मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

2010 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सोनेरी वर्खाच्या दगडाच्या देशा

आज महाराष्ट्र दिन. (हो दिनच ''दीन'' नाही. ) आज नुसताच महाराष्ट्र दिन नाही तर कामगार दिन देखील आहे. (हे तुम्हाला माहित नाही असं गृहित धरून मी मुळीच लिहीत नाही. तर तुम्हाला हे माहित आहे म्हणूनच लिहित आहे. ) तसच आज महाराष्ट्राचा सुवर्ण महोत्सव. म्हणजेच 1 मे 2010 हा दिवस असा सुवर्ण त्रिकोणाने सजला आहे. या महाराष्ट्राचा इतिहास वगैरे मी सांगत बसणार नाही. काय पुन्हा पुन्हा तेच तेच सांगायचे, मुंबईसह महाराष्ट्र होण्यासाठी 105 हुतात्म्यांचे बलिदान, संयुक्त महाराष्ट्राचा लढा, स्वखुशीने सामिल झालेला मराठवाडा, काहि अटींनीशी महाराष्ट्रात आलेला विदर्भ. हे सगळं तुम्हाला रोजच्या पेपरातून, टिव्ही वरुन वाचायला पहायला मिळत आहेच. काहींना या इतिहासाबद्दल जास्तच जाणून घ्यायचे असेल तर बरीच पुस्तकंही छापली गेली आहेत. त्यामुळे त्यात मी आणखी काय वेगळं सांगणार. असो. हा महाराष्ट्राचा सुवर्ण महोत्सव महाराष्ट्र शासन धुमधडाक्यात साजरा करत आहे. (शासनाने तसं त्यांच्या फाईलींवर, डाय-यांवर , जाहिरातीत 50चा आकडा आणि तुतारीचे चित्र दाखवायला कधीपस्नचं सुरुवात केलीय. ) महाराष्ट्र शासन साजरा करत आहे म्हणजे...

औरंगाबाद मनपा निवडणूक ऐतिहासिक होणार

औरंगाबाद शहर म्हटलं की डोळ्या समोर येतात, अजिंठा - वेरुळच्या लेण्या, बीबीचा मकबरा, जायकवाडी धरण, ज्ञानेश्वर उद्यान, बौध्द लेणी, आणि माझं विद्यापीठ. इथल्या चिकलठाणा, वाळूज एमआयडीसी मुळं औरंगाबाद शहर आशियातील सर्वात वेगाने वाढणारे शहर बनले होते. पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आणि जगाच्या नकाशावरील औरंगाबाद शहर - जिल्हा आहे. इथल्या जायकवाडी धरणामुळे येथील एमआयडीसी भरभराटीस आली. औरंगाबादच्या पाण्याची चव इतकी भारी की देशभरातील बियर उत्पादकांना इथं आपल्या फॅक्टरीज उभाराव्या वाटल्या. एका ऑस्ट्रेलियन बियर कंपनीने हे पाणी बियर साठी अत्यंत चांगले उपयुक्त असल्याचा अहवालदेखील दिला आहे. त्यामुळेच औरंगाबादेत देशातील प्रत्येक बियरचा कारखाना आहे. आणि आता धान्यापासून मद्यनिर्मीतीचेही कारखाने हे जायकवाडी धरणालगत पैठण एमआयडीसीतच उभारले जाऊ लागले आहेत. असं हे औद्योगिक आणि सांस्कृतिक, शैक्षणीक दृष्ट्या महत्त्वाचं शहर. औरंगाबादवर स्वातंत्र्यपूर्व काळात निजामांचा अंमल होता. औरंगाबाद हे हैद्राबादला जोडलेलं होतं. येथील जून्या इमारतीवर अजूनही निजामकालीन छाप दिसते. मलिक अंबरने या शहराची शास्त्...

