारण या एका निमीत्तानेच जनतेचे सेवक असणारे हे तथाकथीत नेते आपल्या दारांचे उंबरे झिजवतात. अन्यथा काय देणं घेणं असतं हो यांना सामान्य माणसाच्या रोजच्या जगण्याशी. लोकलमधल्या जिवघेण्या गर्दीत हे कधीच नसतात. किराणामालाचे भाव वाढले म्हणून महिन्याचा ताळेबंद बसवण्याच्या चिंतेने यांना कधी ग्रासलेले नसते. की मुलांच्या अँडमिशनसाठी शाळा - कॉलेजांच्या खेट्या यांना माराव्या लागत नाही. दवाखाण्यातल्या खाटा भरल्या म्हणून वरांड्यात, कॅनॉपि मध्ये हे नेते किंवा यांचे सगेसोयरे कधीच डॉक्टरच्या प्रतिक्षेत पडलेले नसतात. या समस्या यांना माहित नाहीत असंही काही नाही. मात्र सगळं कळूनही आम्ही त्या गावचे नाही असाच यांचा कायम पवित्रा असतो.
या विधानसभा निवडणूकीच्या निमीत्ताने बीजली-सडक-पाणी , स्वस्त धान्य पुरविण्याचे आश्वासन हे मागील पाच वर्षात पैशाने गब्बर झालेले नेते आपट्याच्या पानांप्रमाणे जनतेला देतील. आणि आपापल्या रंगमहालात शानदार फराळासह विजयाचे फटाके उडवतिल. तुर्तास आपणही निवडणूकीचा रंगलेला फड बघत राहू.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गरज थोड्या लवचिकतेची

वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातील एक मोठ्या व्होट बँकचा पूर्ण ताकदीने पाठिंबा आहे. हा मतदार स्वाभिमानी, विचारकरणारा आणि आंबेडकरी घराण्यावर निष्ठा असलेला निष्ठावान आहे. मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (भारिप), भारिप बहुजन महासंघ, २०१४ मध्ये डाव्यांसोबत केलेली आघाडी, २०१९ लोकसभा निवडणुकीत  एमआयएमला सोबत घेऊन लढवलेली निवडणूक, आणि विधानसभेत एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन केलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग. बाळासाहेबांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या या सर्व प्रयोगांमध्ये 'आंबेडकर'नावावर जीव ओवाळून टाकणारा मतदार तन-मन-धनाने त्यांच्यासोबत राहिला आहे. मात्र या निष्ठावान जनतेला अद्याप सत्तेची चव चाखायला मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत 'वंचित' उमेदवारांना मिळालेली मते पाहिल्यास स्पष्ट होते की, बौद्ध समाजाने बाळासाहेबांच्या नावावर भरभरुन मतदान केले आहे. मात्र बाळासाहेब ज्या ओबीसी, ओबीसींमधील छोट्या जाती, धनगर, अलुतेदार, बलुतेदार, आदिवासी, लिंगायत यांना सोबत घेऊन सत्ता संपादनाची इच्छा व्यक्त करत आहेत तो समाज पूर्ण ताकदीने बाळासाहेबांसोबत आल...

हा कसला फकीर... हा तर बेफिकीर पंतप्रधान - राज ठाकरे

हा कसला फकीर... हा तर बेफिकीर पंतप्रधान - राज ठाकरे १७व्या लोकसभेत महाराष्ट्रासह देशभर सध्या कोणाचे भाषण गाजत असेल तर ते आहे राज ठाकरे यांचे. महाराष्ट्राला राजकीय वक्त्यांची मोठी पंरपरा लाभलेली आहे. बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय सभा मारून नेईल असा सध्या एकमेव नेता आहे, ते म्हणजे राज ठाकरे. त्यासोबतच नाव घ्यावे लागेल 'हैदराबादी शेरवानी' अर्थात बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांचे. ओवेसी महाराष्ट्रीयन नसले तरी, यंदाच्या निवडणुकीत त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांसोबत महाराष्ट्रात अनेक दौरे करुन महाराष्ट्रीयन जनतेची नस अचूक ओळखल्याचे प्रत्येक सभेतून पाहायला मिळाले. राज ठाकरे यांचे 'लाव रे तो व्हिडिओ' हे आता वाक्य राहिले नाही तर ती एक फ्रेज झाली आहे. राज यांची भाषणे महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही चर्चेत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या उरात धडकी भरवणारे त्यांचे 'लाव रे तो व्हिडिओ' सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. एकही उमेदवार उभा केलेला नसताना राज्यात सर्वाधिक चर्चा आहे ती राज ठाकरे यांची. उद्याच्या सभेत राज ठाकरे...

मोदी-शहा जोडींने का निवडले रामनाथ कोविंद यांना

मोदी-शहा जोडीचा खेळ खरच अगम्य आहे. कोणाच्याही ध्यानी मनी नसलेले नाव त्यांनी राष्ट्रपती पदासाठी पुढे केले. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुमित्रा महाजन आणि शिवसेनेने पुढे केलेले मोहन भागवत, डॉ. एम.एस स्वामिनाथन या सर्वांना बाजूला करत शहांनी पत्रकार परिषदेत रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा केली. एनडीएचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून उत्तर प्रदेशचे दलित व्यक्ती, एकेकाळी आएएएस परीक्षा उत्तीर्ण परंतू वकिलीचाच पेशा कायम ठेवणारे भाजपच्या दलित मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष, दोनवेळा राज्यसभा सदस्य आणि सध्या बिहारचे राज्यपाल असलेल्या कोविंद यांचे नाव पुढे करुन मोदी-शहा जोडीने सर्वांचीच (विरोधकांची) पंचायत करुन टाकली आहे. मोदी आणि शहा हे कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात 2020, 2022 मध्ये हे साध्य होईल किंवा हे ध्येय गाठले जाईल असे सांगतात तेव्हा विरोधक त्यांची खिल्ली उडवतात. अजून 2019 बाकी आहे. मात्र या जोडीने 2019 ची तयारी ही किती आधीपासून केली याची प्रचिती त्यांच्या प्रत्येक निर्णयातून विरोधकांना यायला हवी. 2019 मध्ये उत्तर प्रदेशातील संपूर्ण दलितांची मते ही भाजपच्या पारड्यात पडण्यास...