महाराष्ट्रात तिसरी आघाडी एकदाची झाली.तिचं बारसंही काल झालं. "रिपब्लिकन डावी लोकशाही समिती". या समितीतील सगळ्यांनी हातात हात धरून हात उंचावले...आम्ही एकत्र असल्याचे दाखवण्यासाठी... प्रेसवाल्यांना, टिव्हीवाल्यांना फोटो दिले. या तिस-या आघाडीत आहेत, 1)शेतकरी कामगार पक्ष,(त्यांच्याच ऑफिसमधे बसून प्रेस घेतली म्हणून त्यांचे नाव प्रथम) 2)रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (एकत्रीत), अजूनही रिपाईच्या पुढे कंस घालावाच लागतो. त्याशिवाय कळत नाही आपण कोणत्या रिपाई विषयी बोलत आहोत ते. अशीच अवस्था कमी जास्त प्रमाणात या आघाडीत सामील झालेल्या पक्ष - संघटनांची आहे. 3)मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, 4)भारतीय कम्युनिस्ट पक्ष, 5)स्वाभिमानी शेतकरी संघटना. 6)समाजवादी पार्टी, 7)जनता दल सेक्युलर, 8)परिवर्तन आघाडी 9)सोशालिस्ट फ्रंट 10)लोक जनशक्ती पार्टी 11)राष्ट्रीय समाज पक्ष 12)समाजवादी जनपरिषद 13)सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष 14)लोक राजनिती मंच 15) लोकभारती आणि 16)लोकसंघर्ष मोर्चा या सोळा पक्षाची मोट बांधण्यात आली आहे. आणखी बरेच पक्ष येवून मिळण्याचे संकेत या समितीने काल दिले आहेत. मात्र हितेंद्र ठाकूर यांच्या वसई व...