मुख्य सामग्रीवर वगळा

हिंसाचाराचे समर्थन करण्यापूर्वी एकदा तरी विचार करा...

पंतप्रधान देशातील दोन समाजामधील भेद ठळक होईल असे विधान भरसभेत करतात. त्यांचा उद्देश स्पष्ट असतो की बहुसंख्य समाजाचे एकगठ्ठा मतदान भाजपला झाले पाहिजे. त्यामुळेच कदाचित त्यांच्या पक्षाने देशातील सर्वात मोठ्या राज्यात एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही.

उत्तर प्रदेशातील फतेहपूर येथील जाहीर सभेत कबरस्थान आणि स्मशानाचा उल्लेख करुन मोदींनी प्रचाराची पातळी शेवटच्या टोकाला नेऊन ठेवली. 18 फेब्रुवारीला झालेल्या या सभेत मोदींनी मुस्लिमांच्या कबरस्थानला जशा सोयी-सुविधा देता तशाच हिंदूंच्या स्मशानाला देत चला, असे अखिलेश यादवांना सुनावले. ते एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी रमजान आणि दिवाळीही यूपीच्या डावात मांडली. वाराणसीत रमजानमध्ये वीजपुरवठा केला जातो मात्र दिवाळीत अंधार असतो असे मोदी म्हणाले. अखिलेश यांनी लागलीच मोदींचे आरोप फेटाळून लावले. एकदा स्वतःच्या मतदारसंघात जाऊन विचारा दिवाळीत अंधार असतो का, असा टोला त्यांनी लगावला. मात्र पंतप्रधान पदावरील व्यक्तीने स्मशान-कबरस्थान-रमजान-दिवाळी हे निवडणुकीच्या राजकारणाचे विषय करणे खेदजनक आहे. त्यांच्या या वक्तव्याने त्यांच्या पक्षातील आग ओकणाऱ्या नेत्यांना जणू इंधन पुरवठाच होतो.

भाजपचे खासदार साक्षी महाराज (साक्षी महाराज म्हटले की ते भाजपचेच असणार हे वेगळे सांगण्याची गरज नसते मात्र तरीही.. ) यांनी 28 फेब्रुवारी रोजी देशात कबरस्थानच नको अशी भूमिका मांडली आहे. त्यांनी मोदींचाच समाचार घेतला. कबरस्थानला सोयी सुविधाच काय, कबरस्थानच कशाला पाहिजे असे ते म्हणाले. सर्वच धर्मीयांनी एकच अंत्यसंस्कार आणि तोही दाह संस्कारच केला पाहिजे असे आग्रही मत साक्षींनी मांडले. त्यांचे हे मत दोन धर्मांमध्ये वाद निर्माण करणारे आहे.

दुसरीकडे, दिल्ली विद्यापीठ धगधगत ठेवणे हे एक राष्ट्रीय कर्तव्य भाजपची विद्यार्थी विंग अखिल भारतीय विद्यार्थी परिषद करत आहे. केवळ दिल्लीतच नाही तर देशभरातील विद्यापीठांमध्ये विरोधकांचा आवाज दाबणे  हा त्यांचा एककलमी कार्यक्रम सुरु आहे. औरंगाबादमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पंडित दिनदयाल उपाध्याय यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. याला आंबेडकरावादी संघटनांनी लोकशाही मार्गाने आक्षेप घेतला. तर, त्या विद्यार्थ्यांवर अभाविप आणि भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. विद्यापीठाचे नुकसान केले. एवढे करुनही आंबेडकरवादी संघटनेच्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी कुलगुरुंवर दबाव आणण्यात आला.
यानंतर अभाविप आणि स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) यांच्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राडा झाला. येथील वादाचे कारण तर फक्त आमच्याविरोधात कोणी आवाज उठवू नये एवढेच आहे.
भाजप पुरस्कृत वाचाळवीर (वाचाळवीर म्हटल्यावर ते भाजपचेच असणार हे वेगळे सांगण्याची गरज नाही तरीही...) आमदार प्रशांत परिचारक यांच्या सैनिक आणि त्यांच्या पत्नीबाबतच्या लाजिरवाण्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी एसएफआयने मोर्चाचे आयोजन केले. त्याचे पोस्टर विद्यापीठात लावले जात असताना अभाविपच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली. कारण काय तर त्या पोस्टरमध्ये भाजपचे नाव का लिहिले. भाजपने पुरस्कृत केलेल्या आमदाराचा उल्लेख करताना भाजपचे नाही तर काय एमआयएमचे नाव लिहिणार ? मात्र या 'कार्यकर्त्यांना' तेही सहन झाले नाही. राज्यात भाजपचे राज्य आहे. भाजपचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनीही मान्य केले की परिचारकांचे चुकले. आता त्यांचा राजीनामा ते घेऊ शकत नाही, हा भाग वेगळा परंतू राज्यभर परिचारकांविरोधात मोर्चे निघत आहेत. ते या अभाविपच्या 'कार्यकर्त्यांना' थांबवता येत आहेत का ? परिचारक बोलले तेव्हा का यांनी राडा केला नाही?

कारगिलमधील शहीद मनदीपसिंग यांची मुलगी गुरमेहर कौर सध्या दिल्लीतील लेडी श्रीराम कॉलेजची विद्यार्थीनी आहे. एबीव्हीपीच्या धमक्यानंतर तिने दिल्ली सोडल्याची माहिती आहे. दिल्ली विद्यापीठातील रामजस कॉलेजमध्ये एक परिषद आयोजित केली गेली होती. त्या परिषदेत देशविरोधी लोक सहभागी होत असून ते देशविरोधी वक्तव्य करणार आहेत असे सांगत एबीव्हीपीने दादागिरी करुन हा कार्यक्रम होऊ दिला नाही. यावरुन दिल्ली विद्यापीठातील ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन (एआयएसए)  आणि अभाविप यांच्यात मारहाण झाली. या मारहाणीचा विरोध करण्यासाठी शहीद कन्या गुरमेहरने सोशल मीडियावर आवाज उठवला. सोशल मीडिया तर ही जणूकाही भाजप आणि त्यांच्या पिठ्ठूंची जहागिरच झाली आहे. येथे बोलण्याचा अधिकार फक्त आम्हालाच असल्याच्या थाटात ते असतात. यामुळे काही लोकांनी येथे व्यक्त होणेच सोडून दिले आहे. मात्र 20 वर्षांच्या गुरमेहरने अभाविप विरुद्ध आवाज उठवला. मी तुमच्या दगडांना घाबरत नसल्याचे या मुलीने निडरपणे सांगितले. तुमच्या दगडांनी आमचे शरीर घायळ होईल मात्र आमची इच्छाशक्ती नाही, असे तिने ठाम पणे सांगितले. तिच्या पोस्टला देशभरातून पाठिंबा मिळू लागला. यामुळे या चवताळलेल्या या लोकांनी अतिशय खालच्या थराला जाऊन तिच्यावर टीका सुरु केली. यात वीरेंद्र सहवाग सारखेही सहभागी झाले हे अतिशय खेदजनक आहे. बलात्काराची धमकी मिळाल्यानंतरही गुरमेहर घाबरली नाही, मात्र देशातील सो कॉल्ड सेलिब्रिटीज जेव्हा तिची खिल्ली उडवू लागले तेव्हा ती मनातून तुटली. जिच्या वडिलांनी देशासाठी बलिदान दिले त्या मुलीवर अभद्र टिप्पणी होऊ लागली. या सर्वांचा त्रास तिला होऊ लागला, हे तिने आज एका चॅनला दिलेल्या मुलाखतीतून स्पष्ट जाणवले. बंदूकीच्या गोळीलाही घाबरत नसल्याचे तिने सांगितले. या वयात जे सहन करण्याशी शक्ती माझ्यात आहे ते सर्व सहन केल्याचे तिने म्हटले. हा विरोध फक्त एबीव्हीपीला नाही तर अशा प्रकारे जे जे लोक हिंसक होतील आणि हिंसाचाराला पाठिंबा देतील त्या सर्वांच्या विरोधात मी उभी राहिल. यापुढेही लढत राहील. हिंसाचार करण्यापूर्वी आणि त्याला पाठिंबा देण्यापूर्वी किमान एक वेळतरी हे लोक विचार करतील. हेच मला अपेक्षित असल्याचे तिने निश्चयाने सांगितले.
यातून तरी हे लोक काही बोध घेतील एवढीच अपेक्षा . 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

योगीसाठी शहीदाच्या घरी लावला एसी, दानवेंच्या दारी आलेली शेतकऱ्यांची पोरं 'उपाशी'

शहीदाच्या कुटुंबाचीही देशभक्तीचे उमाळे येणारं सरकार थट्टा करु शकते, याचे ताजे उदाहरण उत्तर प्रदेशात पाहायला मिळाले आहे. भारत 'माते'साठी जीवाची बाजी लावून लढणाऱ्या शहीद प्रेम सागर यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी योगी आदित्यनाथांना 11 दिवस लागले. (की माहित नाही योगी मयताच्या दहाव्यानंतरच त्या घरात जातात असा काही नियम आहे.) हरकत नाही. ते शहीदाच्या घरी गेले. त्याच्या आदल्या रात्री उत्तर प्रदेशातील देवरिया या शहीद प्रेम सागर यांच्या घरी एसी, सोफा सेट, गालिचा आणि काही भगवी वस्त्रे पाठवण्यात आली होती. एवढेच नाही तर घरातील टॉवेल ही बदलण्यात आले होते. एका रात्रीतून एसी लाकडी बल्ल्यांवर फीट करण्यात आला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आले, त्यांनी शहीदाचे घर पाहिले, कुटुंबियांची भेट घेतली आणि कोरडी आश्वासने देऊन ते आल्या पावली परत गेले. शहीद प्रेम सागर यांच्या कुटुंबियांना वाटले होते की आदल्या रात्री आलेल्या वस्तू आता आपल्याच घरात राहातील. मुलगा गेला तरी सरकारने आपल्याला वाऱ्यावर सोडले नाही, मात्र त्यांचा हा भ्रम होता. शहीद प्रेम सागर यांचे वडील इश्वर चंद्र यांनी एका दैनिकाला दिलेल्य...

गरज थोड्या लवचिकतेची

वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातील एक मोठ्या व्होट बँकचा पूर्ण ताकदीने पाठिंबा आहे. हा मतदार स्वाभिमानी, विचारकरणारा आणि आंबेडकरी घराण्यावर निष्ठा असलेला निष्ठावान आहे. मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (भारिप), भारिप बहुजन महासंघ, २०१४ मध्ये डाव्यांसोबत केलेली आघाडी, २०१९ लोकसभा निवडणुकीत  एमआयएमला सोबत घेऊन लढवलेली निवडणूक, आणि विधानसभेत एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन केलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग. बाळासाहेबांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या या सर्व प्रयोगांमध्ये 'आंबेडकर'नावावर जीव ओवाळून टाकणारा मतदार तन-मन-धनाने त्यांच्यासोबत राहिला आहे. मात्र या निष्ठावान जनतेला अद्याप सत्तेची चव चाखायला मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत 'वंचित' उमेदवारांना मिळालेली मते पाहिल्यास स्पष्ट होते की, बौद्ध समाजाने बाळासाहेबांच्या नावावर भरभरुन मतदान केले आहे. मात्र बाळासाहेब ज्या ओबीसी, ओबीसींमधील छोट्या जाती, धनगर, अलुतेदार, बलुतेदार, आदिवासी, लिंगायत यांना सोबत घेऊन सत्ता संपादनाची इच्छा व्यक्त करत आहेत तो समाज पूर्ण ताकदीने बाळासाहेबांसोबत आल...

हा कसला फकीर... हा तर बेफिकीर पंतप्रधान - राज ठाकरे

हा कसला फकीर... हा तर बेफिकीर पंतप्रधान - राज ठाकरे १७व्या लोकसभेत महाराष्ट्रासह देशभर सध्या कोणाचे भाषण गाजत असेल तर ते आहे राज ठाकरे यांचे. महाराष्ट्राला राजकीय वक्त्यांची मोठी पंरपरा लाभलेली आहे. बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय सभा मारून नेईल असा सध्या एकमेव नेता आहे, ते म्हणजे राज ठाकरे. त्यासोबतच नाव घ्यावे लागेल 'हैदराबादी शेरवानी' अर्थात बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांचे. ओवेसी महाराष्ट्रीयन नसले तरी, यंदाच्या निवडणुकीत त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांसोबत महाराष्ट्रात अनेक दौरे करुन महाराष्ट्रीयन जनतेची नस अचूक ओळखल्याचे प्रत्येक सभेतून पाहायला मिळाले. राज ठाकरे यांचे 'लाव रे तो व्हिडिओ' हे आता वाक्य राहिले नाही तर ती एक फ्रेज झाली आहे. राज यांची भाषणे महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही चर्चेत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या उरात धडकी भरवणारे त्यांचे 'लाव रे तो व्हिडिओ' सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. एकही उमेदवार उभा केलेला नसताना राज्यात सर्वाधिक चर्चा आहे ती राज ठाकरे यांची. उद्याच्या सभेत राज ठाकरे...