बजेट की क्रिकेट

फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा आठवडा म्हणजे देशाचं बजेट ''बघण्याचा'' आठवडा. 24 फेब्रुवारीला ममतादीदींनी रेल्वे बजट सादर केलं. युपीए सरकारमध्ये मागीलवेळी लालु यादवांकडे असलेलं हे नफ्यातलं खातं, यंदाच्या युपीए हंगामात ममतादीदींकडे आलं. पुढील वर्षी पश्चिम बंगालमध्ये निवडणूका आहेत त्यामुळे बंगालला रेल्वे बजेट मधे झुकतं माप असणार हे मिडियाने सर्वसामान्यांच्या मनावर चांगलच ठसवलं होतं, मात्र मी देशाची रेल्वे मंत्री आहे हे ममतादीदींनी त्यांच्या बजेटमधून दाखवून दिलं. महाराष्ट्राच्या वाट्यालातर ममतादीदींनी बंगाली मिठाई भरभरून दिली. सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांना कुठलीही भाडेवाढ नकरता फार मोठा दिलासा दिलाय. तसच नेट सेव्ही झालेल्या प्रवाशांनाही ई-टिकीट बुकींगमध्ये 10 रुपयांची बचत दिली आहे. आणि मालवाहतूक भाडेवाढ ही नाही. असं एकंदर काही वाढीव न देता काही काढून घेतलं नाही हे समाधान मात्र दीदींनी भारतीयांना दिलयं. मराठवाड्याच्या तोंडाला नेहमीप्रमाणे पाने पुसली गेलीय. हे घीसंपीटं वाक्य मराठवाड्यातील नागरिकांसाठी यंदा पुन्हा कामी आलय. एकही नवी गाडी नाही. नवा रेल्वे मार्ग नाही. इलेक्ट्रीक ...

मुंबई - मराठीचा वांझोटा वाद

मुंबई कोणाची? महाराष्ट्रात मराठी सक्तीची. हा वाद पुन्हा एकदा चांगलाच रंगलाय. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मुंबईत टॅक्सी परवाना मराठी बोलता येणारांनाच दिला जाईल असं म्हटलंय. मुख्यमंत्री चव्हाण यांच्या या वक्तव्यानंतर दिल्लीश्वरांनी मुख्यमंत्र्यांना कान पिचक्या दिल्या असाव्यात. परिणामी अशोकरावांनी 'यु टर्न' घेत टॅक्सी चालकांना ग्राहकांना समजेल (अर्थात हिंदी-गुजराथी) अशा स्थानिक भाषेत संवाद साधावा असा पवित्रा घेतलाय. या टॅक्सी परवान्यावरुन उद्योगपती मुकेश आंबानी यांना एनडीटिव्हीच्या एका चर्चासत्रात बरखा दत्त यांनी छेडलं असता, त्यानीही 'मुंबई सर्व भारतीयांची आहे' , असं म्हटलं . झालं, शिवसेना - मनसे या मुद्यांच्या शोधात असलेल्या पक्षांना आयता विषय मिळाला. आंबानींच्या 'मुंबई इंडियन्स' च्या कॅप्टननेही असचं वक्तव्य मुंबईत केलं तेव्हाही बाळ ठाकरे आणि कंपनीला हे मुंबई वेगळे करण्याचे कारस्थान वाटले. आता आंबानी आणि सचिन कोणत्या सत्तास्थानावर आहेत की, ज्यांच्या बोलण्याने मुंबई वेगळी होईल हे ठाकरेंनाच माहित. मात्र या वक्तव्यामुळे असं बोलणा-यांना सेना धडा शिकवेल असं शिवसेने...

संमातर सेन्सॉर

2010 या वर्षाची सुरुवात मराठी चित्रपटसृष्टीसाठी चांगलीच नटरंगी झाली. 1 जानेवारीला नटरंग प्रदर्शित झाला, त्याला सबंध महाराष्ट्रदेशातून उत्तम प्रतिसाद लाभलाय. नंटरंगच्या मागोमाग झेंडा हा ठाकरे घराण्याचा राजकीयपट मांडणारा चित्रपट मराठी रसिक मायबापाच्या भेटीस उत्सुक होता. यानंतर मी शिवाजी राजे भोसले बोलतोय म्हणणारे महेश मांजरेकर शिक्षणाच्या आयचा घो... म्हणत येणार होते. या दोन्ही चित्रपटांना सेन्सॉर बोर्डाने मान्यताही दिलेली आहे. मात्र झेंडा मुळे कुणाचा तरी स्वाभिमान दुखावलाय तर, मांजरेकरांच्या चित्रपटाचे नाव शिवराळ असल्यामुळे त्याच्या नामांतरासाठी शिवबाचे मराठे बाह्या सरसावून पुढे आलेत. शासनाचे सेन्सॉर बोर्ड, न्यायालय या व्यवस्था असतांना तिथे दाद मागण्याची कुणाचीच तयारी नाही. जनतेच्या दरबारातही या चित्रपटांचे भवितव्य ठरुदेत असं कोणीही म्हणायला तयार नाही. सेन्सॉर बोर्डला समांतर सेन्सॉरशिप ही काही आजचीच बाब नाही. अनेक चित्रपट - नाटके हे या सेन्सॉरशिपच्या जाळ्यात अडकलेले आहेत. तेंडुलकरांचे घाशीराम कोतवाल हे नाटक , दिपा मेहतांचा वॉटर यासह अनेक कलाकृतींना या मुठभर अस्मिता, धर्मिक भावना, स्वाभिम...