True friends are like mornings, u cant have them the whole day, but u can be sure, they will be there when u wakeup tomorrow, next year and forever
किंवा
सगळ्या मित्रांच्या वेगवेगळ्या रंगांच्या अस्तीत्वामुळे माझ्या जीवनात अनेक रंग भरले गेले. त्या माझ्या जवळच्या सगळ्या मित्रांसाठी Hapqy Friendship Day.
या आणि या सारख्या मेसेजेसनी आज मोबाईलचा ईनबॉक्स भरत होता.
ऑगस्ट चा पहिला रविवार म्हणेजे Friendship Day. (हे कोणी सांगितले, कोणी लिहून ठेवले, कोण म्हणालंय या पैकी काहीच माहित नाही.) जेव्हा मी 11 वी - 12 वीत असेल तेव्हा हा 'FD' (संक्षीप्त नामाभीधानच सर्वांना जास्त आवडतात म्हणून आणि लांबलचक लिहायचा मलाही कंटाळा आलाय म्हणून) मला माहित झाला बहूतेक. व्हेलेंटाईन डे प्रमाणे मुलींना प्रपोज करण्याचा आणखी एक बहाण्याचा दिवस. एवढच काय ते या दिवसाचं मला तेव्हा अप्रूप. मात्र जेव्हा हातात मोबाईल खेळू लागला तेव्हा आज जसे एसएसएस येतायेत तसे रोज येऊ लागले, आणि मैत्रीचा दिवस साजरा करण्यासाठी ऑगस्टच्या पहिल्या रविवारची वाट पाहण्याची वेळ उरली नाही. मात्र या मैत्र दिनामुळे सगळ्या मित्रांची आठवण ताजी होते. त्यांच्याशी उपलब्ध माध्यमाद्वारे संपर्क प्रस्थापीत होतो आणि आपलं नातं आणखी दृढ होण्याला जणू खत पाणीच मिळते. त्यासाठी हा मैत्रदिनाचा खटाटोप महत्त्वाचाच आहे.
मैत्री कालची आणि आजची
कभीना बीते ये चमकीले दिन...
कालची मैत्री म्हटल्यानंतर मी लगेच जाऊन पोहचतो ते मिलिंदच्या दिवसांमध्ये. मिलिंद कॉलेज मधे मला ख-या अर्थाने मित्र लाभले. त्यावेळच्या आमच्या ग्रुप मधील बहुतेक मुली आता सासुरवाशीनी झाल्या आहेत. पण त्या आधीपासूनच त्यांच्या आणि आम्हा मुलांच्या संपर्कात खंड पडत गेला तो, आज इतका की आमच्या ग्रुप मधील मुली कुठे आहेत, त्या काय करतात, त्यांचे लँडलाईन-मोबाईल नंबर्स तीन-चार ठिकाणी संपर्क केल्यावरच सापडतील अशी अवस्था आहे. तर मित्रांच्या मी अजूनही संपर्कात आहे. इतकच नाही तर नित्यनियमाने आमच्या गाठीभेटीही होतात. ही कालची मैत्री आजही ताजी आहे. ती ताजी ठेवण्यासाठी आम्हाला फार काही कष्टही घ्यावे लागत नाहीत. थोडक्यात सांगायचं म्हणजे सो कॉल्ड संस्कृती नुसार आम्हाला एकमेकांना भेटण्यासाठी काही गेट टुगेदर अँरेंज करावे लागत नाही की, ओल्या पार्टीचं निमीत्त आम्हाला जवळ घेवून येत नाही. प्रत्येकाला असलेल्या वेळेनूसार प्रत्येकजण फोन अथवा प्रत्यक्ष भेटीतून संपर्कात राहतो. कधी-कधी मोबाईल कॉन्फरंसद्वारेही आम्ही गप्पा मारतो. एवढं सगळं असूनही मी काही गोष्टीना खुप मिस करतो... जसे सायकॉलॉजी डिपार्टमेंट च्या पाय-या (कॉलेजचा कट्टा), निराला बाजारची संध्याकाळ, विद्यापीठातील कँटीनमधे पडीक असनं, तिथे कोणत्याही विषयावर अधिकारवाणीने मारलेल्या मनमुराद गप्पा, सभा-साहित्यसंमेलनाला लेवलेली हजेरी, गझंलांचा घेतलेला आनंद आणि पिक्चर थेटर मधे केलेला धिंगाणा.
मिलिंदच्या शैक्षणिक आयुष्यात मला भेटलेले हे माझे मित्र - आणि त्यांच्याशी असलेलं मैत्र हीच माझी खरी मैत्री... या मैत्रीने मला खुप समृध्द केलंय.
माझे आजचे मित्र (ज्यांना मी आज आवर्जून sms केलेत) हे सगळे माझे व्यवसायीक सहकारी कम मित्र. यातील बहुतेक जण जर्नालिझम डिपार्टमेंट पासूनचे माझे सहकारी. यांच्याशी माझ्या घरगुती- वयक्तीक गप्पा अत्यंत दूर्मीळ. मग या सहकारी मित्रांशी असलेल्या माझ्या गप्पा या कामा बद्दलच्याच, भेट झाल्यानंतर मी कोणत्याही परिस्थीतीत असलो तरी ओठांवर एक हलकसं स्मित करुन त्यांचं आभिवादन स्विकारणं किंवा त्यांना हाय - हॅलो करणं हाच काय तो त्यांच्यांशी असलेला संवाद. कामा मधे आलेल्या साचले पणाची री ओढणे, आपल्या आयडियाज् वापरल्या जातनसल्याची खंत व्यक्त करणं. आणि नव्याचा शोध सुरु आहे का ? याची प्रत्येकाकडे कायम विचारपूस करणं. हाच काय तो या मैत्रीतील एकमेव धागा.
आज माझी सगळ्यात जवळची मैत्रीण बनली आहे ती माझी बायको. आणि माझा सगळ्यात चागंला वेळ जातो तो माझ्या मुली सोबत.
मैत्रीदिना च्या सर्व मित्रांना मनापासून शुभेच्छा...
भाई.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा