बिहार विधानसभा निवडणूक ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १६ महिन्यांच्या कामाची परीक्षा आहे. त्यांनी त्यांची सर्व शक्ती तिथे पणाला लावली आहे. त्यासाठी ते काहीही करायला तयार आहेत.त्याचमुळे त्यांचे बोलण्याचे ताळतंत्र सुटले आहे. याचे दुषण भाजप समोरच्या महाआघाडीतील जेडीयू-आरजेडी-काँग्रेसला देईलही . पण जनतेला हे कळणार नाही असे केंद्रातील आणि राज्यातील दोन्ही मोदींना कसे कळत नाही याचेच नवल वाटते. बस्तरच्या सभेत तर पंतप्रधानांनी थेट नितीशकुमार आणि लालू यादवांना आव्हानच केले की तुमच्याकडे जेवढ्या शिव्या असतील तेवढ्या आता देऊन टाका, शेवटचे सात-आठ दिवसच शिल्लक राहिले आहे. आज बिहार विधानसेभेच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान होत आहे. त्यानिमीत्ताने एक दिवस आधीच मी दिव्य मराठी वेब साईटसाठी (divyamarathi.com) आतापर्यंतच्या प्रचारावर माझे मत मांडले होते. त्यात विकासापासून सुरु झालेली चर्चा आता शिवीगाळीवर आणि तंत्र-मंत्रात अडकल्याचे मांडले आहे. आज बिहारमध्ये ५० जगांसाठी मतदान होत आहे. त्यानिमीत्ताने वेबसाईटसाठीेचे विश्लेषण पुन्हा एकदा माझ्या BLOG वर पुनर्प्रकाशित करीत आहे. नेते हवेत मुद्दे ...