ओढ...
माणसाला कित्येक गोष्टींची ओढ असते... त्यात घराची ओढ ही काही औरच! माणूस कोणत्याही परिस्थितीत असला, कोणत्याही संकटात सापडला किंवा त्याला काही आनंद झाला तरी त्याला ओढ असते ती घराची. कधी एकदा घरी जातो असं होवून जातं.
कोणतीही व्यक्ति घरी आल्यावर घराची दारं त्याचं किंवा तिचं आगत-स्वागत करणार नसतात. घराच्या विटा-मतीच्या किंवा संगमरवरी भिंती आपली विचारपूस करणार नसतात. दारा-खिडक्यांचे पडदे आंगाखांद्यावरुन हात फिरवणार नसतात, की मखमली बिछाना मायेची उब देणार नसतो. खिडक्या कितीही सत्ताड उघड्या करुन ठेवल्यातरी त्या आपल्याशी कोणताच संवाद साधणार नसतात. मनातली घालमेल शेअर करणार नसतात. तरीही माणसाला दगड-विटा-मातीच्या घराची कायम ओढ असते. घरातील वस्तूही आपल्याला जासत वेळ सुखावणा-या नसतात, तरीही घराची ओढ कुणाचीच संपत नाही. कारण या सर्व निर्जीव वस्तूमध्ये आपल्या भावना जोडल्या गेलेल्या असतात. या निर्जीव वस्तूंमध्ये जान येते, जेव्हा त्यांना सजीव हलचालींचा स्पर्ष होतो. मग जिन्याची प्रत्येक पायरीही बोलकी होते. जेव्हा तिथे बसून आपल्या प्रियजनांशी केलेल्या सुख दु:खाच्या गप्पा आठवतात...
घरात आल्यावर आई-वडिलांचा आंगा-खांद्यावरुन फिरणारा मायेचा हात प्रत्येक संकटाशी झुंज देण्याचं बळ देतो. आम्ही तुझ्या सोबत आहोत हे शब्द बळ देतात जगण्याचं. घरातल्या बोबड्या बोलाने आपण विसरून जातो सगळं टेन्शन-सगळं फस्ट्रेशन.
घर असं माणसांनी बनलेलं असतं . त्यांच्यातील नात्यानं सांधलेलं असतं. दगड विटांची केवळ इमारत उभी राहू शकते, घर नाही. हे प्रत्येकानेच कधीना कधी अनुभवलेलं असतं. हा अनुभव मला मुंबैत आल्यापासून रोज येत आहे. राहिले घर दूर माझे... अशीच माझी अवस्था असते. म्हणूनच प्रत्येक सुटीत मी, चलचले अपने घर ओ मेरे हमसफर... म्हणत घरी जात असतो... घराच्या ओढीने.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा