मुख्य सामग्रीवर वगळा

अजित पवारांची सरंजामशाही जनतेने उतरवावी... कोण राज ठाकरे ? प्रकाश आंबेडकरांशी एक संवाद


बाळासाहेब आंबेडकरांशी बोलायला मिळणे हा तसा आनंददायी क्षण. मानवमुक्तीचे उदगाते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ते वंशज म्हणून त्यांचे महत्त्व आहेच, त्याशिवाय बाळासाहेबांनी विचारवंत आणि ध्येयनिष्ठ आणि कणा असलेले राजकीय नेते म्हणूनही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशा श्रध्देय नेत्याशी बोलण्याची ८ एप्रिल रोजी संधी मिळाली. माझे वडील अँड. रमेशभाई खंडागळे लिखित 'एकीत जय आणि बेकीत क्षय' पुस्तक प्रकाशनानिमीत्त औरंगाबादच्या सुभेदारी विश्रामगृहावर त्यांची भेट झाली. जवळपास तासभर त्यांच्या सहवासात होतो. त्यावेळी ते मराठवाडा आणि औरंगाबाद येथील अनेक कार्यकर्त्यांशी विविध विषयांवर चर्चा करत होते. कार्यकर्त्यांच्या अडचणी-समस्या समजून घेऊन त्यावर तत्काळ उपाय सुचवत होते. काहीवेळेस ज्यांच्या मार्फत या समस्या सुटतील अशा मंत्री, प्रशासकीय अधिकारी उच्चपदस्थ राजकारणी यांना फोनवर सुचना देत होते.  माझे वडील रमेशभाई यांच्यामुळे सूर्यकुळातील या राजहंसाशी मी संवाद साधला. तो नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दुष्काळग्रस्तांची ज्या खालच्या थरावर जावून टिंगल उडविली त्याविषयी. त्यासोबतच ओघाने आलेले इतर प्रश्नही त्यांच्यापुढे ठेवले. त्यांच्याशी झालेला हा संवाद प्रश्नोत्तर रुपात मांडत आहे.  

अजित पवार यांनी दुष्काळग्रस्तांची जी थट्टा केली आहे त्याची निंदा करावी तेवढी थोडी आहे. सत्तेची हवा अजित पवारांच्या डोक्यात गेली आहे. मराठा समाज आमच्या सोबत आहे, आम्हाला सत्तेतून कोणीही बाहेर काढू शकत नाही, ही मस्ती त्यांच्यात आली आहे. या सरंजामशाही वृत्तीचा धिक्कार करतो अशा शब्दात भारिप बहुजन महासंघाचे नेते - अध्यक्ष अँड. प्रकाश आंबेडकर यांनी अजित पवारांवर टीक केली.

इंदापूर येथे अजित पवारांनी केलेल्या वक्त्यव्यावर तुमची काय प्रतिक्रीया आहे यावर, अँड. आंबेडकर म्हणाले, राज्यात भीषण दुष्काळ आहे. जनता दुष्काळाविरोधात लढत आहे. सोलापूरचे देशमुखही दुष्काळी परिस्थितीत राज्य सरकारने जनतेला मदत करावी यासाठी उपोषणाला बसले आहेत. अनेक पक्ष, संघटनांचा त्यांना पाठींबा आहे. अनेक कार्यकर्ते रोज त्यांना भेटून पाठींबा दर्शवत आहेत. अशा वेळेस राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना मदत देण्यासाठी पुढे येण्याएवजी दुष्काळग्रस्तांची क्रूर चेष्टा केली आहे. त्यांनी केलेले वक्तव्य हे सरंजामशाही वृतीचे आहे. मराठा समाज आमच्या शिवाय जगू शकत नाही अशी त्यांची समजूत झाली आहे. तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी, आणि त्यांच्या काँग्रेसने पवारांचे वक्तव्य त्यांना मान्य आहे का? हे स्पष्ट केले पाहिजे. मुख्यमंत्री चव्हाण यांना लवकरात लवकर याचा खुलासा केला पाहिजे. राज्याचे प्रमुख या नात्याने त्यांची ही जबाबदारी आहे.

अजित पवारांचे काका आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनीही अजित पवार यांना अजूनही मंत्रिमंडळात ठेवणार का ? हे स्पष्ट केले पाहिजे.  ते (शरद पवार) शेतकरी आणि दुष्काळग्रस्तांच्या बाजूचे आहेत का हे देखील यातून स्पष्ट होणार आहे.

मराठा समाज पूर्णपणे पवारांच्या पाठीमागे आहे असे तुमचे मत आहे का ? 
पवारांना असे वाटते की, आपण मराठ्यांचे एकमेव नेते आहोत. आपल्याशिवाय ते जगूच शकत नाही. ही त्यांची सरंजामी वृती आहे. इथल्या मराठ्यांना माझा सवाल आहे की, ते आता तरी काही निर्णय घेणार आहेत की नाही? पवार आता जमीनीवर मुतायला तयार झाले आहेत, उद्या ते तुमच्या डोक्यावर मुतायलाही कमी करणार नाही. तेव्हा येत्या सहा महिन्यात तुम्हाला (मराठ्यांना) याचे उत्तर द्यावे लागणार आहे की, पवारांच्या इंदापूरमधील वक्तव्याबद्दल जनता त्यांना जाब विचारणार आहे की नाही?

शरद पवार आणि अजित पवार यांच्या राजकारणीच तुलना तुम्ही कशी करता ?
एका शब्दात सांगायचे झाले तर, शरद पवारांच्या राजकारणाला Human Touch आहे, तर अजित पवारांचे सरंजामशाही राजकारण आहे.

आज तुम्ही औंरगाबादमध्ये आहात, भारतीय जनता पक्षाचे नेते खासदार गोपीनाथ मुंडे दुष्काळग्रस्तांसाठी उपोषणाला बसले आहेत. तर, पक्षीय राजकारण बाजूला ठेवून तुम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी जाणार का? 
मुंडे हे दुष्काळग्रस्तांसाठी उपोषणाला बसलेले नाहीत तर, ते संत्रा बागायतदारांसाठी पाणी सोडावे यासाठी उपोषणाला बसले आहेत. दुसरे असे की, सत्तेत असल्यानंतर काहीच करायचे नाही आणि सत्तेतून बाहेर पडले की, विरोध करायचा हे यांचे राजकारण आहे. भाजप दुष्काळाचे राजकारण करत आहे, त्यामुळे त्यांना पाठिंबा देण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही.

मराठा आरक्षणाला जळगावमधील सभेत राज ठाकरे यांनी विरोध केला आहे, मराठा आरक्षणाबद्दल तुमचे धोरण काय आहे ? 

कोण आहे राज ठाकरे ? राज ठाकरे काय आता इथले प्रत्येक धोरण ठरवणार आहे का ? मीडियाने मोठे केलेले काही लोक असतात, तसे हे आहेत. असेच राष्ट्रीय मीडिया एक विषय मोठा करत आहे. तो म्हणजे, राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी. ही तुलनाच चुकीची असल्याचे मी कित्येक दिवसांपासून सांगत आहे. मात्र, माध्यमांमध्ये हा चर्चेचा विषय झाला आहे.  बुलडॉग आणि जर्मन शेफर्ड यांच्यात कधी भांडण झाल्याचे तुम्ही पाहिले आहे का ?  असो.

आरक्षणाबद्दल बोलायचे तर, आरक्षण ही सायकीक गोष्ट झाली आहे. ती वाढू देणे चूकीचे आहे. इतरांपेक्षा मी मागे राहिलो आहे, असे जर मराठ्यांना वाटत असेल तर त्यांना आरक्षण देण्यास आमची हरकत नाही. मात्र, ते देत असताना ओबीसीमधून दिले जाण्याला आमचा विरोध आहे.  मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण दिले गेले पाहिजे ही आमची असलेली भूमिका आहे.

... पण त्यामुळे आरक्षणाची मर्यादा वाढते ?
सर्वोच्च न्यायलयाच्या निर्देशानुसारच आरक्षण दिले गेले पाहिजे असे आमचे मत आहे. पण, जर एखाद्या समाजाला वाटत असेल की आम्ही इतरांपेक्षा मागे राहात आहोत तर, कायद्यात बदल करून त्यांना आरक्षण देण्यास हरकत नाही.

दुष्काळी गावांमध्ये सध्या टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे, मात्र गावातील उच्चभ्रू आणि सधन वर्गाला प्रथम पाणी दिले जाते आणि उरले तर दलित वस्त्यांमध्ये टँकर जात असल्याची राज्यात परिस्थिती आहे, या बद्दल आपले मत काय आहे?
पाणी वाटपाबद्दल याआधीच आम्ही जाहिर केलेले आहे की, गावातील एक विहिर निश्चित करून त्यात टँकरेचे पाणी टाकले गेले पाहिजे आणि त्यातून सर्वांनी पाणी घेतले पाहिजे. यामुळे संपूर्ण गावाला पाणी मिळेल अन्यथा जे धनदांडगे आहेत ते पाणी पळवत राहातील आणि दलित - पददलितांना पाण्यासाठी भटकंतीच करावी लागले. त्यामुळे राज्य सरकारने आता तरी पाणी वाटपाचे धोरण बदलले पाहिजे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

योगीसाठी शहीदाच्या घरी लावला एसी, दानवेंच्या दारी आलेली शेतकऱ्यांची पोरं 'उपाशी'

शहीदाच्या कुटुंबाचीही देशभक्तीचे उमाळे येणारं सरकार थट्टा करु शकते, याचे ताजे उदाहरण उत्तर प्रदेशात पाहायला मिळाले आहे. भारत 'माते'साठी जीवाची बाजी लावून लढणाऱ्या शहीद प्रेम सागर यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी योगी आदित्यनाथांना 11 दिवस लागले. (की माहित नाही योगी मयताच्या दहाव्यानंतरच त्या घरात जातात असा काही नियम आहे.) हरकत नाही. ते शहीदाच्या घरी गेले. त्याच्या आदल्या रात्री उत्तर प्रदेशातील देवरिया या शहीद प्रेम सागर यांच्या घरी एसी, सोफा सेट, गालिचा आणि काही भगवी वस्त्रे पाठवण्यात आली होती. एवढेच नाही तर घरातील टॉवेल ही बदलण्यात आले होते. एका रात्रीतून एसी लाकडी बल्ल्यांवर फीट करण्यात आला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आले, त्यांनी शहीदाचे घर पाहिले, कुटुंबियांची भेट घेतली आणि कोरडी आश्वासने देऊन ते आल्या पावली परत गेले. शहीद प्रेम सागर यांच्या कुटुंबियांना वाटले होते की आदल्या रात्री आलेल्या वस्तू आता आपल्याच घरात राहातील. मुलगा गेला तरी सरकारने आपल्याला वाऱ्यावर सोडले नाही, मात्र त्यांचा हा भ्रम होता. शहीद प्रेम सागर यांचे वडील इश्वर चंद्र यांनी एका दैनिकाला दिलेल्य...

गरज थोड्या लवचिकतेची

वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातील एक मोठ्या व्होट बँकचा पूर्ण ताकदीने पाठिंबा आहे. हा मतदार स्वाभिमानी, विचारकरणारा आणि आंबेडकरी घराण्यावर निष्ठा असलेला निष्ठावान आहे. मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (भारिप), भारिप बहुजन महासंघ, २०१४ मध्ये डाव्यांसोबत केलेली आघाडी, २०१९ लोकसभा निवडणुकीत  एमआयएमला सोबत घेऊन लढवलेली निवडणूक, आणि विधानसभेत एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन केलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग. बाळासाहेबांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या या सर्व प्रयोगांमध्ये 'आंबेडकर'नावावर जीव ओवाळून टाकणारा मतदार तन-मन-धनाने त्यांच्यासोबत राहिला आहे. मात्र या निष्ठावान जनतेला अद्याप सत्तेची चव चाखायला मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत 'वंचित' उमेदवारांना मिळालेली मते पाहिल्यास स्पष्ट होते की, बौद्ध समाजाने बाळासाहेबांच्या नावावर भरभरुन मतदान केले आहे. मात्र बाळासाहेब ज्या ओबीसी, ओबीसींमधील छोट्या जाती, धनगर, अलुतेदार, बलुतेदार, आदिवासी, लिंगायत यांना सोबत घेऊन सत्ता संपादनाची इच्छा व्यक्त करत आहेत तो समाज पूर्ण ताकदीने बाळासाहेबांसोबत आल...

हा कसला फकीर... हा तर बेफिकीर पंतप्रधान - राज ठाकरे

हा कसला फकीर... हा तर बेफिकीर पंतप्रधान - राज ठाकरे १७व्या लोकसभेत महाराष्ट्रासह देशभर सध्या कोणाचे भाषण गाजत असेल तर ते आहे राज ठाकरे यांचे. महाराष्ट्राला राजकीय वक्त्यांची मोठी पंरपरा लाभलेली आहे. बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय सभा मारून नेईल असा सध्या एकमेव नेता आहे, ते म्हणजे राज ठाकरे. त्यासोबतच नाव घ्यावे लागेल 'हैदराबादी शेरवानी' अर्थात बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांचे. ओवेसी महाराष्ट्रीयन नसले तरी, यंदाच्या निवडणुकीत त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांसोबत महाराष्ट्रात अनेक दौरे करुन महाराष्ट्रीयन जनतेची नस अचूक ओळखल्याचे प्रत्येक सभेतून पाहायला मिळाले. राज ठाकरे यांचे 'लाव रे तो व्हिडिओ' हे आता वाक्य राहिले नाही तर ती एक फ्रेज झाली आहे. राज यांची भाषणे महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही चर्चेत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या उरात धडकी भरवणारे त्यांचे 'लाव रे तो व्हिडिओ' सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. एकही उमेदवार उभा केलेला नसताना राज्यात सर्वाधिक चर्चा आहे ती राज ठाकरे यांची. उद्याच्या सभेत राज ठाकरे...